Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तवा कसा स्वच्छ करायचा ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Household Cleaning » तवा कसा स्वच्छ करायचा « Previous Next »

Mita
Friday, March 10, 2006 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तव्याचा विषय निघालाय म्हणून आठवले,मला पण आत्तापर्यन्त २ तवे फ़ेकुन द्यावे लागले इतके चिकट होतात आणि कडेला ते ग्रीस जमते कित्ती घासले तरी निघत नाही.:-( इकडे US मधे काय वापरता तुम्ही तवा घासायला?? सध्या साधा लोखंडाचा तवा आणला आहे. मी चपातीला वरुनच तेल लावते,कडेने अगदि कधीतरी १५ दिवसातुन एकदा जेव्हा पराठे करते तेव्हाच. माझा मेन प्रश्न हा आहे की तवा कशाने घासायचा??

Karadkar
Friday, March 10, 2006 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीता, मी तवा घासायला ते 3M चे green scrubbers असतात ते वापरते. अर्थात मझा तवा circulon चा आहे. पाण मझा थोडा घाण झालाय गेल्या ५-६ वर्षात पण टाकण्या लायक नाही.

ते oven cleaner कोणी वापरलय का तवा घासायला?


Moodi
Friday, March 10, 2006 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर तु म्हणतेस ते खरे आहे, मी पण एकदा पराठे करताना तव्यावर तेल सोडले अन तो सारखा पुसावा लागला. मी पोळीला तेल ती भाजुन काढल्यावरच लावते.

वापरलेल्या टी बॅग्ज पैकी एखादी ती फेकण्या आधी तवा, तेलकट कढई किंवा भांडे याला आतुन फिरवावी अन मग ते लिक्वीड सोपने धुवावे. म्हणजे त्याचा सगळा ओशटपणा जातो. मी नेहेमी करते असे.


Seema_
Sunday, March 12, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इकडे US मधे काय वापरता तुम्ही तवा घासायला?? >>>

walmart मध्ये aluminiuam /steal cleaner नावाखाली एक छोटासा पावडरीचा डब्बा मिळतो . त्यान अगदी चकचकित निघतो तवा . इतर steal ची भांडी ही फ़ार चिकट झाली असतील आणि liquid soap न निघत नसतील तर ह्या पावडरीन अगदी कमी कष्टात निघतात भांडी . अगदी करपलेली सुद्धा .

Mita
Sunday, March 12, 2006 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा,मिनोती,मूडि thanks ग पटकन reply दिल्याबद्दल. :-)


Moodi
Thursday, September 07, 2006 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना एक सुचवु का? प्रयत्न करुन बघ. मी नॉनस्टीक भांडी(तवा, पॅन वगैरे) आधी वापरलेल्या टीबॅग्जने नुसत्या फिरवुन घेते(तेलाचा हात आपण टिनला लावतो ना तसा) मग स्पंजच्या मऊ बाजूने लिक्वीड साबण घालुन ती घासुन मग कोमट पाण्याने धुवून घेते.

दुसरे म्हणजे पदार्थ( आम्लेट, डोसा वगैरे) केल्याबरोबर साध्या पाण्याने लगेच धुवायचे. ठेवायचे नाही. कारण जरा जरी उशिर झाला की मग उरलेले अन्न कडक बनते. निघत नाही लवकर. टीबॅग्जने ओशटपणा जातो आणि साबणही कमी लागतो. मात्र माईल्ड सोप हवा.


Raina
Thursday, September 07, 2006 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मुडी- खूप खूप धन्यवाद! शुभस्य शीघ्रम आजच करुन पाहते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators