Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 13, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » आहारशास्त्र » ज़नरल मोटर कंपनीचा Diet Program » Archive through July 13, 2006 « Previous Next »

Deepanjali
Monday, July 10, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GM Diet सुरु करायचे या विचारानेच माझे २ पाउंड वजन कमी झाले आहे!
<<<का रे KD,
वजन कमी करायची गरज पडतीये ?
Fruit Salad चा बेत जोरदार झालेला दिसतोय !
~D

Arch
Monday, July 10, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deeps, .. .. ..

Princess
Tuesday, July 11, 2006 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची, लोपा आणि इतर यशस्वी लोकहो, या डाएट प्रोग्राम मध्ये कुठे ही पोळी किंवा भाताविषयी लिहिलेले नाही. म्हणजे पोळी आणि भात बंद करायचा का? पण मग काही प्रश्न वाचुन वाटते की पोळी/ भात ही खायचा आहे. माझा गोन्धळ होतोय.... कुणी स्पष्टीकरण देइल का मला?
प्रिन्सेस


Princess
Tuesday, July 11, 2006 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंगी, तुझे मेल वाचुन कळते की तु नौकरी करते. तु डाएट कसे पाळले ते जरा अजुन स्पष्ट करुन सांगशील का? कारण मी पण नौकरी करते आणि मला हे सगळे पाळणे खुप कठिण वाटतेय.
प्रिन्सेस


Chingutai
Tuesday, July 11, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम,
अग आॅफ़िस मधे तू डबा नेत असशील तर फ़ळ, चिरलेल्या वाफ़वलेल्या भाज्या घेउन जा. नोकरी करताना सोप जात, घरी आल की काही चवी-ढवी च खायची इच्छा होते. कसे ७ दिवस जातिल कळणारही नाही. तुझ्या टेबलवरच पाण्याची बाटली ठेव आणि दर तासानी दिड ग्लास पिण्याची सवय लाव.
आॅल द बेस्ट!!! :-)

-चिन्गी


Lopamudraa
Tuesday, July 11, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्गुताइ.. correct..... नोकरी करताना.. लक्षात येत नाही.. पूनम.!!
आणि वरच्या सगळ्या post and link वाच मग तुझ्या लक्षात येइल...!!!
जया कस चालु आहे.. अग आठ केळी सुध्दा नको होतात.. तुझ्या लक्षात आलेच असेल म्हणा... अजुन काय नविन अनुभव आलेत share कर...!!सावनी all the best !!!


Jayavi
Tuesday, July 11, 2006 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंगी, लोपा, आहे आहे..... अजून सुरु आहे माझं diet :-)
मी चक्क ६ केळी रिचवल्या. रात्री भूक लागल्यासारखी वाटत होती. पण जास्त लक्ष दिलं नाही.
आता आज ५ वा दिवस. आज सकाळपासून पनीर आणि २ टमाटे खाल्लेत. उद्याची वाट बघ्तेय :-)
स्वतः diet करत असताना घरच्या बाकीच्या लोकांसाठी काही बनवायला अगदी नको वाटतं गं.
अजून खिंड लढवतेय...... 3 days to go still !


Athak
Tuesday, July 11, 2006 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा तु मला बारीक करु शकणार नसशील तर ह्या सगळ्या मायबोलीकरांना जाड कर रे :-)
जयु , गुरुवारी उद्ध्यापनाला बोलवलस तर , आता कळलं :-)


Savani
Tuesday, July 11, 2006 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिला दिवस पार पडला खरा. लोपा, धन्यवाद.
मी दिवसभर cantaloupe, watermelon , pineapple ह्या तीन फ़ळांवर जास्त भर दिला. मधून २ दा सफ़रचंद खाल्ले.
फ़ळं खाऊन खाउन शेवटी कंटाळा यायला लागतो. काहीतरी तिखट, गरम खावेसे वाटते. पण खरच परीक्षा बघितली जाते.
बघुया, पुढे कसे होतयं आता?


Jayavi
Wednesday, July 12, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथका, किती हा दुष्टपणा रे! इतकी मेहनत घेऊन करतो आहोत तर होऊ दे की जरा बारीक.
सावनी,तुला Good Luck !
आज माझा ६वा दिवस. आज मज्जा आहे. Chicken Frankies खाणार आहे beef ऐवजी आणि भाज्या. कालचा दिवस चांगला होता. ६ टमाटे आणि २५० gms पनीर खाल्लं.
पण खरी परिक्षा उद्या आहे. उद्या dinner ला बोलावलं आहे अथकला आणि काही मित्रांना. आता सैपाक चव न घेता कसा बनवायचा? अथक,देवाचं नाव घेऊन ये रे:-)


Lopamudraa
Wednesday, July 12, 2006 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया, पाहुण्यानाच चव घ्या म्हणायचे.. आपलेच घर आहे लाजु नका काही कमी जास्त झाल तर म्हणुन आग्रह करायचा... खाल्ल तर सम्जायच चांगल झालय नाही तर.. तुम्ही पण diet करताय का म्हणायच!!...
btw चांगल चालल्य diet ..
काल घरात फ़र्माइश वरुन जिलेबी केली.... आणि खाल्ली..
नवरा म्हणाला जगाला diet ला लावुन आणि स्वता जिलेबी खातेयस...जयु मग काही माझ्या घशाखाली उतरली नाही ती तुझी आठवण काढत salad खाल्ल..


Jayavi
Wednesday, July 12, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं लोपा, ऐसा मत करो रे! अगं इतकी छान जिलबी केलीस आणि खाल्ली नाहीस..... तेही माझ्यासाठी? मलाच कसंतरी वाटतंय. अगं नवरे लोक असं बोलतच असतात. पुढच्या वेळी काहीतरी छान छान खाताना माझी आठवण काढत जा....... मनात म्हणत जा जयु असती तर किती चवीनी खाल्लं असतं :-)

Robeenhood
Wednesday, July 12, 2006 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त नवरे सम्प्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत जयूच्या या विधानामुळे. यावर पुढील कारवाई करण्यासाठी सगळ्या गरीब नवरे बांधवानी कुठल्या तरी बी बी वर जमावे हो... ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक.....

Prasadp77
Thursday, July 13, 2006 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Its true that it becomes difficult with this diet program. On the day of banana and milk, I felt like my brain wasn't working the whole day. I just couldn't do any work that day. Whole week, I felt pretty tired though but finally I did it.

One thing I find objectionable in this program that the use of rice, which is pure carbohydrates, if its actually beef then it should be rather replaced with proteins so next month, I will be trying some lentils rather than rice. and support it with beetroot koshimbir.

And loks, you don't really have to stick really hard to this program, all you have to understand out of this is, what is needed that day and why. The program suggests use of soup but I could not make that soup so I skipped it whole BUT I drank at least 4 liters of water every day. I don't know if it has helped. I used salt (less than usual) in all recipes that I made, even in salad. Make sure that you eat till you are full, even though it tastes bad (If it tastes bad, add some basil and oregano mix in it, add some lime juice for taste and very little salt)
I make cabbage salad as follows - Chop cabbage very finely, add little oil on pan, add asafoetida, curry leaves and then add chopped cabbage, add lime juice and little salt, mix and eat. This way you can eat way more of cabbage then you can think of otherwise. Do very same with boiled broccoli. I just can't stand that smell but do it for that Selenium.
Do some tweaking as per your understanding but make sure to reduce salt overall and increase water a lot. Once the program is done, reduce your food intake as per the requirement (Now my diet is approx 4/5 of the previous one but I have regularised a lot with physical acitivity)

(and yes, do take a bite of bread slice if you can't stand. I ate 4 slices in 7 days)

Lopamudraa
Thursday, July 13, 2006 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या गरीब नवरे बांधवानी कुठल्या तरी बी बी>>>>.. जमा लवकर.. कहितरी वाचायला तरी मिळेल गन्मतीशिर.. नाहितर इतके भांडत असतत आजकाल सगळे.. कि बस.. जरा वाद घालण कमी करुन लिहित का नाही कोणी.

