Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 27, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » झटपट पाककृती » Using Microwave » Archive through February 27, 2006 « Previous Next »

Rimzim
Tuesday, February 14, 2006 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SM pani baher yete yache main karan bhande lahan aahe.
bhat 2 vatya honar asel tar 4 vatya basel itake bhande ghe.

Dineshvs
Wednesday, February 15, 2006 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायक्रो वेव्ह मधे कांदे पोहे, साबुदाणा खिचडि पण चांगली होते दोन तीन दिवसानी कृति लिहिन.

Kaviash
Friday, February 17, 2006 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जवळजवळ सगळ्याच भाज्या microwave मधे करते पालेभाज्या सोडून. वेळ कमी लागतो. सारख बघाव लागत नाही. आणि कमी तेलात करता येतात.

Vaishali_hinge
Friday, February 17, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा मिक्रोववे मध्ये भाज्या करायची पधत सांगणार का? idea अगदी छान वाटतेय! तेल कमी लागते हे विशेष!

Kaviash
Friday, February 17, 2006 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशालि, भाजी प्रमाणे पध्दत बदलू शकते.
ही घे गवारीच्या भाजी ची पध्दत. मी कालच केली होती.
१) ग़वार निवडून मायक्रोवेव्ह सेफ़ भान्ड्यात घाल.
२) पाणी न घालता साधारण ३ मिनीटे ठेव. तुझ्या मायक्रोवेव्ह ला जर वेजीटेबल मेनु असेल तर, त्या पावर वर किती ग्राम आहे त्याप्रमाणे ठेव.
३) बाहेर काढून दाण्यचा कूट, तिखट, जीरे पुड, धणे पुड, मिठ आणी आवडत असेल तर गुळ घाल.
४) नेहमीची फोडणी कर
gas वर कमी तेलाची आणी वरील मिश्राणात ओत. आता, फोडणी च कढल धूवुन पाणी घाल. कडिपत्ता फोडणीत घाल किन्वा डायरेक्ट वरील मिश्राणात. मला वरुन आवडतो.
५) परत साधारण ४ मिनीटे ठेव.
मायक्रोवेव्ह पावर प्रमाणे वेळ बदलू शकते.

वरुन फोडणी घालण्याऐवजी, मायक्रोवेव्ह सेफ़ भान्ड्यात सुरवातीला थोडस तेल, मोहरी, हिन्ग, हळद घालुन २ मिनीटे ठेवून मग वरील स्टेप्स केल्या तरी चालत.

मायक्रोवेव्ह मधे कमी तेलाचा सुध्दा चान्गला तवन्ग आणी रन्ग येतो.


Dineshvs
Saturday, February 18, 2006 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायक्रोवेव्ह च्या काहि रेसिपीज.
ऊपमा

एक टेबलस्पुन ऊडिद डाळ थोडा वेळ पाण्यात भिजत घालावी. एक मध्यम कांदा अगदी बारिक चिरुन घ्यावा. थोडे आले किसुन घ्यावे. एका सपाट डिशमधे १ कप रवा नीट पसरुन हाय वर दोन मिनिटे भाजुन घ्यावा. त्या रव्यावर थोडे तुप घालावे. नीट मिसळुन परत एक मिनिट भाजावा.
दुसर्‍या बोलमधे एक चमचा तुप घेऊन त्यात मोहरीदाणे, कडीपत्ता, आल्याचे वाटण भिजवलेली डाळ आणि कांदा घालुन हाय वर दोन मिनिटे ठेवावे.
मग ढवळुन त्यात रवा, मीठ, व दिड कप पाणी घालावे. झाकुन हाय वर दोन मिनिटे ठेवावे, अधुन मधुन ढवळुन घ्यावे. ओव्हन बंद करुन दोन मिनिटे वाफ़ जिरु द्यावी. मग वरुन खोबरे कोथिंबीर पखरुन खावे.

साबुदाणा खिचडी

करण्यापुर्वी नेहमीप्रमाणे दिड कप साबुदाणा भिजवुन ठेवावा. त्यात एक कप दाण्याचे कुट आणि मीठ मिसळुन ठेवावे.
बोलमधे १ टेबलस्पुन तुप ३० सेकंद हाय वर गरम करावे. त्यात जिरे, व हिरवी मिरची ( शक्य तर हे दोन्ही वाटुन ) घालावे. त्यात एका बटाट्याच्या फ़ोडी घालाव्यात. ढवळुन हाय वर दोन मिनिटे ठेवावे. मग त्यात साबुदाणा घालावा. वरुन थोडे नारळाचे वा साधे दुध शिंपडावे. हाय वर तीन मिनिटे ठेवावे. अधुन मधुन हलवावे. वरुन खोबरे व कोथिंबीर घालुन खावे.

कांदा पोहे

दोन कप पोहे धुवुन निथळुन घ्यावेत. एक मोठा कांदा बारिक चिरुन घ्यावा.
बोलमधे १ टेबलस्पुन तेल २० सेकंद गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, कडीपत्ता, हिंग, कांदा आणि हळद घालावी. हाय वर दोन मिनिटे ठेवावे. पोहे मीठ साखर घालावी. ढ्वळुन तीन मिनिटे हाय वर ठेवावे. अधुन मधुन ढवळावे. वरुन कोथिंबीर व खोबरे घालुन खावे. सोबत लिंबाची फ़ोड घ्यावी.

कारल्याची भाजी

पाव किलो कारली घेऊन त्याच्या काचर्‍या कराव्यात. त्याना मीठ लावुन ठेवावे. लिंबाएवढ्या चिंचेचा दाट कोळ काढुन घ्यावा. एक मध्यम कांदा बारिक चिरुन घ्यावा. सात आठ लसुण पाकळ्या सोलुन घ्याव्यात.
बोलमधे १ टेबलस्पुन तेल २० मिनिटे हाय वर गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, ठेचलेला लसुण, कांदा घालुन हय वर दोन मिनिटे ठेवावे.
कारली पिळुन घ्यावीत. ती बोलमधे घालावीत. त्यात थोडा काळा वा गरम मसाला, लाल तिखट, थोडी धणे जिरे पाव्डर, कोळ घालावा. नीट ढवळुन हाय वर ७ मिनिटे ठेवावे. मग त्यात लिंबाएवढा गुळ बारिक करुन घालावा. दाण्याचे कुट घालावे आणि दोन मिनिटे हाय वर ठेवावे. २ मिनिटे तसेच ठेवावे.

भरली वांगी.

७ लहान शक्यतो एकाच आकाराची वांगी घेऊन ती भरल्या वांग्यासाठी चिरुन मीठ घातलेल्या पाण्यात घालुन ठेवावीत. एक मोठा कांदा बारिक चिरुन घ्यावा. पाव वाटी सुके खोबरे जरा भाजुन घ्यावे. कांदा खोबरे एकत्र वाटावे, व त्यात थोडा गुळ घालावा. त्यात चिंचेचा कोळ, दाण्याचे कुट, लाल तिखट, काळा मसाला व कोथिंबीर घालुन नीट कालवावे. त्यातच मीठ व थोडे तेल घालावे.
एका बोलमधे ती रचुन वरुन दोन चमचे तेल पसरावे. वरुन पाव कप पाणी घालुन हाय वर ८ मिनिटे ठेवावे. ३ मिनिटे तसेच ठेवुन मग बाहेर काढावे.

वाटली डाळ

एक कप चणाडाळ पाच सहा तास भिजवुन भरड वाटावी. एक मोठा कांदा बारिक चिरुन घ्यावा. हवी तर एखादी लाल वा पिवळी सिमला मिरची बारिक चिरुन घ्यावी.

बोल मधे २० सेकंद हाय वर एक टेबलस्पुन तेल गरम करावे. त्यात थोडे मिरची, लसुण व जिरे यांचे वाटण, मोहरी, हिंग लाल तिखट, हळद, कांदा व सिमला मिरची घालावी. हाय वर दोन मिनिटे ठेवावे. खमंग वास आला पाहिजे. मग त्यात डाळ व मीठ घालुन नीट मिसळुन घ्यावे. हाय वर ५ ते ६ मिनिटे ठेवावे. वाफ़ जिरल्यावर काट्याने मोडुन मोकळी करावी. नसेल होत तर आणखी थोडे तेल घालुन आणखी एखादे मिनिट हाय वर ठेवावे.



Dineshvs
Tuesday, February 21, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सर्वसाधारण मायक्रोवेव्ह डोळ्यासमोर ठेवुन हे लिहिलय. आपल्या मॉडेलप्रमाणे थोडे बदल करावे लागतील.
आणखी प्रकार मग लिहिनच.


Prajaktad
Tuesday, February 21, 2006 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश तुम्हि एकदा उपवासासाठी बटाट्याच्या शिर्‍याचि रेसिपी दिली होती
तो शिरा microwave मधे अगदी छान होतो.
शिवाय तुपही कमि लागते.


Dineshvs
Wednesday, February 22, 2006 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो नं प्राजक्ता, आपण मंद आचेवर परतुन जे पदार्थ करतो, ते बहुतेक मायक्रोवेव्ह मधे चांगले होतात, फ़क्त जळु नये म्हणुन लक्ष ठेवावे लागते. एकदा तंत्र जमले कि अवघड नाही.

Dineshvs
Wednesday, February 22, 2006 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी काहि पदार्थ.

चॉकलेट केक

१४० ग्रॅम मैदा आणि २० ग्रॅम कोको पावडर आणि पाव चमचा बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्या. १७० ग्रॅम बारिक साखर व ११५ ग्रॅम लोणी एकत्र फ़ेसुन घ्या. तीन अंडी फ़ेटुन घ्या. फ़ेटलेली अंडी साखरेच्या मिश्रणात हळु हळु मिसळा, फ़ेटत रहा. त्यात हळु हळु मैदा मिसळा. मिश्रण मुलायम असले पाहिजे. अंडी लहान असतील तर कदाचित मिश्रण फ़ेटायला जड जाईल. असे झाले तर त्यात दोन चमचे दुध घाला. मिश्रणात व्हॅनिला, ऑरेंज किंवा चॉकलेट ईसेन्स घाला. सगळ्याचे एकेक थेंब घातले तरी चालतील. काचेच्या खोल डिशला लोणी लावुन घ्या. एके एंच थर बसेल असे मिश्रण ओता. जरा आपटुन समपतळीत करा. व्यास ५ ईंचापेक्षा जास्त असु नये. ( हे कुठल्याहि पदार्थासाठी, खास करुन जो आपण ढवळत नाही, त्यासाठी लक्षात ठेवायचे. कारण मायक्रो वेव्हज त्यापेक्षा आत शिरु शकत नाहीत. यावर ऊपाय म्हणुन डिशच्या मधोमध, एक जाड ग्लास पाण्याने अर्धा भरुन ठेवा. ) हे मिश्रण बेक व्हायला १० मिनिटे लागतील. मायक्रोवेव्ह मधे केक करताना, आत टोचलेली काडी थोडी ओली येत असतानाच ओव्हन ऑफ़ करावा लागतो, कारण ऊरलेल्या वेळात बेकिंग पुर्ण होते.

नारळाची बर्फ़ी

१ टेबलस्पुन तुप हायवर ३० सेकंद गरम करा. त्यात २५० ग्रॅम बाजारी खोबर्‍याचा किस घाला. नीट मिसळुन ते ९० सेकंद गरम करा. त्यात १ कप दुध घाला. हाय वर ५ मिनिटे ठेवा. मग त्यात २०० ग्रॅम साखर मिसळा, वासाला वेलची वा केशर घाला. हे १५ ते २० मिनिटे हाय वर ठेवा. दुध पुर्णपणे आटले पाहिजे. अधुन मधुन ढवळत रहा. दुध आटले कि तुप लावलेल्या ताटात थापुन वड्या कापा.

बनाना Flambe

चार मोठ्या केळ्यांसाठी एक टेबलस्पुन बटर आणि ५० ग्रॅम शक्यतो ब्राऊन साखर एकत्र करुन घ्या. केळी सोलुन ती आडवी चिरा. त्यात हे साखरेचे मिश्रण भरा. हवी तर त्यात चिमुटभर दालचिनीची पुड घाला. नीट रचुन २ ते ३ मिनिटे हाय वर ठेवा. ३ टेबलस्पुन ब्रॅंडी गॅसवर जरा गरम करा. लायटरने ती पेटवा व केळ्यावर ओता. घट्ट व्हॅनिला आईसक्रीमबरोबर खा.

वॉलनट ब्राऊनीज

१०० ग्रॅम मैदा आणि अर्धा टिस्पुन बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्या. १०० ग्रॅम लोणी व ७० ग्रॅम डार्क कुकिंग चॉकलेट एकत्र करुन २ मिनिटे हाय वर ठेवा. २ अंडी फ़ेटुन घ्या. १०० ग्रॅम साखर, लोणी एकत्र करा, त्यात अंडी मिसळा. हळु हळु मैदा मिसळा. ५० ग्रॅम आक्रोडाचे तुकडे त्यात मिसळा. आवडीचा ईसेन्स घाला. डिशमधे ओतुन ८ मिनिटे बेक करा. २ मिनिटे तसाच ठेवा. मग तुकडे करा.
दालचिनीची पुड घालुन अर्धा कप साखरेचा पाक करा. त्यात थोडी रम घाला, आणि हे मिश्रण या तुकड्यांवर ओता.



