Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कारवारी तोय

Hitguj » Cuisine and Recipies » आमटी, कढी, पिठले » आमटी / डाळ » कारवारी तोय « Previous Next »

Lalitas
Saturday, February 04, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक लहान वाटी डाळ शिजवून घेऊन त्यांत दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून व एक इन्च आले बारीक चिरुन त्यांत मीठ घालुन उकळावी. वरणापेक्षा थोडी पातळच ठेवावी. तोयाला नेहमी तुपाची फोडणी करतात. त्यांत मोहरी, एक सुकी मिरची, कढीपत्ता व जास्तीचा हिंग घालावा. तोयांत खोबरं अजिबात घालत नाहीत. तोय भातावर घेताना ताजं लिंबू पिळुन घ्यावे.

Supermom
Saturday, February 04, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई,

हे वरण नागपूर कडे माझी आई नेहेमी करते. अर्थात त्याला तोय नाही म्हणत आम्ही. अन त्यात आल नाही टाकत. आता करून बघेन.


Veenah
Saturday, February 04, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता तुम्ही गोवा-कारवार कडच्या का? तोयाची रेसिपी लिहिलीत म्हणुन विचारले.

Lalitas
Saturday, February 04, 2006 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीणा, मी कारवारी आहे, आमच्याकडे तोय भात आणि केळ्याच्या, निरफणसाच्या (Breadfruit) नाहीतर माडीच्या(मोठ्या अरवी) खोबरेल तेलांत तळलेल्या काचर्‍या हा शाकाहारी बेत अतिशय आवडीचा...

Veenah
Sunday, February 05, 2006 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता आजोळच्या आठवणीने nostalgic वाटले ग! आता गोव्याहुन कोणी निरफणस आणि कासाळी माडीचा तुकडा घेऊन आले कि चार दिवस आमची मेजवानीच असते मग.
श्रावणी सोमवारी उपास सोडताना तोय भात, बटाटा किन्वा केळ्याच्या काचर्‍या आणि कोंब काढून सोललेल्या मुगाची उसळ किंवा मुगा-गाठी असाच मेनु हमखास ठरलेला असतो आमच्याकडे!

Savani
Sunday, February 05, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता ताई, छान आहे तोयाची रेसिपी. मला फक्त एक प्रश्न असा होता की डाळ कोणती घ्यायची असे काही आहे का? तुर किन्वा मूग कोणतिही चालेल का?

Lalitas
Sunday, February 05, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, तोय तुरीच्याच डाळीचं करतात

Savani
Wednesday, February 08, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता ताई, काल मी तोय केले होते. छान झाले होते. वेगळा प्रकार चान्गला वाटला.

Savani
Friday, February 17, 2006 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता ताई, तुम्हाला मला अगदी आवर्जून सान्गावस वाटत की, हे तोय आमच्याकडे अगदी फ़ारच आवडायला लागले आहे. रोज तेच करण्याची फ़र्माईश असते. आणि ह्या थन्डीच्या दिवसात आले घालुन फ़ार बर वाटते. मनापासून धन्यवाद.

Lalitas
Tuesday, February 21, 2006 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, मी तोय आठवड्यांतून एकदा तरी करते. तोयाबरोबर पोळ्या देखिल आमच्याकडे खातात. फोडणीसाथी तूप अगदी थेंबभर घेतले तर तोय प्रकृतीला पण चांगले.... वजन आटोक्यांत ठेवण्याच्या दृष्टीने!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators