Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गाजराचे लोणचे

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » लोणची » गाजराचे लोणचे « Previous Next »

Shyamli
Wednesday, January 18, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाजराचे लोणचे

गाजराचे लांबट काप करुन घ्यावेत त्याला मीठ लाउन ठेवावे थोड्यावेळानी त्याला सुटलेले पाणी काढुन फोडि पुसुन घ्याव्या

मसाला:
तिखट,
लसुण जरा ठेचुन घ्यावा pest नाहि करायच,
मीठ
लिम्बु,
फोडणिसाठि तेल,मोहरी, हिंग,हळद.

आता ह्या गाजराच्या फोडिंमधे तिखट, मिठ, लसुण आणि लिंबु सगळे एकत्र करुन घालावे वरुन फोडणि घालावि.

Prasadp77
Wednesday, January 18, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Shyamli,

Was tired of eating extremely oily Pakistani pickle. Trying this thing now, hope it turns out good

Rachana_barve
Thursday, February 23, 2006 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


4-5 गाजरं धु-उन पुसून चौकोनी तुकडे करून घ्यावेत. मग फ़ोडणी करायची.. त्यात भरपूर मेथ्या टाकून तळायच्या. मग मेथ्या कुरकुरीत झाल्या की खलबत्त्यात घेऊन ती फ़ोडणी कुटायची. अनि मग गाजरावर पसरून चवीप्रमाणी मीठ आणि तिखट घालायचे आणि वर भरपूर लिंबू पिळायचा. अगदी रस सुटेपर्यंत.. तेल थोड सढळच हाताने वापराव लागत नाहीतर कोरड कोरड लागत लोणच.. सही होत हे लोणच..


Rachana_barve
Thursday, February 23, 2006 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हो एखादी दुसरी लसणीची पाकळी ठेचून घातली फ़ोडणीत तरी छान चव येते.. hope this helps

Prr
Thursday, August 16, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण गाजराच्या फोडि घातल्यावर gas कधी बंद करायचा??

Shyamli
Thursday, August 16, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गॅस फक्त फोडणीपुरताच ऑन करा हो, :-)
फोडी नाहित शिजवायच्या

Dineshvs
Friday, August 17, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याही आवडीचे हे लोणचे. मी लिंबाच्या जागी लिंबुफ़ुल वापरतो.
एखाद दुसरे गाजर पडुन असते, त्यावेळी ते सत्कारणी लावायचा हा छान उपाय आहे.


Prr
Wednesday, August 22, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही ... :-)
नाही शिजवणार फोडी. thanks

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators