Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कोथिंबीरीची चटणी ...

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » चटण्या » कोथिंबीरीची चटणी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 26, 200620 09-27-06  2:36 am

Shonoo
Wednesday, September 27, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांताकृझ पश्चिमेला स्टेशन च्या जवळ महावीर म्हणून दुकान आहे. माझ्या साठी आणि माझ्या मैत्रिणींसाठी तिथनं नेहेमी काय काय नवीन आणत असते माझी आई. पार्ल्याला ( पूर्व) पण कुठल्याही भांड्यांच्या दुकानात मिळावीत, रानडे रोड, गिरगाव या भागात सुद्धा मिळतील. मला वाटते की सुमीतच्या मिक्सर बरोबर पण अशी छोटी भांडी मिळतात

Dineshvs
Wednesday, September 27, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणीहि देशात येणार असेल, तर मिक्सरचा मेक आणि मॉडेल कळवले तर त्याला बसणारी चटणी अटॅचमेंट दादरला सहज मिळु शकेल. मिक्सरच्या बेसची आऊटलाईन कागदावर काढुन पाठवली आणि मधल्या भागाचे थोडेसे डीझाईन काढुन पाठवले तर छान. मिक्सरबरोबर आलेले छोटे भांडे पाठवता आले तर सगळ्यात छान.

Meggi
Thursday, September 28, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, माझ्या या प्रश्नाचं उत्तर देता का?

>>लिंबाचा रस घालुन पदार्थ फ्रीज मध्ये ठेऊ नये असं म्हणतात. मग ही चटणी लिंबु रस घालुन फ़्रीज ठेवली तर टिकेल का?

Lalitas
Thursday, September 28, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो, तू लिहिलेला चटणीचा प्रकार इटलियन पास्तावर घालायचा "Al Pesto" सारखा आहे. कोथिंबीरीच्या ऐवजी Basil (तुळशीची पाने) आणि दाण्यांऐवजी Stone-pine, बाकी कृती तशीच!

Dineshvs
Friday, September 29, 2006 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Meggi लिंबाचा रस घालून, काचेच्या बोलमधे पदार्थ फ़्रीजमधे झाकुन ठेवला, तर मला त्यात काहि अयोग्य वाटत नाही. आणि जास्त दिवस कुठले ? पाच सहा दिवसात संपतोच हा पदार्थ.

Lajo
Friday, September 29, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ललिता, बरोबर आहे. पेस्टो सारखीच रेसिपी आहे.
काही वेळेला basil नसेल तर किंवा कोणाला त्याचा थोडा उग्र वास आवडत नसेल तर असा कोथिंबीर घालुन पेस्टो करता येतो.


Bee
Friday, September 29, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई, बासिलची पाने म्हणजे तुळशीची पाने का? पण ती तर लिम्बाच्या पानासारखी दिसतात आणि त्यांची चव पण तुळशीच्या पानासारखी लागत नाही.

Lajo
Friday, September 29, 2006 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

basil म्हणजे तुळशीची बहीण. पाने थोडी कमी हीरवट असतात आणि तुळशीच्या पानांपेक्षा थोडी मोठी पण असतात. चव पण वेगळी असते.

Arch
Friday, October 06, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो, Angel hair pasta वर घालून फ़ारच मस्त लागली हं ही चटणी. मला स्वत : ला Basil आवडत नाही. त्यामुळे हा प्रकार एकदम आवडला. Thanks!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators