Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 28, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » झटपट पाककृती » Using Microwave » Archive through February 28, 2006 « Previous Next »

Saj
Tuesday, February 28, 2006 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ho na mi suddha reheating sathi plastic che dabbech vaprat hote pan hi mail vachali aani mhantale mazysarkhe barech jan asnar, tar aaplya aarogyachya drushtine saglyanach savdhan karave.
responce pahun kharech khup bare vatle.

Bee
Tuesday, February 28, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण काचेचे कटोरे जर गरम करण्यासाठी वापरले तर ते तडकणार नाही का? एकदा मी काळ्या दंत मंजनाच्या काचेच्या बाटलीत गरम पाणी भरले तर ती लगेच तडकुन फ़ुटली. मी बर्‍याचदा steel च्या वाटीत, कधी पातेलेही microwave मधे ठेवतो. आजवर असे कधी वाटले नाही की plastic/glass डबेच हवेत.

शर्मिला, मी करुन पाहीन आणि नंतर अभिप्राय देईन. धन्यवाद!


Moodi
Tuesday, February 28, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी अरे काही काचेची भांडी खास मायक्रोव्हेव करता बनवलेली असतात, ती नाही तडकत कधी. मी वापरते ना इथे. दुकानातुन नीट चौकशी करुन घे. असे स्टील वगैरे वापरु नकोस मायक्रोव्हेवमध्ये.

Chioo
Tuesday, February 28, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टील किंवा कुठलाही धातू microwave oven मधे वापरू नये. त्याने waves reflect होऊन प्रमाणापेक्षा जास्त ऊष्णता तयार होण्याचा धोका असतो. even धातूची नक्षी असलेली काचेची भांडी वापरू नये म्हणून सूचना असते.

Maitreyee
Tuesday, February 28, 2006 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी कमालच करतोस तू! स्टील ची भांडी microwave मधे? (चुकून)साधी aluminium foil ठेवली तरी sparks पडतात!

Lalu
Tuesday, February 28, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, काही मायक्रोवेव्हज मधे मेटल कन्टेनर ठेवलेले चालतात. या GE च्या model मधेच एक metal rack आहे.
http://www.epinions.com/content_102328798852
हे convection चा option असलेले microwave असतील. पण एरवी वापर करतानाही ते rack मायक्रोवेव मधेच असते. त्याला काही होत नाही. पण सरसकट सगळ्या microwaves मधे मेटल चालत नाही.

Sharmila_72
Tuesday, February 28, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते मायक्रोवेव मोड वापरताना मेटल रॅक काढायचा असतो. निदान माझ्या LG मायक्रोवेव च्या मॅनुअल मध्ये तरी तस दिलेल आहे. ग्रिल आणि convection mode साठी मेटल रॅक चालतो.

Lalu
Tuesday, February 28, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, काही मॉडेल मधे मायक्रोवेव्ह मोड वापरताना काढायला सान्गितला असेल. मी कधीच काढत नाही, तर ते रॅक तापतही नाही की sparks ही उडत नाहीत. मेटलची भांडी मात्र मी वापरत नाही.

स्टीलचा चमचा ठेवला याने -
http://www.physicscentral.com/lou/lou-01-6.html

हा आख्खा बीबी च त्या ' आधुनिक उपकरणे...' मधे जायला पाहिजे. :-)

Bee
Tuesday, February 28, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मिनिट इथे माझा काहीतरी गोंधळ होतो आहे.. माझ्याकडे oven आहे. मी त्याला microwave च म्हणतो.. त्यात rack वगैरे काही नाही. एक जाड काचेची फ़िरती disc आहे. त्या disc वर काहीही ठेवले की ती फ़िरते. मी oven मधेच बटाटे, वांगी भाजने, भाज्या गरम करणे, popcorn तयार करणे हे सगळे oven मधेच करतो.

मी steel चे ताट ठेवले तेंव्हा एकही स्पार्क उडाला नाही. मी खूप कमी तापमान ठेवतो म्हणून असे असेल. तरीही पुढल्या वेळी काळजी घेईन.

धन्यवाद!

मी आज एक लेख वाचला पुस्तकात त्यात असे लिहिले आहे आपण गॅसवर फ़ुलके जाळावर ठेवून फ़ुलवतो. त्यामुळे फ़ुलक्यांना carbon लागते नि ते पोटात जाते. हे शरिराला हाणीकारक आहे.


Sharmila_72
Tuesday, February 28, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुझा मायक्रोवेव च असावा. मायक्रोवेव चे तीन प्रकार आहेत

१) Solo Microwave याचा वापर फक्त आणि फक्त कुकिंग तसेच अन्न गरम करण्यासाठी केला जातो.

२) Grill+Microwave - यात मायक्रोवेव चे सर्व features तर असतातच. आणि याचबरोबर ग्रिल option पण असतो. चिकन टिक्का, पनीर टिक्का वगैरे. एरवी आपण हे तंदूरि पदार्थ solo microwave मध्ये पण करु शकतो. पण मग ग्रिल ची चव, जी पदार्थ साधारण ब्राउनिश झाल्यावर येते ती येत नाही.

३) Grill+Convection+Microwave - यात मायक्रोवेव चे सर्व features , ग्रिल चे सर्व features बरोबर आणखी एक convection option असतो. यात आपण बेकिंग करु शकतो. केक्स, कुकीज वगैरे.

जो option आपण select करु त्या त्या प्रमाणे भांडी वापरावी लागतात.

आता दूर झाला का तुझा गोंधळ बी?


Sharmila_72
Tuesday, February 28, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझा solo microwave आहे का बी?

Moodi
Tuesday, February 28, 2006 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला उत्तम माहिती, फार गोड आहेस तू.
आता तू किंवा दिनेश यांनी सांगावे की मायक्रोव्हेव मध्ये बेसन कसे भाजावे ते, अन कुठल्या तापमानावर भाजावे? तुपाचे प्रमाण कसे ठेवावे? म्हणजे एका वाटी बेसनाला किती तुप लागेल? अन सोलो मायक्रोव्हेव मध्ये चालते का?


Sharmila_72
Tuesday, February 28, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडे, अग मी आणि गोड खि: खि: खि:
माझ्या नवर्‍याला हे सांगितल तर हसत सुटेल तो. तो तिखट मिरची म्हणतो मला!

आणि बेसन भाजण्यासाठी इथे बघ
/hitguj/messages/103383/93029.html?1130219883

Moodi
Tuesday, February 28, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवर्‍याला हसु दे, सगळी माणसे काही वेळा गंमतशीर उत्तरे देतात अशा प्रश्नाना. धन्यवाद ग.

Sharmila_72
Tuesday, February 28, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, काही जण silver foil सकट ठेवतात पदार्थ मायक्रोवेव मध्ये. मी एकदा ठेवल तर sparks आले. अस ऐकलय की थोडी foil चालते पण खूप नाही चालत.

अजून एक महत्वाची लिंक देत आहे. मायक्रोवेव मध्ये पाणि गरम केल की किती धोकादायक ठरु शकत
http://www.hoax-slayer.com/microwave-water.html

ही चर्चा इथे चालेल का? नाहीतर मिलिंदा येऊन ओरडेल आपल्याला.
मला वाटत लालु म्हणते तसा अख्खा च्या अख्खा बीबी हलवायला हवा.

Vaishali_hinge
Tuesday, February 28, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या नवर्‍याने microwave मध्ये एकदा शेंगदाणे भाजायला ठेवले, किती temp ला adjust केले माहीत नाही मात्र २मिनीटात त्यांनी पेट घेतला, आणि मग काय धडड्धुम.............. सगळ्या घरभर धुरच धुर

Prady
Tuesday, February 28, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सान्गू का. सुधा कुलकर्णी यान्चा मायक्रोवेव मधील पदार्थ नावाच एक फ़ार उपयुक्ता पुस्तक आहे.त्यात आपले कितीतरी रोजचे जेवणातले आणी पकवान्न दिले आहेत.काय तपमान ठेवाव, मायक्रोवेव कसा वापरावा अशी बरीच छान माहिती आहे. आणी मूडी हे पुस्तक पुण्यात सहज उपलब्ध आहे. मी अमेरिकेला येताना माज़्या आईने ते खास करुन माज़्या बरोबर दिल होत.कदाचित तुम्हाला माहित ही असेल या पुस्तकाबद्दल. आणी नसेल तर बघा वाचून. उन्मेश प्रकाशन च पुस्तक आहे.

Moodi
Tuesday, February 28, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा कोरडे बटाटे भाजण्याचा वेडेपणा केला अन स्पार्क्स आल्यावर धडपडत जाऊन बंद केला. त्या दिवसापासुन कानाला खडा की असले उद्योग करायचे नाहीत. शर्मिला ती लिंक दिसत नाही ग.

Sharmila_72
Tuesday, February 28, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, बटाटे मायक्रोवेव मध्ये काट्याने (fork) टोचा मारून मग टाकायचे, म्हणजे त्यातील उष्णता कोंडुन रहात नाही. हो, आणि पाण्यात ठेवायचे. तु कोरडे ठेवलेस ना म्हणुन झाल तस

Dineshvs
Tuesday, February 28, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेसन वैगरे प्रकार मायक्रोवेव्ह मधे नीट होत नाहीत. मंद आचेवर सतत ढवळत परतल्याची सर त्याला येत नाही. वाटल्या डाळीचे प्राथमिक काम त्यात होवु शकेल, मग ते गॅसवर परतुन, वाटल्या डाळीचे लाडु करावे.
काहि काहि ओव्हनमधेच कोरडे पदार्थ भाजता येतात. माझ्याकडे अगदी पहिल्या पिढीतला NEC चा होता, त्यात काहिहि कोरडे ठेवुन चालत नाही. मग शार्पचा विथ ग्रिल घेतला, त्यात कोरडे मसाले वैगरे भाजता येतात.
कुठलाहि ओव्हन वापरताना, त्याची पुस्तिका काळजीपुर्वक वाचणे अत्यंत गरजेचे आहे. एकदा ते पदार्थ करुन बघितले कि मग प्रयोग करता येतात.



Prady
Tuesday, February 28, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moody,


Tumacha personal mail check kara.Besanachya laduchi procedure pathawali aahe.


Maanus
Tuesday, February 28, 2006 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहीती म्हणुन, उगाच टिंगल टवाळी नका करु ह्यावर.

माझ्या roommate ने एकदा अंडे microwave मधे ठेवले, त्याला वाटले ते चुलीत भाजून निघते तसे भाजले जाईल, पन काही क्षणात कळाले की आता आमचा microwave परत कधिच चालु शकणार नाही, नविन m.w. आनावा लागला.


Chandrika
Tuesday, February 28, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

he kay he Prady, Ladu (chi recipe) phakt Moodylach?

Maitreyee
Tuesday, February 28, 2006 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस,
अंडे न फ़ोडता ठेवले असेल त्याने. microwave safe bowl मधे अंडे फ़ोडून घालायचे, मीठ्-मीरी टाकायचे आणि झाकण ठेवून १ मिनिट ठेवायचे फ़क्त. ब्रेड मधे घालून खायला suitable , लोणी तेल विरहीत, perfect round ऑम्लेट होते. :-)


Moodi
Tuesday, February 28, 2006 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा मनापासुन धन्यवाद ग, छान कृती आहे. या वेळेस तुप छान आहे म्हणुन करुन खायचे आहेत. मला अहो नको म्हणुस ग. चंद्रीका तुला पण हवेत का? पाठवते मग.
प्रज्ञा नंतर मेल आयडी कळवतेच माझा.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators