Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Tava

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » Tava « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 17, 200620 02-17-06  6:01 am

Psg
Friday, February 17, 2006 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मीला, :-) करण्यासाठी पुरण्पोळ्या यायला नकोत का? :-) पण आता होळी येत आहे.. नवीन तव्याचे incentive आहे.. या वेळी करायचा प्रयत्न करीन. हो, तवा मीच धूते.. सध्या गुळगुळीत आहे! :-)

Sharmila_72
Friday, February 17, 2006 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, तुला पुरणपोळ्या येत नाहीत अस म्हणतेस म्हणजे नक्कि काय येत नाही? पुरणपोळ्या लाटता येत नाहीत का उलटुन तव्यावर टाकायला कठिण जात? माझ्या काही आयडीआज आहेत पुरणपोळ्या उलटण्याच्या. मलाही जमत नाहीत, पण माझ्या पुरणपोळ्या बघुन एक बाई मला म्हणाल्या होत्या " चांगल्या करतेस ग तु पोळ्या " त्याना बिचार्‍याना काय माहीत मी काय कसरती करते ते !
पुरणपोळ्यांच्या बीबी वर tips टाकतेय, नक्कि बघ.


Sharmila_72
Friday, February 17, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग उघडत नाही आहे तो बीबी. इथेच टाकते आता. पुरणपोळी लाटून झाली की त्यावर न्यूजपेपर ठेवायचा आणि पोळपाटासकट उलटा करायचा. ( बेक झालेला केक प्लेट मध्ये काढतो तसा ) . आता तव्याजवळ नेऊन ही पोळी अलगद तव्यावर ढकलायची. एक बाजू भाजून झाली कि परत तवा सांड्शी ने नीट पकडून पेपर वर पोळी काढायची. त्यावर दुसरा पेपर चा तुकडा ठेउन उलटी करून दुसरी बाजू तव्यावर टाकायची. अजिबात फुटत नाहीत, तुटत नाहीत. ज्यांना जमत नाहीत किंवा नवशिक्यांसाठी ही आयडीआ आहे.

Psg
Friday, February 17, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी खर सांगायच तर सासूबाई असल्यामुळे मला पु.पो करायची कधी वेळच आलेली नाही.. तस पुरण भरुन लाटणे वगैरे केले आहे, पण from scratch नाही. मला बाकी कशापेक्षा ते कणीक तिंबणे जास्त अवघड वाटते. आणि तुझी ही idea छान आहे पोळ्या भाजायची :-)

Heena21
Tuesday, May 09, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala nawin tawa ghyacha aahe.
Sadhya me U.S. madhe aahe.Aani coil war polya karawya lagnar aahet.
Kontya brandcha ghyawa (kuthun ghyawa)kuni kahi suggest karu shakel ka?

Raina
Thursday, September 07, 2006 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधारण तवा किती वर्ष टिकतो? उतप्पे आणि दोसे करुन माझ्या nirlep तव्याची वाट लागली आहे.. तवा टिकवायला काही विशेष Tips आहेत का?
तसेच T-Fal ची non-stick भांडी.. ती टिकलीत जरा जास्त- तेल कमी लागतं ती वापरल्यावर पण- ३-४ वर्षात, त्यांची ही रया जाते.


Supermom
Thursday, September 07, 2006 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना,
तीन चार वर्षे?
महान आहेस. माझी नॉनस्टिक भांडी, दोन वर्षातच शहीद होतात. मलाही आवडतील काही टिप्स असल्या तर.


Moodi
Thursday, September 07, 2006 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी इथे दिलेय बघ.

/hitguj/messages/103383/104744.html?1157630805

Raina
Thursday, September 07, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Supermomवाचून एकदम हायसं वाटलं- मला वाटलं की माझ्यातच गृहकृत्यदक्षता कमी आहे म्हणून ही वेळ येते. आपले पदार्थच असले एकेक असतात ना- की त्या तेलाने आणि चिकटून बसण्याने भांड्यांचा सत्यानाश होतो.
कोणीतरी सांगितले की लिंबू किंवा चिंच टाकून अशा भांड्यांमध्ये पदार्थ केल्यास अजूनच लवकर खराब होतात. Coating निघतं म्हणे.
मुडी- thanks a million. I have posted a reply on that BB where you have answered the query


Moodi
Thursday, September 07, 2006 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना हो गं, बहुतेक लिंबु(लिंब्या नाही) आणि चिंचेच्या acid मुळे तसे होत असावे. पण तशीही ही नॉनस्टीक भांडी जास्त टिकत नाहीत, तू वाईट नको वाटुन घेऊस.

मागे बीबीसीवर टेफालविषयीच लिंक आली होती की जास्त वापरु नका म्हणून. देव जाणे खरे काय ते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators