Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ब्रेड

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » ब्रेड « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 30, 200620 11-30-06  11:16 am

Sami
Thursday, November 30, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

self raising flour मधे already baking powder घातलेली असते. त्यामुळे वरून add करावी लागत नाही.

Uno
Thursday, November 30, 2006 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi,
Sultana manaje nakki kay?

thanks

Dineshvs
Friday, December 01, 2006 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उनो, मूडि सध्या देशात आहे. तिच्यावतीने मी उत्तर देतोय. सुलताना म्हणजे बेदाणे.

Swa_26
Thursday, December 21, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडील एका पुस्तकात मी असे वाचले की, यीस्टला पर्याय म्हणून दिले आहे, ब्रेड नारळाच्या पाण्यात २ दिवस भिजवून ठेवावा आणि ते वापरावे.
कोणी असा प्रयोग केला आहे का?
दुसरे असे की सेल्फ़ रेसिंग फ्लोर म्हणजे मैदा की गव्हाचे पीठ??


Dineshvs
Thursday, December 21, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रेड नारळाच्या पाण्यात भिजवुन यीस्टला पर्याय म्हणुन वापरता येतो. साधी चपातीची भिजवलेली कणीक साध्या पाण्यात बारा तास बुडवुन ठेवली तरी त्यातुन खमीर तयार होते.
अर्धी वाटी चणा डाळ घेऊन त्यावर उकळते पाणी ओतले आणि त्यात एक बटाटा कच्चा ठेचुन टाकला तरी चोवीस तासात यीस्ट तयार होते.
हि सगळी मिश्रणे उबदार जागी ठेवावीत. त्यावर फेस आला कि यीस्ट तयार झाली असे समजावे. वास आंबुस आला पाहिजे पण वाईट नसावा. त्यावर बुरशी नाही ना याची खात्री करुन घ्यावी. कुठलेहि भांडे वापरायच्या आधी उकळत्या पाण्यात बुडवुनच घावे.
तशी दाणेदार यीस्ट आता सहज मिळते. पाव करण्यासाठीच नव्हे तर नान करण्यासाठी, ईडली डोश्याच्या पिठातहि वापरता येते.
सेल्फ रेझिंग फ़्लोअर म्हणजे काहि जास्तीची द्रव्ये मिसळलेला मैदा. त्याची चर्चा ईथे हल्लीच झाली होती.


Swa_26
Friday, December 22, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dineshda, Thanks for your reply...

पण अजून काही शंका आहेत...
१) हे जर ब्रेड आणि नारळपाण्याचे यिस्ट वापरायचे असेल तर त्याचे प्रमाण किती घ्यावे?
२) नुसत्या गव्हाच्या पीठाचा ब्रेड नाही बनणार का?


BTW मी काल तुमची 'कचोरी कोफ्ता करी' बनवून पाहीली, मस्त झाली होती.... सगळ्यांना आवडली!!!

Dineshvs
Friday, December 22, 2006 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तयार यीस्ट ताजी असेल तर खुपच प्रभावी असते. पण अशी घरगुति यीस्ट जास्त प्रमाणात वापरावी लागते.
म्हणजे जेवढे यीस्टचे मिश्रण असेल त्याचा साधारण सहापट पिठ त्यात भिजते.
यीस्टचे जिवाणु असल्यामुळे, ते एक जिवंत मिश्रण असते. यीस्ट मिसळुन पिठ भिजवल्यानंतर हवेच्या तपमानाप्रमाणे अर्धा तास ते दोन तास या वेळात, पिठ आकाराने किमान दुप्पट व्हायला हवे. त्या नंतर ते परत मळुन परत फ़ुगवायचे असते. या अवधीत, यीस्टच्या जिवाणुंची वाढ होत असते.
नुसत्या गव्हाच्या पिठाचा ब्रेड नक्कीच बनतो, पण तो मैद्याच्या ब्रेड एवढा फुगत नाही. बाजारात मिळणारा ब्राऊन ब्रेड खुपदा, कॅरमेलने रंगवलेला असतो. राय ब्रेड जे असतात, ते वजनाला आकाराच्या मानाने जड लागतात, हे अनुभवले असेलच. पण असे ब्रेड चवीला मात्र खुपच छान लागतात.


Me_mastani
Sunday, November 25, 2007 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रेड स्टिक्सची रेसिपी मिळू शकेल का?

Nandini2911
Monday, January 28, 2008 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गार्लिक ब्रेडची रेसीपी हवी आहे. आणि डिनर रोल्सची पण...

Dineshvs
Monday, January 28, 2008 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, मला प्लीज एक ईमेल करुन ठेव. सवडीने फोटो पाठवीन.

गार्लिक ब्रेड मी आधी लिहिला होता, नाहीच सापडला तर परत लिहीन.


Shonoo
Tuesday, January 29, 2008 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेकिंग विथ जुलिआ या पुस्तकातून साभार

१ टे स्पून ( किंवा १ पॅकेट) अक्टिव्ह ड्राय यीस्ट याच नावाने सर्व ग्रोसरी मधे मिळते,
१ टे स्पून साखर
अडीच कप कोमट पाणी ( १०० ते १०५ डिग्री फ़ॅरेन्हाइट)
१ टे स्पून मीठ
सहा ते सात कप ब्रेड फ़्लोअर ( King Arthur चे सगळ्यात बेस्ट)
१-२ ते स्पून ऑलिव्ह तेल.

एका स्वच्छ, कोरड्या परातीत किंवा मिक्सिंग bowl मधे यीस्ट, साखर अन अर्धा कप कोमट पाणी मिसळून पाच ते दहा मिनिटे ठेवावे.
मिश्रण थोडेच फसफसून येईल. मग उरलेले दोन कप पाणी अन तीन कप पीठ घालून लाकडी उलथण्याने ढवळावे. पूर्ण एकजीव झालं की अजून तीन कप पीठात मीठ मिसळून मग ते पीठ यीस्ट च्या मिश्रणात घालून मळावे. पीठ चांगले मिळून आले पाहिजे. मग ओट्यावर किंवा कटिंग बोर्डवर कणीक भुरभुरवून कणकेचा गोळा चांगला तिम्बून घ्यावा. व्यायामा परी व्यायाम शिवाय मनातल्या मनात कोणाला लाखोली वाहत कणीक मळली तर stress relief पण! पाच सात मिनिटे तरी मळली पाहिजे. मग कणकेच्या गोळ्याला सगळी कडुन तेल लावून झाकून ठेवावा. जरा उबदार जागी ठेवावा. स्वैपाकघर बेस्ट. Avoid drafts .

दीड एक तासाने गोळा चांगला फुगून येईल. परत ओट्यावर थोडं थोडं पीठ घालून पाच एक मिनिटं मळावं. मग त्या गोळ्याचे दोन भाग करून, प्रत्येक भाग लाटण्याने वा हाताने साधारण नऊ इंच रूंद अन बारा इंच लांब असा पसरावा. ह्या चौकोनाच्या तीन घड्या घालाव्या अशा की शेवटी नऊ बाय चार असा चौकोन होइल. चार इंच वाल्या बाजूच्या कडा नीट एकमेकीवर 'पिंच' कराव्यात. मग नऊ बाय चार बाय पाच अश्या ब्रेडच्या दोन पॅन ला आतून तेल लावून हे चौकोन घालून ठेवावे. मी जवळ जवळ दोन तास टेह्वले. पुस्तकात ४५ मिनिटे लिहिलं होतं! मग ३७५ च्या ओव्हन मधे bottom third मधे ३५ ते चाळीस मिनिटे भाजावे.
बाहेर काढल्याबर लगेच पॅन मधून काढून वायर रॅक वर गार करून घ्यावे.


Chinnu
Tuesday, January 29, 2008 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू खूपच धन्सं तुला. करून पाहते.

Dineshvs
Wednesday, January 30, 2008 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गार्लिक ब्रेड

याचे अनेक प्रकार, एक जो मॅकडोनाल्ड मधे मिळतो तसा.

यासाठी शक्यतो फ़्रेंच ब्रेड घ्यावा. त्याचे तिरके तुकडे करुन घ्यावे. मग त्यावर नेहमीचे बटर लावुन घ्यावे.
लसणीचे बारिक तुकडे करुन घ्यावेत. त्याला मीठ व मिरपुड लावावी, हे मिश्रण आवडीप्रमाणे ब्रेड वर लावावे. वरुन चीज किसुन लावावे. मग ओव्हनमधे चीज वितळेपर्यंत ग्रिल करावे.

दुसरा हेल्दी प्रकार.
लसणीचे बारिक तुकडे एका बोलमधे घ्यावेत. त्यात मिठ मिरपुड घालावी. त्यात लिंबाचा रस व ऑलिव्ह ऑईल घालावे.
ब्रेडचे त्रिकोणी तुकडे करुन, तेलतुप काहिही न लावता तव्यावर गुलाबी भाजुन घ्यावेत. मग हे तुकडे वरील लसणाच्या मिश्रणात बुडवुन खावेत.

हा खास माझा प्रकार.
स्लाईस न केलेला साधा ब्रेड घ्यावा. अर्धी वाटी बेसन जरा भाजुन घ्यावे. त्यात वाटलेली लसुण, मिरची वा लाल तिखट घालावे. भाजुन कुटलेले जिरे घालावे, कोथिंबीर बारिक कापुन घालावी. हिंग घालावा. त्यात कच्चे तेल घालुन मिश्रण भज्याच्या पिठापेक्षा थोडे घट्ट भिजवावे. यात हवे तर तिळ किंवा दाण्याचे कूट घालावे
आता ब्रेडला तिरक्या चिरा द्याव्यात. त्यात हे मिश्रण अलगद भरावे. उरलेले वरुन चोपडावे. मग हा अख्खा ब्रेड एकत्र दाबुन, ओव्हनमधे खमंग वास येईपर्यंत भाजावा. मायक्रोवेव्ह मधे भाजताना काळजी घ्यावी कारण हा ब्रेड आतुन गरम होवुन करपायची शक्यता असते.


Chioo
Tuesday, February 19, 2008 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बनपाव कसा करतात? त्याची कृती मिळेल का?

काही ब्रेडच्या कृतींमधे लोफ टीन / ब्रेडचा साचा आहे. तो नसेल तर चालेल का? Bread flour नसेल तर काय वापरता येईल?


Malavika
Tuesday, February 19, 2008 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

whole wheat bread पुण्यात सहजपणे मिळतो का ?

Deepa_s
Tuesday, July 01, 2008 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दादा, (इतरांना माहित असेल तरी सांगा!)
बाजारी यीस्ट शिवाय ब्रेड करावा अस मनात आहे. मी सोअर डो ची रेसिपी वाचली इंटरनेटवर. हे धाडस कराव का? तुम्ही काही रेसिपी आणि टिप्स देऊ शकाल का?


Dineshvs
Tuesday, July 01, 2008 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काही सूचना दिल्या होत्या. यीस्ट नसल्यास, घरगुति स्वरुपात ती करता येते.
यीस्टचे अनेक प्रकार आहेत. त्यामूळे तयार केलेली यीस्ट वेगळ्या प्रकारची असेल तर नेहमीचा स्वाद येत नाही.
पण येतो तो स्वाद वेगळा असला, तरी वाईट नक्कीच नसतो.
अवश्य करुन बघा. माझ्या शुभेच्छा आहेतच.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators