मी आणि माझी कविता.....

Submitted by लाजो on 13 October, 2010 - 00:36

मी आणि माझी कविता....

आजकाल सगळेच पाडतात म्हंटल आपणही एक पाडुयात,
पब्लिकला छळायची हाती आलेली संधी का बर दवडुयात .. Proud

सकाळपासुन डोक्यात गुणगुणतोय टवाळ भुंगा,
हजारएक शब्दांनी घातलाय विशाल दंगा....

हाती घेतली पेन्सिल, समोर ठेवली कोरी वही,
सग़ळ्यात प्रथम पानावर ठोकली 'लाजो' सही....

गझल करावी का? नको, ती बेफिकीरी आपल्यात नाय,
चारोळ्या करायला पब्लिकला प्रतिसादात वाव हाय.... Proud

झुरळं झाल, ढेकुणं झाला, आणि झाली गाय,
आता आपल्याला लिहायला स्पेशल प्राणीच उरला नाय.... Sad

निसर्गावर लिहु? वर्षा की मयुर? कैलास छेदु की पाषाणच भेदु?
नको त्यापेक्षा देवी, आई, सासु, 'ती' या स्त्रीवर्गालाच वंदु.... _/\_

मग म्हंटल एखादी वस्तुस्थितीच मांडुयात,
ज्वलंत काहीतरी लिहुन गंगाधरालाच कोंडुयात....

जाऊदे नकोच, पब्लिक म्हणेल, ही कस्ली आहे आगाऊ,
त्यापेक्षा प्रेमाच्या सुर्यकिरणांचा प्रसन्न प्रकाश फैलावु....

माझ्या लेखनाचा स्पीड बघुन द्रूपालाचीही शक्ती संपली,
नुसत्या शब्दांच्या उल्हासात ही कै च्या कै पडली..... Lol

'लाजो'

डिस्लेमरः यात कुणाच्या नावाचा उल्लेख आला असेल तर तो केवळ योगायोग समजावा. कुणाच्या नावाचा उल्लेख आला नसेल तर तो द्रुपालाचा दोष समजावा व कृपया माझ्यावर रोष येउ न द्यावा. कोणतीही कंपुशाही नाही Happy

'लाजो'

शब्दखुणा: 

वर्षे,:तु स्त्री वर्गात येतेसच की >>> हो .. तरी मला स्पेशल ट्रीटमेंट हवी.. :हातपाय झाडणारी बाहुली:

लाजो Biggrin

लाजो Rofl मस्त!
ह्या कवितेत माझ्या नावाचा उल्लेख नाही याचा अर्थ मी माझ्या कविता अजिबात विडंबन करण्यासारख्या किंवा हस्यास्पद नसतात असाच घेते...ऑप्टीमिझम यु नो..जय हो!! Proud

माझ्यासारख्या स्वघोषित कविच्या कवितेपेक्षा कितीतरीपट अधिक सुंदर,लयदार,पाणिदार्,आशयदार,भावगर्भदार कविता.

नाद आहे, लय आहे... बरंच काही आहे. आवडली.

पुलेशू Happy

मुटेसर धन्यवाद Happy खिल्ली उडवताय ना Wink तुमच्या कविता जरा गहन असतात. माझ्यासख्या कै च्य कै कवींच्या डोक्यावरुन जातात Happy

<< मुटेसर धन्यवाद खिल्ली उडवताय ना >>

नाही, खिल्ली नाही उडवत. खरं तेच बोलतोय. कविता म्हणुन "कै च्या कै" लिहिणारापेक्षा तुमच्या हातून खरंच "कै च्या कै" म्हणुन "कविता" लिहिली गेली आहे. तुम्ही मनावर घेतले तर नक्किच चांगल्या कविता करू शकाल. शुभेच्छा. Happy

सर्वांचे आभार Happy

मुटेसर, धन्यवाद Happy प्रयत्न करेन जरुर Happy

दक्षे Happy नको... अजुन नाही लांबवत... ते पब्लिकसाठी ठेवलय Happy कुणाला सुरसुरी आलिच तर लांबवतिल Proud

लाजो Rofl
हे असेच काहितरी पाडत राहिलिस तर लवकरच आम्हाला "कैच्याकै" मधून पळ काढावा लागेल.... Lol

मस्तच जमलिये.....

लाजो, मी "बेईमान" का????? Sad
आधीच गगोकर्स "जनमानसातली" (की बाईमाणसातली???:फिदी:) माझी इमेज बिघडवतायत्....त्याला तुझाही हातभार....... कुठे फेडाल ही पापं..... Lol

Pages