Bee
Thursday, July 13, 2006 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझे एक उदाहरण देतो. मला jogging or Gym नको होते. मला jogging/swimming खूप आवडायचे आणि अजूनही आवडते पण मी वेळ देऊ शकत नाही. swimming मुळे केस पांढरे होतात त्यामुळे मी ते शेवटी सोडून दिले. Gym तर मला मुळीच नको होते. कारण I am not interested in having good muscules . मी सलग दोन वर्ष नियमित jogging केलेली आहे. पण इथे कधीकधी सकाळी पाऊस सुरू होतो. मग त्या दिवशी जर आपण जाऊ शकलो नाहीतर दिवसभर शरिर निष्क्रिय जाणवते कारण शरिराला व्यायामाची सवय जडली असते. Jogging सोडण्याचे अजून एक कारण असे की शू चढवा, jogging ला लागणारा पोषाखा चढवा आणि परत आल्यानंतर ते सर्व काढा आणि नीट ठेवा. घराला कुलुप ठोका, lift मधून खाली पोचायला अजून पाचेक मिनिट हे असे सर्वकाही करायचा नाही म्हंटले तरी २० मिनिट फ़ुकट जायचे. ह्यावर एक उत्तम उपाय म्हणून मी योगाचा अगदी प्रकर्षानाने विचार केला. त्यावेळी माझ्या डोक्यात योगापासून शारीरीक फ़ायदे मिळावेत असे मुळीच नव्हते. योगा आधी आसनांपासूनच सुरू करावा लागतो. मग आपले शरीर medidation , प्राणायमासाठी आपोआप तयार होते. तर मी जेंव्हा नियमित रोज दीड तास, बरोब्बर तीन महिने फ़क्त आसने केलीत तर माझी कमर ३३ वरुन ३० वर घसरली, वजन ६१ वरुन ५७ किलो झाले, पोट एकदम आत खोल गेले, पाठीचा कणा एकदम सरळसोट झाला, सबंध शरीर लवचिक आणि बाकदार झाले.. होत आहे. मायबोलिकर आर्चचे म्हणने म्हणून मला पटले नाही की ती म्हणते योगाने ईन्च ईन्च वजन कमी होते खूप काही फ़रत पडत नाही. तिचे काहीतरी चुकत असेल नक्की. ही मी माझी स्तुती करत नाही, तसा उद्देश बिद्देश नाही.. फ़क्त स्वतःचे एक उदाहरण देत आहे प्रामाणिकपणे. माझे उपासमार आपोआपच होतात. त्यामुळे मला खाणपिणं कमी करण्याची गरजच पडत नाही. त्यात घरची सगळी कामे मी स्वतःच करतो. एक कपडे धुणे हे एक काम सोडले तर बाकी घरची कामे करायला मला मीच लागतो. इथे weekend days ला 1 to 2 hrs साठी घरकाम करायला बाया मिळतात. त्या एका तासाचे 12$ घेतात. तर सुरवातीला मीही एक बाई ठेवली होती. असे एक दीड महिना मी करुन बघितले. मग मला वाटले, ही असे काय करते जे मी करू शकत नाही. शेवटी मी स्वावलंबी होण्याचा विचार केला. तसेच जवळ एक मराठी वहिनी राहतात त्या म्हणाल्यात मी तुम्हाला आठवडाभराच्या पोळ्या करुन देईन. मी तसे एक आठवडा करुन बघितला. शेवटी दोन गोष्टी पटल्या नाहीत. एकतर शिळ्या पोळ्या गरम करुन खाण्यात मला गम्य नव्हते. दुसरे हे काम आपणही करू शकतो हा विचार परत एकदा डोक्यात आला. हो तारेवरची कसरत होते खूपदा पण गत्यंतर नाही. अगदी वीशी तिशीत स्वावलंबन विसरणे चांगले नाही. उद्याला माझे वजन वाढले तर मोटारबिटर कंपनीचा डाईट मलाही ट्राय करुन बघावा लागेल :-) बाकी ह्या डायेटचे नाव एकदम फ़नी आहे :-)

मागे लता मंगेशकरांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही गळा गोड ठेवण्यासाठी काही पथ्य पाळता का. तर त्या म्हणाल्यात छे.. कसले पथ्थ्य बिथ्थ्य मी तर चांगला तांबडा रस्सा ओरपते. एकच सांगते रोज गाण्याचा रियाज करते! तर मंडळी तुम्हास अधिक सांगणे न लगे. खा आणि जिरवा :-)

ज्यांची वजन कमी करण्याची तक्रार आहे त्यांना माझा एक प्रश्न आहे. वजन कमी करण्यासाठी खाणे कमी करणे किंवा त्यात बदल करणे ह्याव्यतीरिक्त तुम्ही आणखी काय करुन बघितले आहे? कधी व्यायामाचा विचार केला आहे का? कुठला व्यायाम?

अन्न ही शरीराची गरज आहे. तुम्ही भूक मारुन वजन कमी करत असाल तर त्याचा तुमच्या संपूर्ण मानसिक आणि शारीरिक प्रकृतीवर वाईट परिणाम होणार. मी बघितले आहे, ज्यांचे वजन जास्त असते ती मंडळी खूप खादाळ वगैरे असे काही नसते. पण एखाद्याची निसर्गतः वाढच तशी असते. मग त्याला कमी खा असे म्हणने चुकीचे आहे.

माझे असे अगदी ठाम मत आहे की तुम्ही जरुर लागते तितके अन्न खा पण त्याची झिज होण्यासाठी आवश्यक तो व्यायामही करा. मग तुम्ही वजन तर कमी करू शकालच खेरीज तुमचा बांधा पण डौलदार राहील.

जाता जाता अजून एक सांगतो की हल्लीच्या काळात I am on diet असे म्हणनेही पुढारलेपणाची ओळख झालेली आहे.


Lopamudraa
Thursday, July 13, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझा bb चुकला.. पण या ठिकाणी gmd बद्दल सगळे आपले अनुभव लिहित आहेत, आणि या diet मध्ये जास्तीत जस्त खा तेही पौष्टिक असे सांगितलेय
कुठेही उपाशी रहा म्हटलेले नाही.. आणि.. व्यायमाचा bb aaNi yogaachaa स्वतन्त्र bb आहे. तरिहि एक गोष्ट नमुद करते.. योगा खरच उपयुक्त आहे..
आणि जिम ला जाउन मसल बनवायचे हे चुकिचे आहे कारण मी गेली काही वर्ष नियमित जिम करतेय.. तसेच.. योगाही करतेय..!!!


Moodi
Thursday, July 13, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया काय मग आज अथकसाठी कोणत्या मिठाया? थांब कुवैत बीबीवर लिस्ट टाकते. अन वाळवंटात असलीस म्हणून काय झाले? ही लिंक वाच.

http://www.loksatta.com/daily/20060713/viva02.htm

Lopamudraa
Thursday, July 13, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया तुझी आठवण काढुन भाजणीच थालिपिठ खाल्ल ग...
कस चालु आहे तुझ!!!.. तु मी सन्गितलेली idea कर जर हे नको वाटत असेल तर...पहुणे खुश झालेत का मग..!!!


Nalini
Thursday, July 13, 2006 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण हा डायट करतेय. आज सहावा दिवस.
ह्या डायट मुळे सर्वात चांगली सवय लागते ती म्हणजे नियमित भरपुर पाणी पिण्याची.
सर्वांचे अनुभव आणि मार्गदर्शन यामुळेच आजपर्यंत तरी हे डायट सुरु आहे.
जया, तुझी खरच कसोटी आहे आज...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators