पुत्रंजीव

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

त्र्यंबकेश्वर किंवा पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्री सध्याच्या दिवसात गेलो तर तुळशीच्या माळेसोबत एक खास प्रकारची माळ विकायला असते. लाकडाच्या शंखाकृती मण्यांसारख्या दिसणार्‍या बियांच्या माळा असतात या. लहान मुलांच्या गळ्यात या माळा घालायच्या असतात. मुलांना दृष्ट लागू नये म्हणून या माळा घालतात.
सध्या मुंबईत या झाडांना बहर आलाय. झाडाखाली या फळांचा सडा पड्लेल्या असतात.

ही झाडे रस्त्याच्या कडेला शोभेसाठी लावलेली आहेत. लांबट हिरव्यागार रंगाच्या पानांची हि झाडे वर्षभर पाने राखुन असतात. या दिवसांत त्याना हिरवी फुले येतात आणि मग बोराएवढी हिरवीच फळे येतात. फळे काही खाण्याजोगी वाट्त नाहित. कुणीच खाताना दिसत नाही. आत या बिया असतात. मुंबईत हा उपयोगही कुणाला माहित आहे असे वाट्त नाही, कारण कुणी बिया गोळा करतानाही दिसत नाही.

पण या बियांचा असा वापर पुर्वापार होत असावा. त्यावरूनच हे नाव पडले आहे. इतकेच नव्हे याचे शास्त्रीय नावही Putranjiva roxaburghii असे आहे.

putranjeev.jpg

पण नेमक्या कुठल्या कारणामुळे या बियांचा असा उपयोग होतो त्याबद्दल मात्र कुठेच काही वाचायला मिळाले नाही.

विषय: 
प्रकार: 

दिनेशदा, हया वृक्षाचे नाव पण कधी ऐकले नाही, पाहणे दूरच. आणि फोटोत दिसतोय तो कापूस आहे का तसेच काही - एका फांदीवर दिस्तोय बघ.

भाग्या तो कापुस नाही. एका पक्ष्याचे पीस आहे.
तशी या बियांची माळ फॅशन म्हणुनही घालता येइल.इथे खुप आहेत झाडे हि.

मलाही हे झाड माहीत नव्हतं.

मी काही दइवसांपुर्वी काही गवत फुलांचे फोटो पोस्ट केले होते.
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=1027518#POST...
या इथे, आणि कोणाला माहीती असेल तर सांगा म्हटले होते.
दिनेश शिवाय कोणी सांगु शकतोका पहात होतो. पण नाही.

या नवीन मायबोलीत जरा त्रासाचं होतय, पुर्वी सारख एकदा दिनेशच पान काढलं की सलग वाचता येत नाही. प्रत्त्येक पोस्ट वेगळी उघडावी लागते आणि प्रतिसादही त्या त्या पोस्ट्ला द्यावा लागतो.
सवयीच होईल हळू हळू .

सुधीर
ते निळी जिभ असलेलं पांढरे फुल आहे ते आहे भारन्गी चे. त्याबद्दल मी लिहिले होते. लाल पिवळी फुले आहेत त्याला हळदकुन्कु असे म्हणतात. बाकीच्या तेरड्याच्या जाती आहेत.
आपल्या सगळ्यान्च्या सुचनांचा Admin विचार करतच असणार. आपण थोडि वाट बघु.

ह्या नावाने ओळख करून दिलेले झाड आणि तुम्हि दिलेला फोटो ह्यात खुप फरक आहे. मी पाहिलेले पुत्रंजीवी/चिरंजीवि हे पाने नविन असताना पोपटी आणि जुनी झाल्यावर गडद हिरवी आहेत. आणि पानेही एकाखाली एक अशि आहेत (म्हणजे लाम्ब दांडिवर दोन्हि बाजुला अशी), त्यामुळे झाड खुप छान दिसते. माटुन्ग्याला खुप पाहिलीत, राणिबागेतही आणि पुर्ण मूम्बइतही. फळे काही पाहिली नाहीत. बहुतेक हिरव्या रंगामुळे मिस झालई असावित. सर्वांगसुंदर असा हा माझ्या आवडीचा वृक्ष आहे.

मला माहित असलेले हेच ते पुत्रंजीवि -- कदाचित वरचा फोटो ह्याचाच असावा पण मला वेगळा वाटला.
http://www.flickr.com/photos/dinesh_valke/372127890/

साधना.

तेच झाड आहे हे साधना. हिरव्या रंगामूळे फळे दिसत नाहीत, म्हणुन फळांचा क्लोजप घेतला मी. यात नर आणि मादी असे दोन प्रकार आहेत. नर झाडाला फळे लागत नाहीत.

नर आणि मादी झाड. हे नवीनच ऐकतोय. पण एकदम छान वाटल.

अशी आणखीही झाड असतात का हो? (नर आणि मादी)

अरे च्चा खुप झाडे असतात अशी. सगळ्यात ओळखीचे उदाहरण म्हण्जए पपई....

खरच खूप मजा वाटतेय ऐकून.

पण कस ओळखता येइल नर झाड कोणते आणि मादी झाड कोणते (पपई च उधारण घेतल तर)

आणखी अशी कोणती झाड तूम्हाला माहीती आहेत?

दिनेश, ही हळदी कुंकवाची फुलं मी आमच्या (मिरजेच्या) माळावर खुप वेळा बघितली आहेत. मला वाटते घाटात पण बघितली आहेत बहुदा. ह्याच जातीतली पण वेगळ्या रंगाची फुले पण दिसतात. लाल पिवळ्या बरोबर निळा पांढरा रंग कॉमन आहे.

दोस्तानो, हे इथे काहि लिहिलेय हेच लक्षात आले नव्हते.
नर मादि प्रकार जायफळ, पपई, रातांबा, डाळींब, खजूर अश्या अनेक झाडात असतो. फुलावर आल्याशिवाय ते कळतच नाही. निसर्गात हे प्रमाण ५० ट्क्के असते. पण बाग लावताना तेवढे प्रमाण ठेवत नाहीत.
घाटकोपरला स्टेशनच्या बाजूला पपईचे नर मादि झाड होते. त्या नर झाडाला फळेही लागत असत.
या हळ्दीकुंकवाच्या झाडाबद्द्ल लिहिन.
फुलात पांढरा, गुलाबी आणि पिवळा हे जास्त करुन एकत्र आढळतात. गुलबक्षी सावर सारख्या झाडात हे तिन्ही दिसतात.
याच तीन रंगाच्या छटा मिसळुन बरेचसे रंग साधले जातात.
निळा रंग जरा दुर्मिळ.
हे रंग वा परागकण तयार करण्यासाठी झाडाची बरीच शक्ती खर्च होते. त्याचे व्यावस्थापन कसे केले जाते, तेही बघुच.
एक उदा देतो. आंब्याचे झाड आपली सगळी पाने कधीच गाळत नाही. पण जुनी पाने त्यागणे आवश्यक असते. बाकिची झाडे वर्षातुन एकदाच सगळी पाने गाळतात. आंबा मात्र वर्षभर पाने गाळुन, समतोल साधतो.