मायबोलीवरील विविध विभाग आणि सुविधा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago

मायबोलीवर खालील विभाग आहेत.

१. गुलमोहर - मायबोलीकरांनी लिहिलेले साहित्य [कथा, कविता, ललित लेख, विनोदी लेख, विविध कला (प्रकाशचित्रे, चित्रकला, हस्तकला)] इथे पहायला मिळेल.

२. रंगीबेरंगी - मायबोलीकरांचे स्वतंत्र ब्लॉग.

३. हितगुज - विषयवार - या विभागात विविध विषयांवर ग्रूप्स आहेत. मायबोलीकर यातल्या आवडीच्या ग्रूपचे सभासद होऊ शकतात. या ग्रूपमधले लेखनाचे धागे सार्वजनिक किंवा ग्रूप सदस्यांपुरते मर्यादीत ठेवण्याची सोय आहे.
या विभागातले काही विशेष ग्रूपः

४. हितगुज - माझ्या गावात - या विभागात जगातल्या विविध खंड/देश/राज्य/शहरांसाठी वेगळे ग्रूप्स आहेत.

५. पाककृती - विविध पाककृतींचा खजिना तसेच आहारशास्त्रासंबंधी चर्चा.

६. मदतपुस्तिका - मायबोलीवर वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या विभागात मिळतील.

७. मायबोली विशेष - मायबोलीवरचे आजपर्यंतचे सर्व उपक्रम या विभागात पाहायला मिळतील.

  • अ. अक्षरवार्ता - नव्याजुन्या पुस्तकांची ओळख करून देणारा, त्यांचं स्वागत करणारा मायबोलीवरील हा विभाग. नुकतीच प्रकाशित झालेली, किंवा उत्कृष्ट असूनही जरा दुर्लक्षितच राहिलेली अशी दर्जेदार पुस्तकं या विभागात आपल्याला चाळता येतील. दर महिन्याला निवडक अशा पुस्तकांतील काही भाग इथे आपल्याला वाचता येईल. या विभागासाठी मराठीतील नामवंत प्रकाशकांचे सहकार्य लाभले आहे.
  • ब. तेंडुलकर स्मृतिदिन - श्री. विजय तेंडुलकर - मराठी रंगभूमीला एक वेगळं वळण देणारे लेखक - यांचा प्रथम स्मृतिदिन १९ मे २००९ ला झाला. त्यांच्या नाटकांवर/व्यक्तिमत्त्वावर आधारित एक लेखमाला चालू केली.
  • क. साहित्य संमेलन - ८२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे पार पडले. या संमेलनातील निवडक कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे इथे आपल्याला ऐकता येतील.
  • ड. संवाद - आपल्या क्षेत्रात उत्तंग कामगिरी केलेल्या विविध मराठी व्यक्तिमत्त्वांबरोबर साधलेला संवाद.
  • इ. गणेशोत्सव - २००१ सालापासून धूमधडाक्यात साजरा होणारा मायबोलीकरांचा ऑनलाईन गणेशोत्सव.
  • फ. दिवाळी अंक - मराठीतला पहिला ऑनलाईन दिवाळी अंक २०००मध्ये मायबोलीने प्रकाशीत केला. त्यानंतर गेली १० वर्षे सातत्याने तंत्रज्ञानातील बदल स्वीकारत जोमाने चालू असलेला उपक्रम. २००६पासून दिवाळी अंकात दृकश्राव्य विभाग समाविष्ट केले आहेत.
  • ग. मराठी भाषा दिवस - २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा होतो. या वर्षी (२०१०पासून) यानिमित्ताने मायबोलीवर उपक्रम सुरू केले आहेत.
  • ह. गझल कार्यशाळा - नामवंत कवी आणि मायबोलीकर वैभव जोशी यांच्या पुढाकाराने चाललेल्या होतकरू गझलकारांसाठीच्या कार्यशाळा.

मायबोलीवर सभासदांना खालील सुविधा दिलेल्या आहेत.
१. विचारपूस - मायबोलीकरांना एकमेकांना संदेश लिहिण्याची सुविधा (scrap book). मायबोलीत प्रवेश केलेले इतर सदस्य ही विचारपूस वाचू शकतात.
२. संपर्क - जर सदस्यांना व्यक्तिगत संदेश पाठवायचा असेल तर ही सुविधा वापरू शकतात. हे संदेश पाठवलेल्या व्यक्तीला इमेलमध्ये मिळतात.
३. निवडक १० - मायबोलीवरील आवडलेले लेख्नन एका टिचकीसरशी आपल्या निवडक १० यादीत टाकू शकतात. सगळ्या मायबोलीवरील निवडक यादीसाठी इथे जाऊन सध्या सगळ्यांच्या आवडीचे काय आहे ते पाहता येईल.
४. पाऊलखुणा - एखाद्या सदस्याचे सर्व लेखन (फक्त लेखन किंवा प्रतिक्रिया दिलेले लेख) दाखविणारी यादी.
५. खाजगी जागा - प्रकाशचित्रं अथवा इतर फाईल्स साठविण्यासाठी १० MB व्यक्तिगत जागा. इथे साठवलेली प्रकाशचित्र अथवा फाईल्सचा दुवा कुठल्याही लेखात देता येतो.
६. शब्दखुणा (Free form Tags) - लेखकाला स्वतःला हवा तो टॅग लेख वर्गीकृत करण्यासाठी देता येतो.

विषय: 
प्रकार: 

अ‍ॅडमिन टीम, ही सगळी माहिती एकत्र टाकल्याबद्दल धन्यवाद. याचीच एक प्रत मदतपुस्तिकेत पण ठेवता येईल का?

व्वा छान संकलन..

जरा जास्तच मागतोय पण ह्या धाग्याची लिंक प्रत्येक सभासदाच्या सद्स्यत्वात येईल असे काही करता येईल काय? वि.पु. पाऊलखुणा सारखाच अजून एक दुवा?

मायबोली वरील लेखनासमोर लाल अक्षरात नवीन असे लिहिलेले असते त्याचा अर्थ काय? माझ्या दोन कविता नवीनच टाकलेल्या असूनही त्यांच्यसमोर ते दिसत नाही आणि इतर अनेक जुन्या पोस्ट्स समोर ते दिसतंय .. म्हणून हा प्रश्न पडलाय ... खुलासा केल्यास चांगलं वाटेल ..

वैद्य... नवीनचा अर्थ तुमच्यासाठी नवीन असा आहे...
तुम्ही लिहेलेल्या कविता ह्या इतरांना नवीन अशा दिसतील तर तुम्हाला त्या तशा दिसणार नाहीत कारण तुम्हीच त्या लिहिलेल्या आहेत... स्वतः लिहिलेले नवीन टॅग सह दिसत नाही...

गेल्या काही दिवसात मायबोलीवर असे काही धागे आलेत की जे बघता धागा लिहिणार्‍याला, वाचणार्‍यांपैकी अनेकांनाही माबो म्हणजे गुलमोहर-कविता विभाग आणि २-३ गप्पांटप्पांचे बाफ एवढीच व्याप्ती माहीत आहे की काय असे वाटले.
आता हा माझा गैरसमज असेल तर उत्तमच आहे. पण नसेल गैरसमज तर ज्यांना माहित नाही मायबोलीची व्याप्ती किंवा ज्यांना माहित करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा धागा वर आणत आहे. जेणेकरून गुलमोहर-कविता विभाग आणि गप्पाटप्पा यांच्यापलिकडेही मायबोली बरीच काही आहे हे कळून येईल.
अर्थात ज्यांना याची कल्पना आहे त्यांच्यासाठी हे पोस्ट नाहीच्चेय. Happy

एखाद्यच्य विपूत चित्र टाकायचे असेल तर काय करावे लागेल <<< असे करता येईल- दुसर्‍या बाफवर चित्र घालून पोस्ट लिहायची (टाकायची नाही.) आणि कॉपी करून विपुत टाकायची.

धन्यवाद या माहितीबद्दल. सदस्यत्व घेतल्यापासून ग्रुप्स दिसतात. पण तिकडे कसे जायचे आणि या ग्रुप्सचा उपायोग काय हे समजत नव्हते. पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. दुस-या प्रश्नाचे उत्तर इथे मिळू शकेल का ?

धन्यवाद अ‍ॅडमिन, छान संकलन! मला अजून एक सुविधा सुचवायची आहे. पूर्वी 'माझे सदस्यत्व' खालच्या 'लेखन' मधे प्रत्येक लेखावर किती प्रतिसाद आले ते दिसायचं शिवाय त्यात नवीन किती आहेत तेही कळायचं. हल्ली ते कळत नाही त्यामुळे नवीन काही प्रतिसाद आले आहेत का ते शोधण्यात खूप वेळ जातो. ही सुविधा परत उपलब्ध केली तर खूप सोय होईल. धन्यवाद!