किलबिल : रेन शेकर - जुई भावे

Submitted by संयोजक on 15 September, 2010 - 22:46
रेन शेकर

मायबोली आयडी : अमृता
नाव : जुई भावे
वय : ८ वर्षे


उन्हाळ्यात पावसाचा आवाज ऐकावासा वाटतोय?? स्वतःच्या म्युझिकवर नाचावसं वाटतय? बनवा रेन शेकर. :).

वापरलेले साहित्य : पेपर रोल संपल्यावर उरलेली गोल नळकांडी, इथुन तिथुन जमवलेली डेकोरेशन सामग्री, रंग, अल्युमिनीयम फॉईल.
१) सर्वप्रथम नळकांडीला आपल्याला आवडेल तो रंग द्यावा. त्यावर आवडेल ते डिझाईन काढावं.
२) अ‍ॅल्युमिनीयम फॉईलचे साधारण ४ इंच व्यासाचे ६ गोल कापावेत.
३) नळकांडीच्या एका टोकाला ३ फॉईलचे गोल एकत्र करुन लावावेत.
४) नळकांडीच्या दुसर्‍या टोकातुन मुठभर तांदुळ आत टाकावेत.
५) ते टोकही ३ फॉईलचे गोल एकत्र करुन बंद करुन टाकावे.


रेन शेकर तयार :) आता शेक करा आणि नाचा.

Kilbil_JuiBhave_RainShaker.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!! दोन हातात दोन शेकर्स घेऊन नाच करतानाचा विडीओ टाक आता!
अम्मो, तिला चित्र पण काढायला लाव, एक छान लय आहे तिच्या डिझाईनमधे. Happy

great job, Jui!

मस्तच आहे खेळणे हे. मी कधीच हा प्रकार बघितला वा ऐकला नव्हता. काहि देशांत पावसासाठी आसुसलो होतो, तिथे हे नक्कीच उपयोगी पडले असते.

मस्त जुई! खूप मस्त डेकोरेट केलंय. Your shaker looks amazing, shake it shake it!

ईशाच्या शाळेत त्यांनी असं शेकर बनवलं होतं. घरी परत मग ईशा-ऋचानी एकेक शेकर बनवलं होतं.

Pages