Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बंगाली

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » बंगाली « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 24, 200620 05-24-06  7:00 pm

Dineshvs
Thursday, May 25, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, म्हणुन मला वाटत, ऊष्ण शीतल हे वर्गीकरण व्यक्तिसापेक्ष असावे. आपल्याला जे चालते ते त्या दिवसात खावे, आणि तेहि प्रमाणात. नाहि का ?

Bee
Thursday, May 25, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही हे उष्ण असते ते थंड असते असा तो पदार्थ खाल्ल्यानंतर कधी अनुभव आला नाही. उन्हाळ्यात आंबे खातो.. पण आंबे हे उष्ण असतात असेच सांगितले आहे. मला वाटतं आपण एखादी गोष्ट किती प्रमाणात खातो हे महत्त्वाचे आहे. अति आंबे खाल्ले तर पोट दुखेल, घामोळ्या अधिक येतील.

दिनेश, तुम्ही कधी चिवईची भाजी बघितली का? मागे मी लिहिले होते त्यावर की ही भाजी हाती घेऊन निवडता येत नाही. त्याकरिता नारळाच्या दोरीची बाज असायला हवी. ती भाजी त्या बाजेवर पसरविली की भाजीला जरा मागे पुढे करायचे. मग पाने पाने लगेच खाली गळतात आणि वर भाजीचे धागे उरतात. खूपच मजेशिर प्रकार आहे ह्या भाजीचा. मग पिठ पेरून ही भाजी अतिशय छान लागते. अगदी घट्ट गोळा होते ही भाजी आणि एक विशिष्ट गंध असतो ह्या भाजीला. शेपू नंतर गंधाबाबात हीच भाजी असेल असे वाटते. ही भाजी खूप उन असले की बाजारात पोत्यानी विकायला येते. अर्धा पोते भाजी निवडून एक मोठे पातेले होईल. मग खरी भाजी केली ती त्याच्या चार भाग अजून कमी. किती मजेशिर आहे ना.. :-)

अजून एक वैशिष्ट्य आहे ह्या भाजीचे. ते म्हणजे उन्हाळ्यात जर एखादी बाई बाळंतीन झाली असेल तर ही भाजी धोतरात गुंडाळुन ठेवायची नि त्यावर बाळाला झोपवायचे. अशानी Dehydration चा त्रास होत नाही बाळाला. पण हे खरेच कुणी केले असेल का असा प्रश्न मला खूपदा पडला. ह्यावेळी एकतर लोड शेडींचे दिवस आणि मी प्रसुती दवाखान्यात ३ दिवस ताईच्या काळजीला होतो. तेंव्हा तिथे चार बायकांनी आपल्या लेकीबहिणींच्या बाळाला चिवईच्या भाजीत ठेवले होते. आम्हाला हा प्रकार खूपच आवडला. मला तर प्रचंड नवल वाटले ह्या गोष्टीचे.

अजून एक कथा वर्‍हाडातीलच. बलमा नावाची एक काकडी आहे. ही काकडी हिरवीगार आणि शेवग्याच्या शेंगांप्रमाणे पातळसर असते. पण सापासारखी वेटोळा घालून असते. तुम्ही जर ऐतिहासिक तालुका बाळापुरचे नाव ऐकले असेल तर तिथे ही काकडी विपुल प्रमाणात उन्हाळ्यात सुगीला येते. ह्यावेळी ही बलमा काकडी मी खावून बघितली. इतका सुंदर स्वाद काकडीचा असू शकतो असे कधी वाटले नव्हते. ह्याशिवाय, मुळातच ही काकडी अंगानी हिरवीगार आणि स्वच्छ असते. भर उन्हाळ्यात दुपारच्या वेळी ह्या काकडीला दव धरते आणि कडक उन्हापासून ही काकडी आपले रक्षण स्वतच करते. ही देखील नवल वाटण्यासारखी निसर्गकिमया आहे.


Dineshvs
Thursday, May 25, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee मजेशीरच प्रकार आहे चिवईचा. ( पण जरा अधिक वर्णन कर ना भाजीचे ) शेवग्याच्या पाल्याची भाजी करताना पण असेच करावे लागते.
आणि बलमा काकडीला कोल्हापुरात वाळुक म्हणतात. यात पण पोपटी आणि थोडीशी नक्षी असलेला असे दोन प्रकार आहेत. पुर्वी या काकड्या पाण्यात घालुन ठेवायचे. आता मुंबईत पण मिळतात या. चव मात्र खुपच छान.


Sanash_in_spain
Tuesday, May 30, 2006 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज ना बंगाली लोक संक्रांतीला काय गोड करतात ते लिहीते. पीठेपूली, दूधपूली आणि पाटीशापटा. तर पीठेपूली म्हणजे आपले उकडीचे मोदकच पण आकार वेगळा. लंब गोल आणि दोन्ही कडांना निमूळता असा आकार. बाकी सगळ सारखच.

दूधपूली पण अशीच करुन घ्यायची पण आतल्या सारणात गूळ नाही घालायचा आणि वाफवायची पण नाही. तर गरम दूधात सोडून, दूध आटवायचे जरा. आणि मग साखर वेलची वगैरे घालायचे. कोणी कोणी सारण पण गोड च करतात. दूधपूलीचा आकार मात्र लहान करावा.

पाटीशापटा म्हणजे sort of pancakes with milk+coconut stuffing एकाला अर्धा म्हणजे 1 cup maida 1/2 cup rice flour असे दूधात भिजवून pancakes (धिरडी) करावीत. मग आतमध्ये खवलेला नारळ आणि आधीच आटवलेल दूध( or condensed milk can be used पण मग मजा नाही येत) एकत्र करून थोड आणखी आटवून साखर घातलेले सारण भरून डोश्यासारखे fold करायचे. धिरड्यांसाठी फक्त मैद्या पण वापरतात कोणी.


Sampada_oke
Tuesday, June 06, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला दूधपूली आणि पाटीशापटा दोन्ही आवडले, थोडेसे आपल्या घावन घाटल्याच्या जवळचे वाटतात. आता नक्कीच करुन बघेन.
अश्विनी, तू प्रत्येक महिन्यात येणारे बंगाली सण आणि तेव्हा केले जाणारे पदार्थ अशी लेखमाला सुरु कर ना. आम्हांला वाचायला नक्कीच आवडेल.:-)


Dineshvs
Tuesday, June 06, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण आवडेल बरं का. वाचायला आणि करुन बघायला पण.

Sanash_in_spain
Wednesday, June 07, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा, छान सुचवलेस तू. मी प्रयत्न करीन. प्रत्येक महिन्याचे सण वगैरे तर थोडे अवघड आहे पण मला जे जे माहिती आहे ते नक्की लिहीन.

Lopamudraa
Wednesday, June 07, 2006 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग.. अश्विनि छान सुचवले आहे खरच वाचायला नव्या भागाची ओळख करुन घ्यायला...फ़ार आवडेल...!!!

Chioo
Tuesday, June 20, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल बंगाली पद्धतीने खिचडी केली होती. थोडी वेगळ्या प्रकारची.

साहित्य
काळ्या पाठीची उडदाची डाळ आणि तांदुळ समसमान. उकडा तांदुळ असेल तर जास्त चांगले.
थोडी आल्याची paste
तमालपत्र
गरम मसाला
एखादा tomato बारीक चिरून.
मिरची

तेल गरम करून फ़क्त जिर्‍याची फ़ोडणी द्यावी. त्यात गरम मसाला, थोडी हळद, आल्याची paste , मिरचीचे तुकडे घालून एक सेकंद परतावे. मग tomato टाकून तो मऊ होइपर्यंत परतावा. थोड रस असतानाच धुवून ठेवलेले तांदुळ-उडिद डाळ टाकावी. परतून तिप्पट पाणी घालावे. मीठ आणि साखर चवीप्रमाणे घालावी.

गरम गरम खायला खूप मस्त लागते. :-)


Suparna
Tuesday, September 04, 2007 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंगाली मिष्टी दोई कसं करायचं?

Dineshvs
Tuesday, September 04, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताज्या दुधात थोडे कॉर्नफ़्लोअर लावुन शिजवायचे, मग त्यात शक्यतो ताडाचा गुळ घालायचा. नाहीतर साखर घालायची आणि मग त्याला विरजण लावायचे. यासाठी मातीचा कुडा मिळाला तर छान. झाले मिष्टी दोई.
दहि, दुध, कंडेसन्ड मिल्क, असे एकत्र घुसळुन, त्यात पावाच्या स्लाईसेस घालुन, वाफवुन भाप्पा दोई पण करतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators