Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नारळाची चटणी

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » चटण्या » नारळाची चटणी « Previous Next »

Beti
Monday, January 20, 2003 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या तमिळ मैत्रिणीची hostel recipie... authentic आहे कि नाही माहीत नाही.

नारळाचा चव, थोडी भिजवलेली उडीद डाळ किंवा डाळे, चवीनुसार मीठ, जिरे, साखर (हे घाटी modification असावे) मिक्सरमधे जरा पाणी घालून जाडच वाटायचे. त्यात दही घालायचं आणि तुपाची फ़ोडणी जिरे, मोहरी, तांबड्या मिरच्यांचे मोठे तुकडे, कढीलिंब आणि थोडी जास्त उडीद डाळ घालून करायची. जरा कोमट झाली कि चटणीत घालायची. नाही तर दही फ़ुटते. दही नको असेल तर पाणी घालून चटणी सारखी करायची.गरम फ़ोडणी चालते.


Chiku
Friday, August 04, 2006 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इडलीची डोश्याची चटणी अशी करते
१ नारळ खवुन,
१ वाटी चण्याची डाळ, ( South Indian चटणीत उडिद डाळ वापरतात) ४-५ तास भिजत घालावी,
१ हिरवी मिरची,
पाव वाटी चिंच कोळुन त्याचे पाणी,
पाउण वाटी कढिपत्त्याची पाने,
४ चमचे उडिद दाळ,
४ सुक्या लाल मिरच्या,
मीठ.

वरील साहित्यातील अर्धी कढिपत्त्याची पाने, उडिद डाळ, २ सुक्या मिर्चीचे तुकडे थोड्या तेलावर डाळ लाल होईपर्यंत परतुन घ्यावे व थंड होऊ द्यावे.

नारळ, चण्याची डाळ, १ हिरवी मिरची, मीठ, वरचे परतलेले साहित्य, चिंचेचे पाणी हे सर्व मिक्सरमधुन वाटुन घ्यावे. पाहिजे तेवढे पाणी घालुन सरबरित चटणी करावी.

आता छोट्या कढल्यात तेल तापवुन मोहरी, हिंग, कढीपत्ता, २ सुक्या मिरच्यांचे तुकडे ह्याची खमंग फोडणी करुन चटणीवर घालावी व सर्व मिक्स करावे.

ही चटणी दोन्-तीन दिवस छान टिकते.





Samira
Monday, March 26, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi aaj hi chutney keli hoti. khup mast zali hoti. thanks to u and maayboli

Madhura
Monday, March 26, 2007 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिकु, मी सुद्धा ही चटणी try केली. मस्तच होते. thanks!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators