Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 24, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » बंगाली » Archive through May 24, 2006 « Previous Next »

Mrinmayee
Sunday, April 16, 2006 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला authentic बंगाली recipies माहिती असतील तर टाकाना इथे please . मला 'पटोल भाजा- पाच फोडनची' कृती हवी आहे. देईल का कुणी?

Moodi
Sunday, April 16, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी ही कुठल्या प्रकारची भाजी आहे? माझ्याकडे काही भाज्या लिहील्यात पण त्यात हे नाव नाही म्हणुन विचारले. दिनेशना किंवा इतर कुणाला माहित असेल तर टाकतीलच म्हणा ते.

Mrinmayee
Sunday, April 16, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, बंगाली लोक परवराची भाजी ५ वेगवेगळे ingredients असलेली फ़ोडणी घालून करतात. (मोहरी, कलोंजी वगैरे घालून). ती recipe आहे का तुझ्याकडे? दिनेशदा, तुम्हाला माहिती असेल तर सांगाल का please ?

Moodi
Sunday, April 16, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आलुर पोटेलेर दालना

साहित्य : १ कप पाणी, प्रत्येकी १ मोठा चमचा धणे अन जीरे पुड, छोटा आल्याचा तुकडा, अर्धा किलो परवर(पडवळ), १ मोठा चमचा राईचे तेल, २ मोठे बटाटे, १ तमालपत्र, अर्धा चम. हळद, २ चमचे लाल तिखट,, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, मीठ अन साखर, अर्धा चमचा तुप.

कृती : धणे अन जिरे पुड यात पाणी घालुन त्या पावडरींचे मऊ पेस्ट करावी. आले किसावे(पेस्ट चालेल). बटाटे धुवुन सोलुन त्याचे मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. परवर धुवुन सोलुन त्याचे पण मध्यम आकाराचे तुकडे करावे. त्याचे २ भाग ठेवावेत. कुकरमध्ये तेल गरम करुन प्रत्येक भाग हलकेच तळुन घ्यावा. अन तो काढुन त्यात बटाटे पण परतुन घ्यावेत अन ताटात काढावेत.

कुकरमध्ये उरलेल्या तेलात तमालपत्र घालुन परतुन मग धणे जिरे पेस्ट, आले, हळद, तिखट अन गरम मसाला पुड एक मागे एक अशी घालुन परतत रहावे साधारण १ मिनिट सर्व परतल्यावर परवर, बटाटे, मीठ, साखर अन १ कपभर पाणी घालुन चांगले ढवळुन कुकर बंद करावा. प्रखर आंच ठेवुन प्रेशर आले की लगेच कुकर गॅसवरुन काढावा.
वाफ दबली की मग कुकर उघडुन करी मध्ये तुप घालुन गरमच वाढावे.

माझ्याकडचे लिहीलेले प्रमाण हे जास्त लोकांकरता होते म्हणुन मी त्यात बदल करुन ही वरील पद्धत लिहीलीय. ही करी २ माणसांकरता पुरे होईल. मृण्मयी यात कलौजी लिहीलेली नव्हती दिनेशना माहीत असेल तर ते सांगतील.


Mrinmayee
Sunday, April 16, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank you very much मूडी. तुझी भाजीची recipe खरंच खूप छान आहे. मी नक्की करून बघेन. पण मी खाल्लेली भाजी काहिशी वेगळी होती. ती कृती दिनेशदा सांगतील अशी आशा करतेय:-) but I appreciate the fact that you took time to get me this recipe. Thanks again!

Sanash_in_spain
Tuesday, May 23, 2006 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hello mrinmayee!
मी पान्च फ़ोरन(फ़ोडन) ची पध्दत सान्गत आहे बघ. मोहरी, जिरे, कलोन्जी(कालो जिरे in bengali), मेथ्या, बडिशोप हे सगळे (except मेथ्या) सारख्या प्रमाणात आणि मेथ्या अर्ध्या प्रमाणत मिसळायच्या. Actually कोलकाता ला जी विकत मिळते त्यात पान्ढरी मोहरी असते कधी कधी. आणि आणखी एक spice च प्रकर असतो राधूनी म्हणुन तो पण असतो कधी कधी पण वरची पध्दतच मी वापरते.
तुला एखदी specific recipe पाहिजे असली तर सान्ग. नाहीतर मग मि पुढच्या post मध्ये लिहिते कुठली तरी recipe.
Actually मी आश्विनी भट ची आश्विनी दास आहे आता म्हणुन हे सगळे माहिती.


Amayach
Tuesday, May 23, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, तुला शुक्तो ही बन्गाली भाजी माहिती आहे का ग?

Arch
Tuesday, May 23, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, अग परवर म्हणजे पडवळ नाही ग.

Mrinmayee
Tuesday, May 23, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरं गं आर्च. परवराला 'परवल' हा देखिल शब्द आहे. ईंग्रजीत 'ponted gourd ' म्हणतात. (जास्त माहितीसाठी वेब वर ' Trichosanthus dioica' ह्या botanical नावानी शोधता येईल. हे जरासं तोंडल्यासारखं दिसणारं फळ आहे. (फळभाजी म्हणा)्आ बघा परवराचा फोटो. paravar

Junnu
Tuesday, May 23, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी indian store मधे तुम्ही म्हणत आहात त्या पांच फ़ोडन ची पॅकेट्स पाहिली आहेत. मी एक आणलय, पण अजुन कश्यात वापरलच नाहीये.

