Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कोबीचे ऊबजे

Hitguj » Cuisine and Recipies » भाताचे प्रकार » भाजी (युक्त) भात » कोबीचे ऊबजे « Previous Next »

Raigad
Monday, February 13, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोबीचे ऊबजे

कोबीचा हा एक अगदी साधासा पण छान प्रकार आहे माझा आवडता!

तांदूळ भाजून घ्यायचे व पाण्यात भीजत घालयचे सधारण १/२ तास.मग पाणी काढून निथळत ठेवायचे.
शेंगदाणे व डाळ्या साधारण १ तास पाण्यात भिजवायचे.
कोबी बारीक चिरायचा. थोडं आल बरीक किसून घ्यायचं वाटायच नाही! हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या.
पातेल्यात तेलावर कडीपत्ता, जीरं, मोहरी, हिंग यांची फ़ोडणी करून त्यात कापलेला कोबी, आल व मिरच्या घालून परतायचे. थोडा वेळ झाकण ठेऊन कोबी वाफ़वून घ्यायचा.मग मीठ, थोडी साखर घालून त्यात भिजवलेले शेंगदाणे, डाळ्या व तांदूळ घालून परतायचे. मग तांदळाच्या साधारण दुप्पट पाणी घालून पाणी ऊकळले की पातेल्यावर झाकण ठेऊन भाताला वाफ़ आणावी. वर कोथींबीर घालून राईत्याबरोबर गरमा गरम भात खावा!


Pendhya
Monday, February 13, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानसी, मी असाच कोबीभात करतो, पण त्यात शेंगदाणे आणी डाळ्या नसतात. पुढल्या वेळेस ते टाकुन तयार करीन.

Dineshvs
Monday, February 13, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा छान वेगळा प्रकार आहे हा.

Dha
Tuesday, March 28, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग, खरच छान आहे. मी उद्याच करुन बघते.

Renushahane
Wednesday, May 31, 2006 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाळ्या म्हणजे नक्की काय?डाळं का?

Bee
Thursday, June 01, 2006 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेणू, जिथे फ़ुटाणे कुरमुरे विकतात तिथे हरभर्‍या पासून केलेल्या डाळ्या असतात ना.. ज्या खूप कडक नसतात आणि साल काढलेली असतात. आपण चिवड्यात पण टाकतो ना बर्‍याचदा त्याला डाळ्या म्हणतात. फ़िकट पिवळसर रंगाच्य असात. घरी पण करता येतात. चण्याची डाळ भिजू घालायची नंतर तिला वाळवायची की डाळ्या तयार पण घरी केलेल्या डाळ्यांची चव विकतच्या सारखी खुसखुशीत नाही लागत.

Renushahane
Thursday, June 01, 2006 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स बी.आता आलं लक्षात.पण इथे अमेरिकेत कुठे मिळण्याची शक्यता नसेलच.काल हा प्रकार करून बघितला मी.
डाळ्या न घालता देखील हा भात छान झाला.


Junnu
Thursday, June 01, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग indian store मधे मिळतात ना डाळ्या.

Prady
Thursday, June 01, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेणु शहाणे, कुठे गायब झाला होतात आपण. हल्ली नगरात फेरी नसते आपली. कशी आहेस? बरी आहेस ना. इथे इतक्या दिवसांनी दिसलीस म्हणून राहावलं नाही. म्हण्ट्लं जरा हाय करावं.

Renushahane
Thursday, June 01, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय नावने मिळतात indian store मध्ये?

Seema_
Thursday, June 01, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेणु जिथे चिवड्याचे पोहे, चिरमुरे ठेवलेले असतात तीथे मिळतात डाळे . नाव काय मी पाहिल नाही . बघुन ओळखता येईलच ना तुला .

Raigad
Monday, July 03, 2006 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाळ्या म्हणजे मला हरभर्‍याची डाळ म्हणायची होती... अर्थात ही न घालता देखील चांगला होतो हा भात!

Sadhi_manas
Tuesday, September 12, 2006 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा भात आणि टोमाटोचे सार असा बेत केला होता मी काल...खूप छान लागतो हा भात.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators