गणपती बाप्पा - माय फ्रेंड गणेशा... :)

Submitted by सेनापती... on 15 September, 2010 - 01:14

शामिकाच्या मावशीकडचा दीड दिवसाचा गणपती यंदा आमच्या दोघांच्या हस्ते बसवला होता. संपूर्ण सजावट शामिकाने फुले वापरून केली. ह्या २ दिवसात घेतलेले काही फोटो... Happy

१. ऑर्किड आणि जरबेराच्या फुलांची सजावट.

२.

३.

४.

५.

६. संपूर्ण सजावट

७.

८. आंबा आणि संत्रा मोदक Happy

९. उकडीचे मोदक.. Happy

१०. ऋषीपंचमीच्या भाजीची तयारी.

११.

१२.

गुलमोहर: 

सजावट फारच छान झाली आहे!! शमिकाने स्वत: केली का?? केली असेल तर तीला स्टेप बाय स्टेप स्पष्टिकरण (?) टाकायला सांग ना.
बाकी गणपतीत ही तु खादाडी विसरला नाहीस हे बघून खूप बरं वाटलं!! Light 1
सगळे फोटो मस्त!!

सुंदर गणपती आहे. भटक्या त्यांच्याकडे बाळगणपतीच बसवतात का? म्हणजे मुकुट नसलेला. माझ्या आईबाबांकडेपण तसाच असतो. Happy
सजावट अतिशय अप्रतिम झालीये. शमिकाने कशी केली ते वाचायला आवडेल. तिचा हा व्यवसाय आहे कि छंद? Happy

प्रचि आवडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद..

रोचीन ... होय सजावट तिने स्वतः घरीच केली. स्टेप बाय स्टेप लिहितो जमले तर. फार कठीण नाही ते.

सावली... होय त्यांच्याकडे मुकुट नसलेला बाळगणपतीच बसवतात. १०० हून अधिक वर्षे झाली. शमिका खरेतर व्यवसाय करू शकेल इतके छान करते पण अजून तरी छंद म्हणूनच करते.

मस्त Happy सजावट्...बाप्पा... मोदक... सगळंच मस्त मस्त मस्त !!!
मला ५ वा फोटो जबरदस्त आवडला Happy

मस्त केली आहे सजावट.... सर्व काही खूप देखणे दिसत आहे, आणि बाळगणेशाची मूर्ती विलोभनीयच! मोदकही सह्ही दिसत आहेत! Happy

सुरेख केलीये सजावट!
बाप्पाच्या चेहर्‍यावर खुप तेज आहे.

सुंदर फुलं,प्रसाद..
सकाळी सकाळी गणपती बाप्पांचं दर्शन घडलं.
धन्स भटक्या !!
शमिकाला स्पेशल शाबासकी Happy