Kaviash
Friday, February 24, 2006 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायक्रोवेव्ह मधे भेन्डी ची भाजी पण चान्गली होते. अजिबात चिकट होत नाही.

Bee
Friday, February 24, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

microwave मध्ये कांदेपोहे, खिचडी हे प्रकार दिनेश तुम्ही लिहिणार अहात ना?

Arch
Friday, February 24, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता, नुसती चांगली होते अस नाही लिहायच. कशी करतेस तेपण लिही बर.

Savani
Friday, February 24, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी अरे लिहिलेत की वरती. दिनेश मी पोहे काल करुन पाहिले. छान झाले. पण जरा खमन्ग पणा थोडा कमी वाटला. काही चुकले असेल का करताना? पण बिना कष्टाचे आणि कमी वेळात नक्कीच छान.

Dineshvs
Saturday, February 25, 2006 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Savani मायक्रोवेव्ह मधे मलाहि समथिंग मिसिंग वाटते.
माझ्यासारख्या तिखट नाकाच्या माणसालाच ते जाणवते हा गैरसमज होता तर.
पण बिनकष्टाचे काम, हे मात्र खरे.


Saj
Monday, February 27, 2006 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>Cancer News from Johns Hopkins University:
>
> 1--No plastic containers in micro.
> 2--No water bottles in freezer.
> 3--No plastic wrap in microwave.
>
> Johns Hopkins has recently sent this out in its newsletters.
>
> This information is being circulated at Walter Reed Army Medical
> Center. Dioxin chemicals causes cancer, especially breast cancer.
>
> Dioxins are highly poisonous to the cells of our bodies.
>
> Don't freeze your plastic bottles with water in them as this
> releases dioxins from the plastic.
>
> Recently, Dr. Edward Fujimoto, Wellness Program Manager at Castle
> Hospital, was on a TV program to explain this health hazard. He
> talked about dioxins and how bad they are for us.
>
> He said that we should not be heating our food in the microwave
> using plastic containers. This applies to foods that contain fat.
>
> He said that the combination of fat, high heat, and plastics
> releases dioxin into the food and ultimately into the cells of the
> body.
>
> Instead, he recommends using glass, Corning Ware or ceramic
> containers for heating food. You get the same results, only
>without the dioxin
>
> So such things as TV dinners, instant ramen and soups, etc.,
>should be removed from the container and heated in something else. Paper
> isn't bad but you don't know what is in the paper. It's just safer
> to use tempered glass, Corning Ware, etc.
>
> He reminded us that a while ago some of the fast food restaurants
> moved away from the foam containers to paper. The dioxin problem
>is one of the reasons.
>
> Also, he pointed out that Saran wrap is just as dangerous when
> placed over foods to be cooked in the microwave. As the food is
> nuked, the high heat causes poisonous toxins to actually melt out
> of the plastic wrap and drip into the food. Cover food with a
>paper towel instead.
>
> This is an article I believe you should forward to your family and
> friends !



Psg
Monday, February 27, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगली बातमी आहे. actually मी पोहे, खिचडी या रेसीपी इथे बघून म्हणले होते की हे पदार्थ गॅस वर करायला कितीसा वेळ लागतो? जिथे खरच गरज अहे, जसकी non-veg , बेसन भाजणे, इत्यादि किचकट प्रकारांसाठी microwave वापरला तर ठीक आहे. आणि mostly तुम्ही परदेशात रहता, म्हणजे गॅस नाही वगैरे problem नाही, तर शक्यतो गॅस वर पदार्थ का नाही करत? please note की हे जनरल वाक्य आहे, कोणालाही उद्देशून नाही. microwave चांगला की वाइट यावर v and c अभिप्रेत नाही. इतकाच point होता की आवश्यक तिथेच वापरावा. चु.भू.दे.घे! :-)

Bee
Monday, February 27, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Saj- बरे झालेस ती मेल इथेही पोष्ट केलीस. मीही plastic चे डबेच food heating साठी वापरतो. इथे काही plastic चे डबे खास microwave साठी तयार केलेले असतात. तेंव्हा मी विचार केला ज्या company नीने इतके छान डबे तयार केलेत त्यांनी नक्कीच विचार केला असेल की हे डबे वापरून अन्न गरम केल्यानंतर शरिराला कसलाच अपाय होणार नाही. वरचे तुझे पोष्ट वाचून आता परत मी कधी plastic चे डबे वापरायचा विचार करणार नाही.

Psg- तू म्हणते ते अगदी बरोबर आहे. माझ्यामते तुम्ही microwave वापरता. आधी विचार करा तुमच्याकडे पुरेसी विज आहे का? नेमक्या ह्याच कारणामुळे मी घरी microwave विकत घेऊ नका असे बजावून सांगितले आहे. कारण आपल्याकडे विजेचा प्रश्न त्यात बिलही छान येईल. दुसरे म्हणजे, तुमच्याकडे वेळेचा तुटवडा आहे का? जिथे fast life आणि workoholic hours असतात तिथे मिनिटा मिनिटाची गरज भासते. microwave घरात असले तर पटकन काहीतरी करू शकतो. जसे की garlic bread गरम करणे, बटाटे भाजणे, भात, भाजणे, भाज्या, पोळ्या गरम करने आणि बरेच काही त्वरीत गरम होते. पण जर वेळ असेल तर हे सगळे काही गॅस वर थोडे उशिरा होईल पण चव छान लागते. जसे आता आपण म्हणतो नाही चुलीवरच अन्न कसे गोड लागते, तसेच काहीजण पुढे चालून म्हणतील नाही गॅसवरचे अन्न कसे गोड लागायचे. तिसरे कारण स्वच्छता आवरा आवर हे microwave वापरले तर जरा कमी वेळेत होते. जसे की भरीताची वांगी गॅसवर भाजली तर पसारा जास्त होतो. microwave ची निर्मिती वेळेचा अभाव भरून काढन्यासाठी झाली असावी.


Bee
Monday, February 27, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg- मी पिठ पेरूण जेंव्हा ढोबळी मिरची, कारले, कोबी, मेथी करतो तेंव्हा पिठ भाजायला जर microwave चा उपयोग केला तर माझे पिठ जळून खाक होते. तुला कसे काय जमले. मी अगदी low heat आणि less time वर ठेवले होते. तरीही शेवटी जळलेच. खालचा एक थर तर कोळसा होऊन खरडावा लागला. मी still च्या ताटात भाजले.

Moodi
Monday, February 27, 2006 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी मायक्रोव्हेव मध्ये स्टीलचे ताट वापरलेस?

Sharmila_72
Monday, February 27, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी, तुला कुरकुरीत बटाट्याची भाजी कशी करायची ते हव होत ना? मी लिहिली आहे तिथे. वाचलीस तरी का मुला? मला वाटल होत कि तु लगेच करुन सांगशील कशी झालेली ते.

Vaishali_hinge
Monday, February 27, 2006 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

microwave च्या reciepe छान आहेत, thanks all, dinesh and kavish परतल्याचा खमंग पणा येत नाही हे ही खरेच पण खुप वेळ वाचतो, शिवाय पसारा होत नाही. मी कांद्याखोबर्‍याचा मसाला मिक्सर मधुन काधुन microwave मध्ये ठेवते तेल सुटेपर्यन्त छान परतल्यासारखा होतो मग फ़्रिज मध्ये ठेवुन देते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे तेल कमी लागते.

Asami
Monday, February 27, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Read more about diaoxin here

http://urbanlegends.about.com/library/bl-microwave-dioxin2.htm
http://www.ejnet.org/dioxin/

Moodi
Monday, February 27, 2006 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी छान माहितीपुर्ण लेखाबद्दल धन्यवाद.

पुनम 100 टक्के अनुमोदन. मी बरेचसे पदार्थ गॅसवरच करते. मायक्रोवेव फक्त जेव्हा जरुर असेल तेव्हाच वापरते. कारण वेळ वाचवतो. अर्थात ही माझी आवड कारण मी घरी आहे त्यामुळे मला वेळ आहे, नोकरी अन घराची कसरत करणार्‍यांना बरा तो. मात्र भारतात विजेच बील किती असेल हा विचार केला पाहिजे.


Dineshvs
Tuesday, February 28, 2006 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साज, छान माहिती दिली आहे. मायक्रोवेव्हमधे शक्यतो काचेचीच भांडी वापरतो मी.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators