Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अळीवाचे लाडू

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » लाडू » अळीवाचे लाडू « Previous Next »

Moodi
Monday, December 05, 2005 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अळिवाचे लाडु

साहित्य : २ नारळाचा चव ओले खोबरे, ५० gram अळीव, अर्धे जायफळाची पुड, २ वाट्या चिरलेला गुळ, अर्धी वाटी साखर, ५-६ वेलदोड्यांची पुड,

कृती : एका पातेल्यात निवडलेले अळिव नारळ्याच्या चवात म्हणजे त्या किसलेल्या ओल्या खोबर्‍यात ३-४ तास झाकुन ठेवावे. नंतर ते फुलल्यावर त्यात गुळ अन साखर घालुन ते gas वर मंद आंचेवर शिजायला ठेवावे, मधुन मधुन ढवळावे. शिजत आले की त्यात वेलदोडा अन जायफळ पुड घाला. कडेने मिश्रण सुटत आले की पातेले खाली काढुन ते घोटुन घ्या अन तुपाच्या हाताने मिश्रण कोमट असताना लाडु वळा.
वरील लाडुन साखर घातली नाही तरी चालते. अन हवे असल्यास लाडुचे मिश्रण शिजताना एखादे चमचा तुप घाला.
काही लोक अळीव नारळ्याच्या गोड पाण्यात ३-४ तास भिजत ठेवतात अन मग फुलले की नारळाच्या चवात घालुन शिजवतात.


Karadkar
Monday, December 05, 2005 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी तुला अनेकानेक धन्यवाद. मी आज हि रेसीपी विचारणार होते :-)

Moodi
Tuesday, December 06, 2005 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर एक कृती अजुन देतेय, बघ कशी आहे ती, अर्थात पटली तर करुन बघावी सर्वानी.

साहित्य : २ वाटी गाजराचा किस, पाव वाटी अळिव, २ वाटी गुळ, वेलदोडा अन जायफळ पुड, १ वाटी ओले खोबरे म्हणजे नारळाचा चव.

अळीव धुवुन खोबर्‍यात २ तास ठेवावेत. नंतर अळिव, खोबरे अन गाजराचा किस एकत्र मंद आंचेवर शिजत ठेवावा. अर्धवट शिजत आला की गुळ घालावा अन परत शिजायला ठेवावे, मधुन मधुन हलवावे. पूर्ण शिजला की उतरवण्या आधी वेलदोडा अन जायफळ पुड घालावी अन घोटावे.
मग उतरवुन तुपाच्या हाताने लाडु वळावेत.

अर्थात जर अळिवाचे लाडु करशील तेव्हा त्यातलेच मिश्रण वेगळे काढुन त्यात गाजराचा किस घालुन थोडा नमुना म्हणुन करुन बघ, म्हणजे नाही आवडले तरी वाया जाणार नाही


Sis_trio
Tuesday, September 12, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aliwala English kinwa Gujrati madhye kay mhantat konala mahit aahe ka?
Also, SF bay area madhye which grocery store carries it, anyone knows?

Thank you much,
Sis

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators