Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

Archive through June 19, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » आहारशास्त्र » ज़नरल मोटर कंपनीचा Diet Program » Archive through June 19, 2006 « Previous Next »

Sunilt
Sunday, June 18, 2006 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपणापैकी बरेच जणांनी General Motor ह्या कंपनीने आहारतज्ञांच्या मदतीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी बनविलेल्या Diet बद्दल ऐकले-वाचले असेल.

मी गेले आठवडाभर हा Diet करीत होतो. आज शेवटचा दिवस !

ह्या Diet चे वैशिष्ठ्य म्हणजे, ह्यात तुम्ही किती खाता यावर निर्बंध नाहीत. अगदी पोटभर खा. निर्बंध आहेत ते त्या त्या दिवशी कोणते पदार्थ खायचे यावर.

एकूण सात दिवसांच्या ह्या Diet program मध्ये पहिल्या दिवशी फक्त फळे (केळी सोडून), दुसर्‍या दिवशी फक्त भाज्या (उकडलेल्या) इ. असा कार्यक्रम असतो. बाकी पोळ्या-भात-आमटी-भाजी वगैरे काही नाही !

लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे रोज किमान १०-१२ ग्लास पाणी पिणे आणि चहा-कॉफी (दुध्-साखर) घातलेली न पिणे.

कंपनीच्या दाव्यानुसार तुमचे वजन किमान ५-८ किलो कमी होते. हा दावा अर्थातच अतिरंजीत आहे. माझे वजन आत्तापावेतो ३ किलो कमी झाले आहे. अर्थात उद्यापासून नेहेमीचे जेवण सुरू केल्यावर त्यात किमान अर्धा-पाऊण किलोनी वाढ झाली तरी, दोन्-अडीच किलो तरी घट झाली असे म्हणायला हरकत नाही.

शिवाय आणखी एका दाव्यानुसार, ह्या Diet Program मुळे तुमची System देखील स्वच्छ होण्यास मदत होते.

कुणी हा Program केला असल्यास अथवा कुणास अधिक माहिती असल्यास त्यांचे अनुभव वाचावयास मला आवडेल.


Zee
Sunday, June 18, 2006 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sunilt, tu tuzhe anubhav lihi na mhanje aamhala aaNakhin detail madhe maahiti milel.

Arch
Sunday, June 18, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि सुनील, सात दिवसाचा diet program काय होता तेपण लिही.

Lopamudraa
Sunday, June 18, 2006 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगला आहे हा, programme ,मला वाटत होते याचा भाग सुरु करावा, बर झाल
arc, general moTor diet, google search kar, तुला सगळी माहिती मिळेल, जास्त जाड असणार्‍या मध्ये लगेच फ़रक जाणवतो पण फ़ारसे..जास्त वजन ज्यांना कमी कमी करायचे नाही त्यात थोडे slow वजन कमी होते.. घरात एकदा हा प्रयोग मी केला, तर सगळ्यांच्या आहारात प्रचंड बदल झाला.. आता मला जे दिसतील (जास्त वजनदार)त्यांना मी याबद्दल सांगत असते. जिभेला. जास्त चटोरे खायची सवय होति, ती कमी(जवळ जवळ बन्द) झाली तळण वैगैरे ही खाण कमी झाले.
मला तर खुप आवडला हा प्रयोग.. आता अगदी balanced आणि digestive system तर सुरळीत व्यवस्थीत काम करायला लागते.मागे मी याबद्दल एकादोघा मायबोलिकर मैत्रींणिशी बोलली होती.


Zee
Sunday, June 18, 2006 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lopmudra, sunil detail madhe liha na. diet programme madhe kiti aani kaay khalle te. google war search karatech aahe. pan tumhala actual anubhav aahe tya mule nakkich jasta mahiti milel.

Savyasachi
Monday, June 19, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हे डाएट केलय. उत्तम आहे. लोपमुद्रा (आणि सुनिल) म्हणते ते खर आहे. 'आहारात प्रचंड बदल झाला.' मात्र यात उपासमार होऊ शकते. (आणि म्हणूनच काही लोक हे डाएट चांगले नाही अस म्हणतात.) पण उपासमारीचे कारण वेगळे आहे. तुम्हाला सतत दिवसभर नुसतीच फ़ळ खायचा कंटाळा येऊ शकतो आणि मग तुम्ही कमी खाता. कृपया तसे करु नका. ते हानीकारक आहे. डाएट मधे सांगितलेले पोट भरेस्तो खा. उपाशी राहू नका.
पहिल्या दिवशी शक्यतो फ़क्त कलिंगडाच्या जातीची फ़ळे खायला सांगितलय. पण यानेच उपासमार होते कारण फ़क्त पाणी पोटात जाते. (आणि मग आपण ते डाएटच सोडून देतो :-) ) त्यामुळे मी तरी सगळी फ़ळे खाल्ली त्या दिवशी. ज्यांना खरच गरज आहे अशांनी ते काटेकोरपणे पाळावे.
हे डॉक अपलोड कस करायच इथे? माझ्याकडे आहे.Milindaa
Monday, June 19, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Savya, part by part upload kar, khup mothe asel tar.

Savyasachi
Monday, June 19, 2006 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

application/mswordthis is that doc I have written earlier about
7DayDiet.doc (24.1 k)
this is that doc I have written earlier about

Savyasachi
Monday, June 19, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks milindaa, the qn was how to upload it :-)
got the ans as slash attach. our friendly hitguj help :-)

Savani
Monday, June 19, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण हे किती दिवस करायचे? एकच आठवडा करायचे का? परत करायचे असेल तर २ प्रोग्राम मधे किती दिवसांचे अंतर ठेवावं?

Kalandar77
Monday, June 19, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, आधी पहिला प्रोग्राम तर कर!

Savyasachi
Monday, June 19, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

savani, i guess in that doc it is written that do it after 3 4 months gap.
but in any case, don't do it again within month's time.
The basic idea is, it changes your eating habit and thus after doing it once, you should be automatically following better diet :-)
that is my personal experience. I had never done that again. (never really required to)Arch
Monday, June 19, 2006 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या, खर म्हटल तर नुसती फ़ळ खाऊन किंवा भाज्या खाऊन पोट भरत नाही पण तोंड भरत आणि त्यामुळे कमी खाल्ल जात असेल. तू म्हणतो ते खर आहे. उपासमारच होत असणार.

Savani
Monday, June 19, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं बरं केडी :-). सव्यसाची, धन्यवाद.

Maitreyee
Monday, June 19, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केला होता हा प्रयोग! आणि हे अगदी खरं की १ आठवड्यात नक्कीच २ ते ३ किलो कमी होते यात वजन.
तसे उपासमार झाल्यासारखे फ़क्त पहिल्य दिवशि वाटले मला. कारण फ़ळे खायचा कंटाळा येतो दिवसभर. काहीतरी गरम खायची इच्छा होते:-)
पण बाकी पुधचे दिवस आपण बरेच variation करू शकतो( उद फ़क्त भाज्य असे जेव्हा असते तेव्हा नुस्ते सॅलद न खाता ग्रिल्ड व्हेज असे प्रकार) त्यामुळे तेव्हा नाही फ़ारसा प्रॉब्लेम आला.


Boss
Monday, June 19, 2006 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Not a threadcrap, just a genuine question...

I just googled 'general moTor diet'. But all the search results shows Indian sites(IIT/IIM etc) and no american website mentions this. Even on GM website there is nothing about it. Do you really believe this is General Motors diet?

Lopamudraa
Monday, June 19, 2006 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक जानेवारीत सा.सकाळ ची health पुरणी निघते त्यात मी पुण्याचे dr.makarnd daabak यानी हा प्रयोग केला त्याबद्दाल वाचले( हे तीन वर्शापुर्वी). आणि दुसर्‍याच दिवशी हा प्रयोग करायला सुरवात केली,त्यात त्यांनी तेव्हा मला आठवते ते.. ५च दिवसाचे diet सांगितले होते, तेव्हा पाच दिवसात माझे वजन तीन किलोने कमी झाले, आनि त्यानंतर हा प्रयोग मी विसरले होते.
पण इथे आल्यावर माझ्या वाचन्यात original प्रयोग कोणी काढलाय कसा ते अगदी detail समजले.
ज्या दिवशी फ़ळे खायची तेव्हा टरबुजा ऐवजी खरबुज वापरले तर जास्त फ़ायदा होतो,
चिकु आंबा अशी गोड फ़ळे खाउ नयेत.
भाज्यांच्या दिवशी काकडी, पानकोबी,फ़्लोवर,काच्चा कांदा ह्यान्चे बारीक चिरुन salad बनवावे, वरुन लिंबु पिळाव.. म्हणजे मिठाचि उणीव भासणार नाही,
अजीबात उपाशी राहु नये.. आणि यात आपली जिभेवर ताबा ठेवायची कसोटी लागते
प्रत्येक तासानंतर त्या दिवशी जे नेमुन दिले असेल ते खायचे..म्हणजे भुक भुक होत नाही.
जर तुम्हि नोकरी करत असाल तर आठ दिवस कुठे निघुन जातात ते कळतही नाही पण जर तुम्हि घरी असाल तर मात्र सगळ डबे भरलेल स्वयंपाक घर आणि चांगले पदार्थ बनवणारे तुमचे हात शिवशिवत असतात.
म्हणुन हे diet चालु असतांना व्यायाम करावा बाहेर फ़िरायला जावे.मन कशातही रमवावे चांगले पुस्तक, tv ई.
क्रमश्:


Lopamudraa
Monday, June 19, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांगितलेल्या दिवशी तेच पदार्थ खावेत.. यात मिठ,शुगर,तेल पुर्ण वर्ज्य.
याची काही वैशिश्टे मला जाणवली ती अशी..मी या diet ची बरीच काथ्याकुट केली आहे... कारण आपण जर आठ दिवस उपाशी राहिलो तरी आपले वजन इतके कमी होत नाही पण यामुळे असे का होते...
तर
यात आपण सगळे unprocessed food\ खातो, हे अन्न +ve energy चे काम करते.तुम्च्या daily needs चा vita & min, prot,cab चा कोटा तुम्हाला मिळतो, पण fats. miLat naahit jii extraa energy शरीराला लागेल ती शरीर साठवलेल्या चरबी तुन घेते.
हे अन्न fiber उक्त असल्याने आपल्याल लवकर पोट भरल्यासारखे वाटते, stoach मध्ये हे food भांडे घासायच्या scrubber सारखे काम करते. आठ दिवसात चिकटलेला मळ घासुन लख्ख करते.
frequently eating मुळे आपन भुकेचा डोंब उसळणे टालु शकतो आणि थोड्या थोड्या आंतराने energy मिळत राहतेआणि अजिबात थकल्यासारखे वाटत नाहि,
(पण माझ्या एक मित्राला खुप भरपेट जेवायची सवय होति.. काला वगैरे मोडुन त्याने हे diet सुरु केल्यावर त्याची जिभ आन्न पोटात ढकलतच नव्हती. त्याल भयानक अशक्त्पण आला दोनच दिवसात कारण तो फ़ारसे खातच नव्हता. आणि त्याच्याकडुन हे diet कधीच झाले नाहि. नेहमी सुरवात करुन दुसर्‍या दिवशी तो जेवायचा. आणि नंतर त्याचे लग्न झाले बायको सुगरन, रोज नवे पदार्थ.. आजही तो तितकाच वजनदार आहे.)
एका किलोने वजन कमी करण्यासाठी आपल्याला.. ७७१६ cal खर्च कराव्या लागतात. यात हे कस होत हे कोडं आहे... पण होत हे मात्र खरे आहे.
याचा मुख्या फ़ायदा skin अगदी गुलाबी होते.
यात आपण मिठ खात नाहि मिठात cal नसल्या तरी. ते पाणि धरुन ठेवते, आणि जेव्हा आपण regular जेवण सुरु करतो तेव्हा म्हणुन आपले वजन परत किलो दोन किलोने वाढते.


Lopamudraa
Monday, June 19, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.iimahd.ernet.in/~jajoo/gmdiet.html
ithe sagali maahiti milel.
vajan kamii karaayachii ghaai nasali tar, halu halu karaave... mhanaje teen divas.. tyaane pan bareech madat hote.खुप जास्त सांगितले वाटते, आता सव्यासाची तुम्हि सांगा.. नाहितर इतर मंडली

Savani
Tuesday, June 20, 2006 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, तू खूप छान माहिती देत आहेस ग. सांग, अजून तुझ्याकडे जी माहिती आहे ती.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions