टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र.६ - रोझा

Submitted by संयोजक on 16 September, 2010 - 13:37

TT_Roza_aai-b1.jpg
दहा पंधरा वर्ष वेगवेगळ्या प्रसंगाच्या आठवणींसाठी म्हणुन बाटल्या ठेवल्या. त्या माळ्यावर साठविल्या होत्या. नंतर नविन बंगला बाधल्यावर कंपाउंडच्या भिंतीवर लावण्यासाठी त्या सर्व नेल्या. पण त्याआधिच भिंतीचे प्लॆस्टर झाले होते, त्यामुळे त्या तशाच खालच्या कपाटात राहिल्या. भंगारवाल्याच्या एक रुपयाला एक बाटली देण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता.
TT_Roza_aai-b4.jpg
एक दिवस रिकाम्यावेळी मनात आलं बाटली रंगवावी, सहज म्हणुन त्यातल्या ३ बाटल्या गरम पाण्यात भिजत घातल्या. त्यावरचे कागद काढले. कोरड्या केल्या. नंतर पांढरा अ‍ॅक्रेलीक रंग बाटलीला दिला. एखाद्या कागदावर नक्षी काढावी त्याप्रमाणे बाटलीवर डायरेक्ट ब्रशने निळ्यारंगाचे डिझाईन काढले. ब्लू पॉटरी प्रमाणे ती बाटली दिसायला लागली. त्याच निळ्या रंगात तिनही बाटल्या रंगविल्या. त्यांचा एक छान ग्रुप तयार झाला. पांढर्‍या निळ्या खोलीत ठेवल्यावर त्या अधिकच खुलल्या. तेव्हापासुन माझा रोजचाच उद्योग झाला.
TT_Roza_aai-b2.jpg
फक्त अ‍ॅक्रेलिक रंग व ब्रश एव्हड्याच साहित्यात या बाटल्या रंगतात. कधी त्याच्यावर आरश्याचे तुकडे चिटकविले, कधी टिकल्यांनी, जयपुरी स्टोनने डिझाईन केले. अ‍ॅक्रेलिक रंग हे धुता येतात, झटपट वाळतात व काचेवर चांगले बसतात. कोणीही हे काम करु शकतं. मेमेंटो म्हणुन देता येतात. थोडीशी कल्पनाशक्ती, थोडे रंग व रिकामी बाटली. अगदी सॉसची सुद्धा चालेल. स्वयंपाक घरात ठेवण्यासाठी तुम्ही तिच्यावर फळा, भाजी चे चित्र काढु शकता. करुन पहा. माझे तर फारच कौतुक झाले, तुमचेही होईल.
TT_Roza_aai-b3.jpg

तळतिप: (माझी मुलगी वर्षा नायर हिने मला ह्या स्पर्धेमधे मी भाग घेण्यासाठी खुप आग्रह केला, व तिनेच माझ्यासाठी त्यामुळे मायबोलीचा आयडीदेखिल घेतला.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे क्काय आयडिया आहे! बेस्टच! काळ्या पांढर्‍या आणि मनीप्लॅंटवाली जबरदस्त! आयडीया भारी आणि तुमची चित्रकलाही भारी! धन्स वर्षा, गणेशोत्सवानंतरही आईच्या अजून कलाकृती येतील इथे असं बघ. Happy

आईच्या वतीने मी सगळ्यांचे खुप खुप आभार मानते. तिला अजुन मराठीत typing वैगरे जमत नाही. actually computer आणि तिचा तसा दुरचाच संबंध.
तिने हाताने कागदावर मजकुर लिहुन दिला तो माझ्या भावाने scan करुन मला इ-मेल केला आणि मी तो टाईप करुन संयोजकांना फोटोसकट पाठविला.
(त्यामुळे अर्थात मजकुर तिनेच लिहिला आहे).

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद प्रतिक्रीया दिल्याबद्दल.
तिने ब्लु थिम मधे आणि वेगवेगळ्या थिम्स मधे पण बाटल्या रंगविल्या आहेत. वारली डिझाईन मधे देखिल रंगविल्या आहेत. पण सगळे फोटो इथे टाकणे शक्य नव्हते.

भन्नाट....!
मनीप्लँटवाली विशेष आवडली. ते पान अगदी खरं वाटतंय. >> १००% अनुमोदन.

@वर्षा - एखाद्या वेबसाईट वर अपलोड कर ना सगळे. अप्रतिम कलाकृति आहेत.

अप्रतिम!!!! तुम्ही डायरेक्ट बाटल्यांवर डिझाइन काढलेत? ग्रेट आहात. Happy

गणेशोत्सवानंतरही आईच्या अजून कलाकृती येतील इथे असं बघ. >>> आशूडीला मोठ्ठा मोदक (उकडीचा :फिदी:)

गणेशोत्सवानंतरही आईच्या अजून कलाकृती येतील इथे असं बघ. >>> आशूडीला मोठ्ठा मोदक (उकडीचा ) >>>
आशुडी, प्राची नक्की जरुर टाकेन. ती सुरेख पेंटीग्ज करते. माहेरचे घर, आणि आम्हा तिनही भावंडांच्या घरी तिचिच पेंटिग्ज घराची शोभा वाढवितात. Happy

अप्रतिम..

माझ्याकडे भरपुर बाटल्या आहेत... Happy

इथले टा. टि. वाचुन मला अगदी हुरुप आलाय. इथे वाचताना अगदी सोप्पेय असे वाटते. कामाला सुरवात केल्यावर कळेल किती सोप्पेय ते.

Pages