पुणे:अजय जीटीजी- १ नोव्हेंबर २०१०

Submitted by चिनूक्स on 22 October, 2010 - 00:46
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे

मंडळी,

६ तारखेला बरेच मायबोलीकर पुण्यात नसल्याने आपले वेबमास्तर श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी आयोजित केलेल्या गटगची तारीख बदलावी, असा विचार सुरू आहे.

१ नोव्हेंबर, २०१०, म्हणजे येत्या सोमवारी, संध्याकाळी साडे सहा वाजता आपण भेटू.

स्थळ - मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे.

वेळ - संध्याकाळी साडे सहा

याशिवाय दिनांक १३ नोव्हेंबर रोजी, शनिवारी, दुपारी गटग आयोजित करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. ६ तारखेला मुंबईचे मायबोलीकर येऊ शकत नाहीत, त्यांना १३ तारखेला येता येईल.

तरी कृपया आपले मत http://www.maayboli.com/node/20616 इथे कळवावे.

१ तारखेला संध्याकाळी आपण भेटत आहोच, ज्यांना त्या दिवशी शक्य नाही, त्यांनी १३ तारखेची त्यांची उपलब्धता कृपया लवकरात लवकर कळवावी. ६ तारखेलाच जर जास्तीत जास्त लोकांना येणं शक्य असेल तर तसंही कृपया कळवा, म्हणजे निर्णय घेता येईल.

धन्यवाद.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Monday, November 1, 2010 - 09:00 to 12:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! उत्तमच, पण मी त्या आठवड्यात पुण्यात नाहीये. Sad मिरजेला चाललोय सुट्टी काढून.
पण येत्या सोमवारी भेट होईल अशी आशा आहे, उद्योजक ग्रूप गटग निमित्ताने. Happy

आरती आणि चिंचोके, कृपया वर दिलेल्या मेल आयडीवर मेल करून तुमची उपस्थिती कन्फर्म करा म्हणजे आम्हाला सोयीचे होईल.

मुंबै GTG नाहिये का ? >>> पाटिल ६ तारखेला ठाण्यात GTG आहेच...

मयुरेश... वेबमास्तरांचा मुंबई दौरा कधी आहे ते कळले तर मुंबईतही GTG ठरवता येईल.

चिंचोके,२८ तारखेपर्यंत कधीही मेल केलीत तरी चालेल :).

पाटील, मुंबईच्या लोकांनाही या जीटीजीचं आमंत्रण आहेच की. फक्त कसं आहे की अजय थोडेच दिवस इथे असणारेत त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जीटीजीला उपस्थित रहाणं त्यांना शक्य होणार नाही. आणि ते स्वतः पुण्याचे असल्याने जीटीजी पुण्यात होतय. तेव्हा तुम्ही या जीटीजीला यायचा विचार करा ना. सकाळी येऊन संध्याकाळी मुंबईला परत जाणं सहज शक्य आहे.त्यासाठीच दुपारची वेळ ठेवली आहे.

ओह इंद्रा ,नेमकं ६लाच ठाण्यात जीटीजी आहे का? हे नव्हतं माहित मला.

अजयचा मुंबईचा दौरा आहे की नाही ते अजयच सांगु शकेल.

इन्द्रा, ठाण्याच्या जीटीजीचे फक्त ठिकाण बदलावे लागेल तुला, तेवढे बदल अन पुण्यात ठरव ठाणेकरान्चे जीटीजी! हाय काय अन नाय काय त्यात! Happy

ठाण्याच्या जीटीजीचे फक्त ठिकाण बदलावे लागेल तुला >>> जल्ला तुला काय ते आयडी बदलण्या ईतपत सोप्प वाटल काय? :p

मयुरेश गेल्यावेळी पार्ल्यातील गटगला वेबमास्तर हजर होते...

Sad ६ तारीख जमत नाही. Sad
काय राव तुम्ही लोक. मास्तरांचा आटुग्राफ घेतला असता, एक फोटोबिटो काढुन घेतला असता, रेझ्युमेवर लिहीले असते, 'माझी आणि मास्तरांची (नसलेली) ओळख' यावर ४ ब्लॉग पोस्ट, एक माबो लेख आणि झालंच तर एक लघूकादंब्री लिहीली असती. आता यातले काही काही करता येणार नाही. Light 1 Proud

मग हे कसे करता आले नाही, ह्यावर ४ ब्लॉग पोस्ट, एक माबो लेख आणि झालंच तर एक लघूकादंब्री लिही ना! हाकानाका! मग आम्ही रैना फॅन क्लब काढू! Proud

ओ वेबमास्तर, एक मुंबई-ठाणा वारी करा हो... इथल्या लोकांच्या प्रतिभेच्या अंकुराची तुम्ही नकळत जाळपोळ करताय Biggrin

>> 'माझी आणि मास्तरांची (नसलेली) ओळख' यावर ४ ब्लॉग पोस्ट, एक माबो लेख आणि झालंच तर एक लघूकादंब्री लिहीली असती. आता यातले काही काही करता येणार नाही.

रैने, यासाठी प्रत्यक्ष थोडच भेटावं लागतं? Proud

शैलजा, मंजू, चिमण Lol
लिहीतेच आता
मुंबै- पुणे प्रवासाचे वर्णन (खास आगाऊ साठी), मुंबैपुणे भूगोल आणि महाराष्ट्रातील राजकारणावर लेख, त्या प्रवासातल्या प्रत्येक मिनीटाला १ याप्रमाणे फोटो, मग फोटोग्राफीची लेन्स आणि डोळ्यांचे विकार असा लेख, वावा! भरला ब्लॉग, भरला ! जाऊ नशकलेल्या जीटीजीवृत्तांताने ! थँक्यु.
कविता राहिल्याच नाही ? त्याही लिहू?

चिमण- विंदा म्हणतात
'प्रत्यक्ष भेटली का, नव्हती तशी जरुरी,
स्वप्नात होत होत्या, तसल्या अनेक भेटी,
हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची, उद्या असेल साठी' Lol

>>कविता राहिल्याच नाही ? त्याही लिहू? >> रसग्रहण करता येण्याजोग्या आणि चर्चेला पात्र असतील तरच लिही. Proud

Pages