Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
साबुदाण्याची चकली ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपवासाचे पदार्थ » साबुदाण्याची चकली « Previous Next »

Dineshvs
Thursday, May 18, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्धा किलो बटाटे ऊकडुन कुस्करुन घ्यावेत. एक वाटी साबुदाणा नेहमीप्रमाणे भिजवुन घ्यावा. मग दोन्ही एकत्र करावे. त्यात मीठ, वाटलेल्या मिरच्या वा तिखट, आणि थोडे कुटलेले जिरे घालावे. मळुन एकजीव करावे. तिखटमीठाचे प्रमाण आवडीप्रमाणे. याच्या चकल्या करुन ऊन्हात कडकडीत वाळवाव्यात. मग आयत्यावेळी तळुन खाव्यात.
साबुदण्याचे पीठ थोडे घातले तर चकल्या सुबक होतात. साबुदाणा कोरडाच भाजुन त्याचे पीठ करायचे.


Swati_patel
Thursday, July 19, 2007 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
शेवटी १४ जुलै ला माझा चकली करायचा मुहुर्त लागला. तब्बल १ वर्ष १ महिन्या नंतर :-)
छानच झाल्या.
पण तुकडे तुकडे झाले. चकली चा आकार आला नाही. मी साबुदाण्याचे पिठ घातले नव्हते. या शनीवारी तसे करुन पहिन.

Thanks for recipe

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators