दहा पंधरा वर्ष वेगवेगळ्या प्रसंगाच्या आठवणींसाठी म्हणुन बाटल्या ठेवल्या. त्या माळ्यावर साठविल्या होत्या. नंतर नविन बंगला बाधल्यावर कंपाउंडच्या भिंतीवर लावण्यासाठी त्या सर्व नेल्या. पण त्याआधिच भिंतीचे प्लॆस्टर झाले होते, त्यामुळे त्या तशाच खालच्या कपाटात राहिल्या. भंगारवाल्याच्या एक रुपयाला एक बाटली देण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता.
एक दिवस रिकाम्यावेळी मनात आलं बाटली रंगवावी, सहज म्हणुन त्यातल्या ३ बाटल्या गरम पाण्यात भिजत घातल्या. त्यावरचे कागद काढले. कोरड्या केल्या. नंतर पांढरा अॅक्रेलीक रंग बाटलीला दिला. एखाद्या कागदावर नक्षी काढावी त्याप्रमाणे बाटलीवर डायरेक्ट ब्रशने निळ्यारंगाचे डिझाईन काढले. ब्लू पॉटरी प्रमाणे ती बाटली दिसायला लागली. त्याच निळ्या रंगात तिनही बाटल्या रंगविल्या. त्यांचा एक छान ग्रुप तयार झाला. पांढर्या निळ्या खोलीत ठेवल्यावर त्या अधिकच खुलल्या. तेव्हापासुन माझा रोजचाच उद्योग झाला.
फक्त अॅक्रेलिक रंग व ब्रश एव्हड्याच साहित्यात या बाटल्या रंगतात. कधी त्याच्यावर आरश्याचे तुकडे चिटकविले, कधी टिकल्यांनी, जयपुरी स्टोनने डिझाईन केले. अॅक्रेलिक रंग हे धुता येतात, झटपट वाळतात व काचेवर चांगले बसतात. कोणीही हे काम करु शकतं. मेमेंटो म्हणुन देता येतात. थोडीशी कल्पनाशक्ती, थोडे रंग व रिकामी बाटली. अगदी सॉसची सुद्धा चालेल. स्वयंपाक घरात ठेवण्यासाठी तुम्ही तिच्यावर फळा, भाजी चे चित्र काढु शकता. करुन पहा. माझे तर फारच कौतुक झाले, तुमचेही होईल.
तळतिप: (माझी मुलगी वर्षा नायर हिने मला ह्या स्पर्धेमधे मी भाग घेण्यासाठी खुप आग्रह केला, व तिनेच माझ्यासाठी त्यामुळे मायबोलीचा आयडीदेखिल घेतला.)
काकु मस्तच !!!! खुप
काकु मस्तच !!!! खुप आवड्ल्या..
@ वर्षा वेल डन
अरे क्काय आयडिया आहे! बेस्टच!
अरे क्काय आयडिया आहे! बेस्टच! काळ्या पांढर्या आणि मनीप्लॅंटवाली जबरदस्त! आयडीया भारी आणि तुमची चित्रकलाही भारी! धन्स वर्षा, गणेशोत्सवानंतरही आईच्या अजून कलाकृती येतील इथे असं बघ.
मस्त! माझ्याकडे बाटल्यांचं
मस्त!
माझ्याकडे बाटल्यांचं कलेक्शन भरपूर झालंच्चेय. आता करावाच हा उद्योग..
खुप सुंदर कलाकृती ..
खुप सुंदर कलाकृती ..
सुरेखच!
सुरेखच!
क्या बात है!
क्या बात है!
मस्तच..
मस्तच..
खूपच सुंदर. इथे शेअर
खूपच सुंदर.
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
आईच्या वतीने मी सगळ्यांचे खुप
आईच्या वतीने मी सगळ्यांचे खुप खुप आभार मानते. तिला अजुन मराठीत typing वैगरे जमत नाही. actually computer आणि तिचा तसा दुरचाच संबंध.
तिने हाताने कागदावर मजकुर लिहुन दिला तो माझ्या भावाने scan करुन मला इ-मेल केला आणि मी तो टाईप करुन संयोजकांना फोटोसकट पाठविला.
(त्यामुळे अर्थात मजकुर तिनेच लिहिला आहे).
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद प्रतिक्रीया दिल्याबद्दल.
तिने ब्लु थिम मधे आणि वेगवेगळ्या थिम्स मधे पण बाटल्या रंगविल्या आहेत. वारली डिझाईन मधे देखिल रंगविल्या आहेत. पण सगळे फोटो इथे टाकणे शक्य नव्हते.
अप्रतिम सुरेख आहेत सगळे.
अप्रतिम सुरेख आहेत सगळे.
खास !!! खूपच सुंदर
खास !!! खूपच सुंदर
अप्रतिम आहे!
अप्रतिम आहे!
भन्नाट....! मनीप्लँटवाली
भन्नाट....!
मनीप्लँटवाली विशेष आवडली. ते पान अगदी खरं वाटतंय. >> १००% अनुमोदन.
@वर्षा - एखाद्या वेबसाईट वर अपलोड कर ना सगळे. अप्रतिम कलाकृति आहेत.
सुरेख! तुमच्या कल्पनाशक्ती व
सुरेख! तुमच्या कल्पनाशक्ती व कलाकारीला दाद!
खूपच छान!!!
खूपच छान!!!
क्या बात है! जबरी आहे एकेक
क्या बात है! जबरी आहे एकेक डिझाईन.
सुपर्ब!!! शब्द अपुरे पडतील
सुपर्ब!!! शब्द अपुरे पडतील वर्णन करायला. बघतच रहावी अशी डिझाईनस् आहेत.
वाह! उच्च कल्पना आहे! फार
वाह! उच्च कल्पना आहे! फार मस्त वाटताहेत जुन्या बाटल्या.
अप्रतिम!!!! तुम्ही डायरेक्ट
अप्रतिम!!!! तुम्ही डायरेक्ट बाटल्यांवर डिझाइन काढलेत? ग्रेट आहात.
गणेशोत्सवानंतरही आईच्या अजून कलाकृती येतील इथे असं बघ. >>> आशूडीला मोठ्ठा मोदक (उकडीचा :फिदी:)
अप्रतिम आहे ही कलाकारी !!
अप्रतिम आहे ही कलाकारी !! ग्रेट !
गणेशोत्सवानंतरही आईच्या अजून
गणेशोत्सवानंतरही आईच्या अजून कलाकृती येतील इथे असं बघ. >>> आशूडीला मोठ्ठा मोदक (उकडीचा ) >>>
आशुडी, प्राची नक्की जरुर टाकेन. ती सुरेख पेंटीग्ज करते. माहेरचे घर, आणि आम्हा तिनही भावंडांच्या घरी तिचिच पेंटिग्ज घराची शोभा वाढवितात.
खुपच छान कलाकुसर.... मला त्या
खुपच छान कलाकुसर....
मला त्या काळ्यापांढर्या बाटल्या सगळ्यात आवडल्या
भारी आहेत!!!!!!!
भारी आहेत!!!!!!!
अप्रतिम ! पहिल्या काळ्या
अप्रतिम ! पहिल्या काळ्या पांढर्या तर एकदम क्लासी !
अप्रतिम.. माझ्याकडे भरपुर
अप्रतिम..
माझ्याकडे भरपुर बाटल्या आहेत...
इथले टा. टि. वाचुन मला अगदी हुरुप आलाय. इथे वाचताना अगदी सोप्पेय असे वाटते. कामाला सुरवात केल्यावर कळेल किती सोप्पेय ते.
वा एकदम मस्त! घरी एखादी
वा एकदम मस्त! घरी एखादी रिकामी बाटली शोधून प्रयोग केला पाहिजे.
Pages