भरली झुकिनी - Bharli ghosali

Submitted by तृप्ती आवटी on 30 August, 2015 - 22:17
bharali ghosali
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एका झुकिनीचे साधारण तीन पेर लांबीचे तीन तुकडे होतील एवढ्या लांबीच्या तीन झुकिनी.

मसाल्यासाठी: १ वाटी बेसन, १ वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट, १ चमचा तीळ, २ डाव तेल, मीठ, कोथिंबीर, प्रत्येकी अर्धा मसाल्याचा चमचा: तिखट, गरम मसाला, धणेजिरे पूड (ऐच्छिक), आमचूर पावडर किंवा चाट मसाला किंवा लिंबाचा रस (ऐच्छिक).

क्रमवार पाककृती: 

बेसन थोड्या तेलावर भाजून घ्यावे. त्यात मसाल्यासाठी सांगितलेले इतर साहित्य घालून सगळा मसाला नीट हलवून घ्यावा. कोरडा वाटत असेल तर तेल घालावे. तेल घालण्याचा धीर होत नसल्यास पाण्याचा हात लावावा.

vxdmcv5.JPG

स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या झुकिनीचे सारख्या लांबीचे प्रत्येकी तीन तुकडे करावेत. त्यातला गर काढून टाकावा. हा पदार्थ ज्या व्यक्तीनं पहिल्यांदा बनवला त्याच व्यक्तीनं आपला तो हा शब्द अस्तित्वात आणला असावा अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे.

h4vugry.jpeg

झुकिनीच्या तुकड्यांना पाणी सुटतं. ते पुसून घ्यावं आणि अफजलखानाला तोफेच्या तोंडी द्यायचं आहे अशा आवेशात एकेका तुकड्यात मसाला ठासून भरावा.

nwoonva.jpeg

पसरट कढईत किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात हे तुकडे सोडावेत. (झुकिनीच्या) पाठी सगळ्या बाजूंनी छान खरपूस भाजून/तळून घ्याव्यात.

gkf4deh.jpegcoarwno.jpeg

पाठी शेकल्यावर सगळे तुकडे उभे करून बुडं (झुकिनीची) शेकावीत.

g1yz1ba.jpeg

उरलेला मसाला भाजीवर भुरभुरवून, कढई/पॅनवर झाकण ठेवून मंSSSद आचेवर भाजी शिजू द्यावी. आवडत असल्यास तीळ पण घालावेत. तो मसाला पण छान खरपूस होतो.

1imcsru.JPG

पोळीसोबतच चांगली लागते ही भाजी.

वाढणी/प्रमाण: 
साधारण २-३ तुकडे एका व्यक्तीला
अधिक टिपा: 

_मसाल्यात तेल जेवढं जास्त असेल तेवढी भाजी चविष्ट लागते.
_भारतात हडाळ (बहुतेक भाजून घेऊन) दळून आणलेलं जे बेसन असतं ते भाजलं नाही तरी कच्चट लागत नाही. इथे मिळणारं मात्र कच्च लागतं म्हणून भाजून घ्यावंच
_मीठ आपल्या चवीनं घालावं, न जमल्यास टीनाला विचारावं
_बेसन आणि दाण्याच्या कुटाऐवजी बेसन+तिळाचा कूट पण चालेल
_भारतात राहाणार्‍यांनी 'हमारे पास मां है, घोसाळी है, पिछले आंगन मे घोसाळे का वेल भी है...' म्हणत अशीच भाजी घोसाळ्यांची करावी
bharli ghosali recipe marathi

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<हा पदार्थ ज्या व्यक्तीनं पहिल्यांदा बनवला त्याच व्यक्तीनं आपला तो हा शब्द पहिल्यांदा अस्तित्वात आणला असावा अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे. >> Rofl

हमारे पास मां है, घोसाळी है, पिछले आंगन मे घोसाळे का वेल भी है...' वगैरे म्हणत हीच भाजी घोसाळ्यांची करावी>> यप्प Happy

भारतात राहाणार्‍यांनी 'हमारे पास मां है, घोसाळी है, पिछले आंगन मे घोसाळे का वेल भी है...' वगैरे म्हणत हीच भाजी घोसाळ्यांची करावी

>> झुकिनी घरपोच मिळते हो आजकाल. बिगबास्केट्.कॉम.

छान पाकृ! पडवळ, घोसाळी वापरूनही छान लागेल असं वाटतंय.

<<अफजलखानाला तोफेच्या तोंडी द्यायचं आहे अशा आवेशात एकेका तुकड्यात मसाला ठासून भरावा.>> येथे मी या झुकिनीच्या तयार तोफा शेवटी कोणावर तरी डागल्याची कल्पना करून हसून घेतलं! Lol

थोडस रवाळ डा.पीठ मिळत पटेल बंधुंकडे ते नाही भाजलं तरी चालतं.

दाण्याचा कुट,थोडे सुके खोबरे,भरपुर कोथींबीर, किसलेला/ठेचलेला लसुण, गुळ, कच्चे तेल, मिठ हे मिश्रण भरुन पण घोसाळी मस्त खमंग लागतात. झटपट ही होतात.

झुकिनीत भरुन बघायला हवे एकदा Happy

थँक्यु थँक्यु Happy

अकु, Happy

अमा, मुद्दा तो नाही हो. मूळ कृती भरल्या घोसाळ्यांची आहे आणि घोसाळ्याचीच भाजी जास्त चांगली लागते. इथे घोसाळी मिळत नाहीत, भारतात मिळतात तर खावीत की.

डागलेल्या तोफा भारी दिसतातयत!
गूढकथेमधे भरली झुकिनी हे नाव असलेला पदार्थ त्या बंगल्याच्या विक्षिप्त मृत मालकाला फार आवडत असे असं लिहून टाकता येईल.
" साक्षातचा विक्षिप्तपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता. आत्ता अपरात्री सव्वा दोनला उठून स्वयंपाकघरात चोरून भरली झुकिनी करताना त्याला पाहून श्वेताच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला."
Proud

आशुडी Lol
भाजी छान. फोटो मस्त. फोटोग्राफीचा क्लास बिस लावला की काय? Wink
मी आजवर झुकिनीची भाजी वगैरे कधीच केलेली नाही. भजी आणि पास्त्यातच पडते नेहमी.

आशुडी, Happy

वैदर्भिय पद्धतीने बनवलेली असली >>>> हे असं लिहून तुम्ही विळदी अस्मितेला कचर्‍याचा डबा दाखवलात की Proud

सायो, अगं ओट्याचा एक कोपरा आहे तिथे नॅचरल लाइटमुळे कशाचेही फोटो छान येतात Happy

असली भरली पडवळ आवडतात. झुकीनीला तोफेच्या का तोफेला झुकीनीच्या तोंडी लावायला देऊ आता.

झुकिनी ?
घोसाळे ?
मला दुसर्‍या ग्रहावर आल्याच फिलींग येतेयं .. अरे कोई है................................
फोटो जबरी आलेयत..

मस्तं पाककृती! भारी लिहिलिय. फोटोतर सुपर कातिल! शेवटला फोटो जानलेवा लेव्हलचा आहे.

आपले ते हे पोखरून भरले तर बरे लागतील का?

Pages