Sanash_in_spain
Tuesday, May 23, 2006 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो महितीय ना! ही एक प्रकारची मिक्स भाजी आहे ज्यात वाटलेली मोहरी घालतात. ही भाजी न generally उन्हाळ्यात करतात. मला फक्त मोहरीचे वाटण जरा उग्र वाटते म्हणुन मी खसखस आणि मोहरी सम प्रमाणात वाटते. ह्या साठी ज्या भाज्या वापरतात त्या -
बटाटे, वांगी, मूळा, कारली, कच्ची केळी (भाजीची), बोडी (आपल्या डाळींच्या सांडग्यांसारखेच असतात पण उडदाच्या डाळीचे आणि आकारानी मोठे असतात). बाकीचे साहित्य - तेल, पाँच फोडन, मोहरी आणि खसखस, तिखटासाठी हिरवी मिरची / लाल तिखट / combination of both आणि हळद, मीठ, थोडे साजूक तूप.
कृती : सगळ्यात आधी मोहरी आणि खसखस कोमट पाण्यात भिजत घालावी. समजा वरच्या सगळ्या भाज्या एक एक (1 no. qty each) मध्यम आकारच्या घेतल्या तर साधारण 1 tablespoon each मोहरी & खसखस घ्यायची. मग वरच्या सगळ्या भाज्या उभ्या (finger chips सारख्या) चिरायच्या. त्यांना धुवून हळद-मीठ लावून १० मिनीट ठेवाव्या वेगवेगळ्या. बोडी साधारण मूठभर घ्याव्या. सगळ्यात पहिले बोडी मग एक एक भाजी थोडे जास्त तेल घालून वेगवेगळी बदामी रंगावर shallow fry करुन घ्यावी. आता मगाशी भिजवलेली मोहरी आणि खसखस हवी असेल तर हिरवी मिरची चांगली वाटावी. Blender मध्ये बर्‍याच वेळ फिरवली कि चांगली वाटली जाते पण आपल्या india मध्ये माझा mixer चा अनुभव फार चांगला नाही. पाटा-वरवंटा तर best. जर तेल जास्त उरले असेल तर थोडे काढून उरलेल्यात पाँच फ़ोडन घालून तडातडल्यावर थोडी हळद घालुन सगळ्या भाज्या घालायच्या except बोडी. मग वाटण घालून पाणी घालयचे. थोडे तिखट आणि मीठ घालुन 5 min झाकण ठेवुन सगळ्या भाज्या शिजत आल्या कि मग बोडी घालून आणखी 3 min ठेवून बंद करायचा gas. शेवटी थोडे साजूक तूप सोडायचे.


Moodi
Tuesday, May 23, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नव्हते माहीत ग आर्च. ती कृती माझ्याकडे मागे लिहून ठेवलेली होती, ती पडवळाचीच समजुन दिली चुकुन.

आश्विनी छान माहिती दिलीस या फळभाज्यांसाठी.


Amayach
Tuesday, May 23, 2006 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी भाजीची रेसीपी खुप छान वाटतेय!नक्कीच करुन पाहाते आणी कळवते तुला कशी झाली ते....

Dineshvs
Wednesday, May 24, 2006 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केली होती. तेंव्हा जरा तेलकट वाटली म्हणुन अर्धा चमचा कणीक आणि एक चमचा मिल्क पावडर टाकली होती. त्याने चांगली चव आली.

Sanash_in_spain
Wednesday, May 24, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, great हं! दूधाबद्दल बोलतीये मी, your guess was right कारण मी internet च्या बर्‍याच शुक्तोच्या recipe मध्ये शेवटी दूध घाला असे वाचले आहे. पण मी स्वत: कधी बघितले नाही म्हणुन मी घालत ही नाही आणि म्हणुन लिहिलेही नाही. पण नारळाचे दूध घालून मात्र मी केलेली आहे पण मग त्यात फक्त मोहरी वाटते, खसखस नाही आणि तूप ही नाही.
तेलकट बद्दल मला वाटते भाज्यांच्या फोडी मोठया ठेवल्या तर it might help.


Chioo
Wednesday, May 24, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ashwini mast kruti dilis. hi bhaji vachayala khoop mothi pan karayala sopi aahe. yat doodh aavashyak aahe. nahitar tyala neet consistency yet nahi. ha maza anubhav. :-)

hi bhaji unhalyat khoop changali. jevanachya suruvatila toop/bhatabarobar khayachi. varan na gheta. tyamule ushnata vadhat nahi.

Chioo
Wednesday, May 24, 2006 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aata Potol Bhaja baddal.

Paravarache madhe chirun don ubhe tukade karayache. Tyana halad, mith, tikhat lavun 10-15 min thevayache. nantar mand aachevar sal kurkurit hoiparyant talayache. paravar fresh asale ki, khayala khoop chhan lagatat.

yach padhdhtine vangyache kappan kele jatat. vangi gol gol kapun ghyayachi. tyala halad, mith, tikhat anai thodishi sakhar lavayachi. asach 10-15 min thevun talayache. yat sakhar ghatalyane chhan brown color yeto aani mast kurkurit hotat.

Arch
Wednesday, May 24, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोहोरी उष्ण असते न? मग उन्हाळ्यात चांगली कशी?

Dineshvs
Wednesday, May 24, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, हे ऊष्ण वैगरे प्रकरण मला कळायला जड जाते. आंब्याचे सासव तर ऊन्हाळ्यातच करतात. त्यात मोहोरी असतेच.
कांजी, कांजी वडे पण ऊन्हाळ्यातली खासियत. त्यातहि मोहोरी हवीच कि.


Arch
Wednesday, May 24, 2006 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, अगदी खर. काही समजत नाही. कारण north ला उन्हाळ्यात, गाजराची कांजी असतेच.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators