Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 29, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » उकडीचे मोदक » Archive through August 29, 2006 « Previous Next »

Asmaani
Saturday, August 26, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, सही!!!!!!!!!
अगदी शब्दश्: अथपासून इतिपर्यंत कृती दिलीत. thank you very much .


Psg
Monday, August 28, 2006 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, लालू, तुम्ही केलेल्या मोदकांचे फोटो पाहिले गणेशोत्सव बीबीवर. इतके कळीदार मोदक बनवायच्या खास टीप्स द्या ना प्लीज.. इथे ५ किंवा ७ कळ्या करताना नको होते.. इतक्या सुबक कळ्या कश्या केल्या?

Nayana
Monday, August 28, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या इथे मोदक competiotion आहे...११ मोदक करुन आणायचे आहेत... मी आपले regular सारणाचे उकदिचे मोदक घेउन जाणार आहे. पण तुमच्याजवळ काही कल्पना असतिल तर सुचवाल का?

Seema_
Monday, August 28, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी हं psg. लालु आणि आर्च चे मोदक बघुन भयंकर complex आलाय मला.
किती सुंदर झालेत मोदक दोघींचे.


Lalu
Monday, August 28, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks गं. आर्च छान झालेत मोदक. माझी पद्धत साधारण दिनेश नी लिहिलंय तशीच आहे. पण मला वाटतं उकड नीट झाली की हे सोपे पडते. त्यात अजिबात गुठळ्या असता कामा नयेत आणि मऊ, लवचिक असावी, कोरडी नको. उकडीच्या टिप्स आहेतच वर लोकानी दिलेल्या.
पारी जर अंगठ्याने दाबत करता येत नसेल तर दोन प्लास्टिक कागदात मधे ठेवून लाटता पण येते. कडांना भेगा पडता कामा नयेत. सरावासाठी उलट मोठीच पारी करा. मला तेल किंवा तुपापेक्षा हाताला पाणी लावूनच जमतात. मुखर्‍या करताना आणि टोके जुळवताना पण बोटाना पाणी लावायचे.


Prady
Monday, August 28, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नयना, मेघाने सहकार नगर मधे ई सकाळची जी लिंक दिली आहे त्यात वेगवेगळे सरणाचे प्रकार दिले आहेत. बघ एकदा ती लिंक.

Prady
Monday, August 28, 2006 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च आणी लालू उकडीमधे लोणी घातलं की मऊ होते पण मग इथे तुम्ही काय घालता कारण घरी तर लोणी नाही काढता येत. बटर वापरलं तर चालेल का? की तेल तूप घालता? देशात माझा अनुभव असा होता की तेला तुपा पेक्षा लोण्याने जास्त छान होते उकड.

Lalu
Monday, August 28, 2006 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady, मी तेल घालते पाणी उकळवताना. आणि नीट मळून घेते नन्तर.

Storvi
Monday, August 28, 2006 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी उकड जरा चिकट झाली राव ह्या वेळेला, आणि पातळ पण नाही करता आली. काय चुकले असेल बरं?

Arch
Monday, August 28, 2006 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू तू अगदी भरगच्च बेत केलेला दिसतोयस प्रसादात. छान सजलय पान.

दिनेशप्रमाणेच करते मोदक. उकडीचा लंबगोलाकार गोळा करून घेते आणि डाव्या हातात गोळा धरून उजव्या अंगठ्याने गोळ्याला खळगी करते. आणि मग खळगीच्या आत अंगठा आणि बाहेर चार बोटाने दाबत वाटी करून घेते. वाटी जशी मोठी होत जाते तस वाटीला support द्यायला डावाहात खोलगट करावा लागतो. हवी तेवढी वाटी तयार झाली की अंगठा, Indix finger, middle finger ह्याने पाकळ्या पाडायच्या. पाकळी अंगठ्याने आणि Middle finger ने पाडली जाते आणि Index finger ने आतली बाजू दुमडली जात नाही. म्हण्जे वाटीचा आकार लहान होत नाही.

मी उकड काढताना पिठाच्या बरोबरीने पाणी घेते त्यात वाटीला एक चमचा ह्याप्रमाणात साजूक तूप घालते. पाणी खदाखदा उकळल की पीठ टाकते. ते पाण्यात ढवळते. लगेच gas बंद करून tight झाकण लावते. आणि थोडी गरम असतानाच पाणी आणि तेलाच्या हाताने मळून घेते. उकड काढण्याच काम मला सोप्प वाटत. नीट मळण महत्वाच आहे पण तेलाचा फ़क्त हात लावायचा. तेल घालायच नाही. लालू म्हणते त्याप्रमाणे मीही पाकळ्या पाडताना पाण्याचा हात वापरते. मोदक वळताना तेल वापरत नाही. पाणी उकळतानी थोड दूध घातल तर उकड छान पांढरी आणि मऊ होते.

आता वाटल असेल कुठून हिला विचारल म्हणून


Rachana_barve
Monday, August 28, 2006 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर हे मोदक किती दिवस टिकतात? फ़्रीजच्या बाहेर? 4-5 दिवस टिकतील का?

Nayana
Monday, August 28, 2006 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady मला ती link कुठे दिसली नाही...
रचना उकडिचे मोदक काही जास्त टिकत नाही..मी फ़्रीझ मध्ये ठेवते आणी दुसर्‍या दिवशी कुकर मध्ये ठेवते आणी एक वाफ आणते. नाहीतर ते खायला कडक लागतात. तसेच सारण पण खराब होउ शकते त्यामुळे ते जास्त टिकत नाहीत. खर तर मोदक केल्यावर आमच्याकडे लगेच संपतात. :-)


Rachana_barve
Monday, August 28, 2006 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे :-( ४-५ दिवस नाही का टिकणार?

Prady
Monday, August 28, 2006 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नयना ही घे लिंक. 'नैवेद्य आणी खिरापत' मधे तुला निरनिराळी सारणं वाचायला मिळतील. मेघा तुझ्या वतीने मीच देतेय गं ही लिंक.
http://www.esakal.com/features/ganeshutsav/html/dagdusheth.html

Rachana_barve
Monday, August 28, 2006 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी जे मोदक 4-5 दिवस टिकतील अशा मोदकांची रेसीपी देउ शकेल क? adv मधे thx

Arch
Monday, August 28, 2006 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, पेढ्याची recipe वापरून नुसत्या खव्याचे मोदक कर. ते टिकतात बरेच दिवस.

Manuswini
Tuesday, August 29, 2006 - 12:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च

ते मोदक साच्यातुन केले का ग?
रागवु नकोस पण खरेच छान कळ्या आहेत त्याच्या

मला तर वेळच नाहे मिळाला ह्यावेळेला बघुया पुढच्या weekend ला आरामात try करेन उकडीचे.

आणखी एक टीप्स मंडळी,
किंचीत मीठ, आणी साखर टाकावी पाणी उकळताना उकडीच्या मोदकासाठी along with शुद्ध तूप
आणी पाती वळताना उबदार पाणी, त्यात थोडे तेल ह्याच्यात बोटे बुडवुन्न पण छान होतात.

मोदक पिठ असे काढत घरी इथे

बासमति तांदूळ धुवुन वाळत घालायचा एका पेपरावर.
कडकडीत वाळवायचा नाही. मी तर पंख्याखाली वलवते.

मग म mixie मधे बारिक वाटते. आणी चाळुन घेते.
Chioo
Tuesday, August 29, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी उकड खूप अतीचिकट झाली. मी हा प्रश्न main BB वरपण विचारला होता. पूनम, तुझ्या सल्ल्यबद्दल धन्यवाद. :-) पण कणीक मिसळली तर चव बदलणार नाही का? दुसरे आणखी काय करता येईल?

Nayana
Tuesday, August 29, 2006 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा लिंक छानच दिसते आहे. many many thx मी modak competition झाल्यावर result कळवेन

Arch
Tuesday, August 29, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, मी हाताने मोदक करते. माझ्याकडे साचा वगैरे काही नाही.

काल मी उरलेली उकड चपातीत पुरणासारखी भरून चपात्या केल्या अगदी मऊसुत होतात आणि छान लागतात चवीला. चिऊ तस करून उकड संपवून टाक. सारण केल असशील तर त्याच्या करंज्या कर.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators