Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
टोमॅटोचे सार

Hitguj » Cuisine and Recipies » आमटी, कढी, पिठले » टोमॅटोचे सार « Previous Next »

Jojo (Jojo)
Thursday, May 31, 2001 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Traditional Tomatoche saar in a Jiffy
-----------------------------------------------------------
Most of us like this traditional soup, but it is cumbersome in a way.
Blanching tomatoes, pureeing them, grating coconut etc.etc.
This is a very easy preparation and tastes equally good...

For 2 people (again with a good apetite)
Tomato paste (any canned paste...like Hunt's) - 4 tablespoons
Dessicated Coconut (dry) - 2 cups
Oil - 1 tablespoon
Cumin seeds - 1 teaspoon
Kadipatta - 5/6 leaves
Chopped Cilantro (kothimbeer)leaves (optional)
Asafoetida (hing) - a pinch
Pepper powder - a pinch
Salt - for taste

1. Add hot water to the coconut powder enough for it to soak and set it aside for 10 mins.
2. Grind this mixture with more water and strain it through a strainer.
Repeat again to extract some more coconut milk. Keep aside this extract.
3. Mix the tomato paste well with 3 cups of water and bring to a boil.
4. Add the coconut extract and let it boil again for 2 minutes.
5. In a seperate wok, heat the oil. Add the asafoetida, cumin seeds, kadipatta
and let them splutter.
6. Add this seasoning to the tomato mixture along with salt/pepper and again bring to boil.
7. Garnish with chopped cilantro and serve hot with rice.

This recipe can have many variations by altering the seasoning...eg. use Toop instead of oil for the phodni and you can then use grated ginger instead of pepper etc.

Dineshvs
Friday, May 26, 2006 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहा सात लाल मिरच्या व चमचाभर धणे तेलात परतुन घ्यावे. व वाटुन ठेवावे. सुपारी एवढ्या चिंचेचा कोळ काढावा.
तेलाची फ़ोडणी करुन त्यात राई, कडीपत्ता व हिंग हळद घालावे. त्यात चार टोमॅटोच्या फ़ोडी घालुन जरा परतावे. मग कोळ घालावा. मसाला घालावा. मीठ घालुन ऊकळावे.
हा प्रकार तिखटच असतो.
दहिभातावर छान लागतो. मला जास्त तिखट चालत नसल्याने मी थोडे नारळाचे दुध घालतो.


Bee
Friday, May 26, 2006 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, मस्त आहे हो ही कृती. धने पावडर चालू शकेल असे वाटते..

Amayach
Friday, May 26, 2006 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dinesh, recipe vaachun tondala paani sutale ho..khup chaan recipe aahe... aaj mala devganagrit lihita yet nahi.. mahit nahi kaa

Dineshvs
Friday, May 26, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee धणे पावडर चालेल, पण जरा तेलात परतुन घे.

Sunidhee
Friday, May 26, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साजुक तुपाची फोडणी फक्त जीरे आणि हिन्ग घालुन ही मस्त लागते.

Mita
Friday, May 26, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असे करते सार.
३ मध्यम tomato कुकरमधे शिजवुन puree करुन घ्यायचे.साजुक तुपामधे जिरे,हिंग(नेहमीपेक्शा जास्त),एका मिर्चिचे तुकडे,कडिपत्ता यांची चरचरीत फ़ोडणी देउन puree घालावा. पाणी घालुन वरुन मिरपुड आणि गुळ घालुन मस्त उकळि आणावी.एकदम सात्विक आणि चविष्ट.
30 min meal साठिची माझी आवडती रेसिपी आहे.सार-भात-पापड- asparagus,mushroom stirfry :-).


Ninavi
Friday, May 26, 2006 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोमॅटो आणि शिवाय चिंचेचा कोळ? माझे वाचूनच दात आंबले. मग यात तुरीची डाळ घातली घोटून की रसम झालं की.

Dineshvs
Saturday, May 27, 2006 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, हे बरेच तिखट असते. वरणभातावरहि घेता येते.

Malavika
Monday, June 26, 2006 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिता,
अस्परगस मश्रूम स्टर फ़्र्य चि कृती देता येईल का?


Mita
Tuesday, June 27, 2006 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालविका,(छान नाव आहे)
तिकडे indian chinese BB वर दिली आहे रेसिपी.


Aashu29
Wednesday, June 28, 2006 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं मि असे करते बरे टोमाटो सार
कोकम आणि लाल मोठि मिर्चि पाण्यात भिजवुन ठेवावि(कोळसाठि)
ओले खोब्रे आले लसुण, थोडासाच कान्दा आणि उकडलेले साल काढलेले टोमाटो मिक्सर मधुन काढून बारिक करावे.
मग तेलात जिरे मोहरि हिंग कढिपत्ता फ़ोडनि करुन हि पेस्ट टाकावि आणि लगेच पाणि टाकावे मिश्रण शिजवु नये
मग त्यात मिठ थोडे तिखट थोडि हळद आणि धने पावडर टाकुन तो मघाचा कोळ टाका, आणि उकळि येउ द्या.
मस्त फ़ूरके मारत प्या, किंवा भातासोबत खा आणि बरोबर fired fish

Milindaa
Wednesday, June 28, 2006 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे वाचूनच दात आंबले. <<<< (तूच केलेले) लाडू खा म्हणजे बरं वाटेल

Lalu
Wednesday, June 28, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नको, मग तर तुटतीलच ते. त्यापेक्षा आंबलेले बरे! ~D

Sharmila_72
Tuesday, April 24, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोमॅटो सार प्रकार १

तीन वाट्या उकडून घेतलेल्या टोमॅटोचा रस, साधारण दीड वाटी नारळाच दूध एकत्र करून यात ठेचलेल आल, ५-६ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, मीठ साखर घालून ठेवा. तुपाची जीरे, हिंग घालून फोडणी करा. यावर हे मिश्रण ओता. छान वास सुटेल घरात. सतत ढवळत रहा नाहीतर फुटण्याची शक्यता असते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरवा आणि घ्या गरम गरम भाताबरोबर.

प्रकार २

उकडून घेतलेले टोमॅटो, नारळाच दूध एकत्र करून ठेवा. यात जीरे पावडर, मीठ साखर(तीन चमचे), चिंचेच बुटुक, ६-७ लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट घालून ठेवा. तुपावर थोडी राई, हिंग, अख्ख्या हिरव्या मिरच्या मध्ये चीर दिलेल्या, कढीपता, थोडेसे लाल तिखट अशी फोडणी करून त्यावर हे मिश्रण ओता. ढवळत रहा. कोथिंबीर घालून उतरवा. फोडणी करताना विशेष काळजी घ्या- मिरच्या, कढीपत्ता हिरव राहील पाहीजे. लाल तिखट जळू देऊ नका.


Bee
Tuesday, April 24, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, धन्यवाद छान सोपी आहे ही कृती..

Addy
Tuesday, April 24, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक सोप्पी कृती:
४ मध्यम टोमॅटो कूकरमध्ये उकडुन घ्यायचे. मग थोडे कोमट झाले की ब्लेंड करायचे. मग त्यात २ डाव नारळाचे दुध घालायचे. कढईमध्ये तेल गरम करायचे. त्यात साधारण २ चहाचे चमचे ओवा आणि थोडेसे लाल तिखट घालायचे. लगेच टोमटोचे मिश्रण घालायचे. मिश्रण दाट वाटले तर थोडे पाणी घालायचे. मीठ आणि थोडी साखर घालुन उकळायचे.
खूप छान गुलाबी रंग येतो. गरम गरम प्यायचे किंवा भाताबरोबर खायचे.
ओवा तिखट असल्याने लाल तिखट अगदी थोडेसे, रंग येण्यापुरते घालायचे. साखरेचे प्रमाण टोमॅटोच्या आंबटपणानुसार कमी जास्त करायचे. नारळाचे दुध मी टिनमधले वापरते. घरी काढलेले दुध थोडे पातळ असते, ते थोडे जास्त घालायचे.


Bee
Tuesday, April 24, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडी, छान आहे रे तुझी कृती. ओव्याची चव मलाही आवडते. पण २ चमचे ऐवजी मी अर्धा चमचे घालीन :-)

Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी चार चमचे घालेन म्हणतेय.. पाव किलो ओवा संपवायचा आहे ना.. :-) पण कृती एकदम झकास आहेत, कधीतरी वरणा ऐवजी करता येईल.

Addy
Tuesday, April 24, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मी 'रे' नाही 'ग' आहे.

Sunidhee
Tuesday, April 24, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाऽऽऽ साधे टॉमॅटोचे सार आणि किती वेगवेगळ्या कृती आहेत? मस्त वाटताहेत सर्व.. १-१ करुन सर्व करुन पाहीन आता..

Bee
Wednesday, April 25, 2007 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडी, काल मी तुझी आणि सुनीधीची कृती एक केली. इतका छान चवदार झालाय ना हा सार.. ओव्याची चव खूपच छान लागत होती. मी टोमॅटो उकळतानाच त्यात ओवा पेरला होता त्यामुळे तो छान टमटम होऊन त्याचा पुर्ण अर्क सारात उतरला होता. मग लाल तिखट, एक दोन मिरी मीठ आणि चिमुटभर साखर घालून डाव घेऊन त्याला फ़िरवले. नारळाचे दुध टोमॅटो उकळून झाल्यानंतर घातले. काहीकाही टोमॅटोच्या फ़ोडी पुर्णपणे मॅश होऊ शकल्या नाहीत. त्याची सालं वरती तरंगत होती. मला वाटल मी मिक्सरमधून परत एकदा फ़िरवावे पण फ़ेस येईल म्हणून राहू दिल.

असो.. परत एकदा आभारी आहे ऍडी, सुनीधी.. :-)


Cutepraj
Friday, May 04, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टाॅमेटोच्या साराची अजुन एक क्रुती
माझ्या सासुबाइ असं करतात

वाढ्णी ४ जणांसाठी

७,८ मध्यम आकाराचे टाॅमेटो प्रथम शिजवुन नन्तर ब्लेन्डर वापरुन त्याचि प्युरी करुन घ्ययचि. प्युरी करतानाच त्याच्यत एखादी हीरवी मिरची थोडसं आलं घालाव. नन्तर ते गाळुन सालं वगैरेचा चोथा कढुन टाकायचा. मग मन्द गस वर एका पातेल्यात उकळायला ठेवायच. त्याच्यात बारीक चिरलेला कढीपत्ता., कोथिंबीर चवीपुरते मीठ आणि साखर घालावी. हे सार जरा गोड्सरच चांगले लागते.

वरुन फ़ोडनी वगैरे पन द्यायची गरज नाहि.

डाळ तांदुळाचि खिचडी, कच्चा कांदा, भाजलेला पापड, आणि हे गरमागरम सार मस्त बेत!

सार गार झाल्यावर त्याच्यात मस्त ताक घालुन प्यायच...........

अन्न हे पुर्णब्रम्ह!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators