प्रतिक्षा.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 November, 2008 - 03:53

पळ्भर थांबुन सजणा
का हो परतीची धांदल करता ?
डोळे भरुन साठउदे तुमची मुर्ती
पुन्हा येणार्‍या विरही मनमंदिरी पुजेकरीता.

एकदातरी घ्या माझ्या विखुरलेल्या मनाचा ठावठीकाणा
सदैव दिसेल तो तुमच्याच साथीला चिकटलेला.
देहाला सारुन देतो दिवस कसातरी कष्टाचा रगाडा
पण रातराणीचा सुगंध करतो व्याकुळ तुमच्या मिलनाला.

शृंगारही नेहमीच पडतो फिका
गजरा पण भासतो नागिणीसारखा
अलंकारही लाउन घेतात मग लोखंडी मुलामा
सजणा एकदा सजउद्या शृंगार तुमच्यासाठी आसुसलेल्या देहाचा.

कधीकधी स्वप्नांची रांगोळी घालते ऋदयाच्या अंगणी
अश्रु मग पसरवतात तिला तुझ्या आठवणींनी.
किती काळ सहन करु ह्या विरहातली आहुती ?
सजणा कधी रे येईल आपल्या सहवासाची दिपावली ?

गुलमोहर: 

ऑSSS, जागू !!! लई फास्ट !

ही पण विरहिणी सांगते गृहिणी
ऐक साजणी तिची मागणी
व्यथेची झरणी, करी मनधरणी

<<शृंगारही नेहमीच पडतो फिका
गजरा पण भासतो नागिणीसारखा>>

जगु, मस्तच रे, लिखते रहो

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

जागु मस्तच... लिहित रहा... Happy

>>डोळे भरुन साठउदे ...>>
साठवू दे
>>अलंकारही लाउन घेतात ..>>
लावून घेतात
>>सजणा एकदा सजउद्या >>
सजवु द्या
>>कधीकधी स्वप्नांची रांगोळी घालते ऋदयाच्या अंगणी..>>
हृदयाच्या (स्मॉल एच - कॅपिटल आर - स्मॉल यु ... पुढचे सेम)
.
.
वेगळं लिहायचा प्रयत्न चांगला जमलाय. Happy

धन्यवाद अश्विनी, विशाल, कौतुक, चेतना.
पल्लवी तुमचे मार्गदर्शन हवे आहेच. धन्यवाद.