मैत्री .....!!! तो अन ती दोघांमधली...!! भाग--१

Submitted by mahesh_engpune on 5 September, 2010 - 01:24

स्त्री अन पुरुष ... का बरं देवानं अशी माणसाची दोन अधुरी रुपं साकारली असतील..? फार कुतुहुलाचा विषय आहे हा.. नाही..? देवानं बनवितानाच दोघांना अस अपरिपूर्ण बनवलयं.. की दोघंही एकमेंकाना पूरकच..!! म्हणतात जगात perfect असं काहीच नसतं..!!!
पण मला या जगात एक perfect दिसलं..!! काय..?
तो/ती "अर्धनटनारिश्वर"...!!
ज्याच्यात तो अन ती दोघं एकमेंकात परिपूर्ण सामावलेले..!!
कधी त्याचं ते कल्पनेतलं चित्र समोर येतं.. अन देवानं स्त्री अन पुरुष या माणसाच्या दोन जाती का निर्मिल्या याचं विश्वरुपी दर्शन होते..!!!
तो म्हणजे पुरुष... प्रत्येकात पुरुन उरनारा..!! अन ती म्हणजे स्त्री...!! सर्वांच मुळ..!! त्रिलोक सामावलेली...!!
आपली गोष्ट ही अशीच तो अन ती मधल्या खट्क्याची....!! त्याच्यांतल्या निखळ मैत्रीची... !!अन बरंच काही अबोल् सांगणारी..!!!

कोणाला वर्णावं बर आधी ...? "तो" की "ती" ला..? असो उगीच वादाल तोंड नाही फोडत..!! वर वर्णिल्या परि दोघंही एकमेंकाना पुरक..!! दोघांच स्व:ताच असं एक वेगळं अस्तित्व..!! सुरुवात दोघांच्या भूतकाळा पासून करतो...!!

आधी तो च्या बद्द्ल...

तो.....!!
म्हणावा असा काही हीरो वगैरे नाही..!! दिसायला 'अतिसामान्य'...!! बापाच्या विचाराचा फार मोठ प्रभाव त्याच्यावर...!! कारण बापाकडे कधी काय मागितलयं अन ते मिळालं नाही असं कधीच झालं नाही..!! हं.. तर दिसायला अतिसामान्य्..रु़क्ष्..धिप्पाड्...उंचीला जेमतेम ६ फूट्..!! डोळे फार गहिर्‍या विचारात गुंतलेले..!! पण ... चेहर्‍यावरच्या काळ्या सावळ्या रंगाने कोणी तिथपर्यंत पोहचायचं नाही..!! पोहचायचा प्रयत्नही करायचं नाही..!! पहिल्यांदा कोणी पाहून लक्षात रहावा असाही नाही..!! ह्या "तो" ची life फारच विचित्र..!! फार हळवा पन जिद्दी... हट्टी म्हणा हवं तर..!! 'तो' डोक्याने विचार करायचा..!! अन मनानं काम...!! आजही करतो..!
त्याच्या त्या रांगड्या देहयष्टी मुळे कदाचीत 'तो' सर्व "तीं"पासुन दुरच रहायचा..!! हा... पण 'तो' च मित्र मंडळ खरंच अलीबाबाच्या खजिन्याच्या पोट्ली सारखं..!! काय्.. काय रत्न होती.. त्या मित्रांमधे..!! जगात किती निराळी माणसं असतात ते पहायचं असेल तर ही पोतडी नक्कीच चाळली पाहिजे..!! तो फार महत्वकांक्षी..!! (अनेकांना तो egoistic आहे असचं वाटायचं..!!) बारावीलाच आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचयं..!! ही महत्वकांक्षा त्याच्या कोणी शाळेतील बाईंमुळे त्याच्या मनात रुजली होती..!! झालं मग...!!आमचा हट्ट म्हणजे हट्ट..!! आई वडीलांच्या डॉक्टर होण्याच्या इच्छेला छेद देत त्याने पुण्यातल्या एका (सुमार..) engineering college ला mechanical engineering साठी admission घेतलं..!! खूप स्वप्न रंगवली होती त्यानं...!! आपल्या करीयर ची, त्या CLG विषयी..!! पण त्या clg सारख्या दिसणार्‍या एक मजली निर्मिता अवस्थेतील इमारत पाहुन त्याची निराशा झाली होती..!! त्याला फार जड गेल तिथं रमायला..!! आयुष्यात distinction खाली न येणार्‍याला इथं लोक "first-class" काढायचा कसा तरी..!! म्हणत underestimate करत होती..!! (तो च्या म्हणण्या नुसार..!!) अन तो असले बुरसटलेले विचारांचे मित्र पाहुन उगीच मग आपुल्या हट्टाला दोष द्यायचा..!!
या सगळ्यांचा परिणाम व्हायचा तोच झाला...!!!
काय...?
तो first year down झाला..!! ज्याने आयुष्यात कधीही distinction शिवाय result पाहिला नाही... तो फेल झाला..!! त्याच्या घरच्यांचा यावर विश्वासचं बसत नव्हता..!! पण त्याने निर्विकार पणे हा अपमान स्विकारला होता..!! त्याने वस्तुस्थिती स्विकारली होती..!! "सध्या माझा down period चालु आहे..!! शिखरावर मध्यातून जाण्यात काय मजा..? पायथ्यापासुनच सुरुवात केली पाहिजे..!!" असं म्हणत त्याने स्वताला सावरलं..!एक वर्ष असंच घरी बसून काढ्लं...!!कदाचीत काहीतरी वेगळी योजना त्या ईश्वराने माझ्यासाठी योजिली असेल..!! असचं कहीतरी बरळत तो स्वताचं सांत्वन करायचा..!!
एक वर्षाचा कातळ वनवास आता संपला होता...!! कसाबसा तो second year ला पोहचला..!!
अन सुरु झाला त्याचा शिखरावर पोहोचण्याचा प्रवास..!! त्याला हवे तसे मित्र मिळाले..!!
त्याचा एक GROUP झाला..!! ६० जणांचा...!! gang च म्हणा..!! सगळेच टारगट..!त्याच्यासारखे "MECHANICAL ENGINEERING" करण्याचा ध्यास घेतलेले..!! त्या नियतीने खेळलेल्या खेळीचे गुढ त्याला आता हळुहळु उकलत होते..!!
'तो' ला त्या बुरसटलेल्या विचारसरणीतून या चैतन्याच्या पावसात भिजण्यासाठी नियतीने एक वर्षाचा दुष्काळ दिला होता त्याच्या आयुष्यात..!!
"तो' जरा वेगळाच होता..!! नेहमी थोडासा (!!) वेगळा विचार करायचा..!! त्याला वाईटातही काही चांगलं दिसायच..!! पण तो वाईटाचं कधीच समर्थण नाही करायचा..!! अन तो ते ६० जणांच्या group मधे पहायचा..!!सगळेच साले इरसाल..!! अगाऊ..टारगट..!! अन कोणीतरी दिलेलं hopeless हे विशेषण घेऊन मिरवण्यात पठ्ठे आपली बहादुरी मानणारे..!!पण "तो" या सार्‍यातही काहीतरी चांगलं पाही..!! clg मधले सगळे वाईट धंदे करुन..(पोरींच्यामागे फिरणे.. मारामारी करणे.. टवाळक्या करणे.. वगैरे वगैरे..!!)'तो' चा group फक्त पास व्हायचा..!! पण त्याच्याशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं...!!फारच अवखळ अन DIFFERENT CLG LIFE जगत होते ते सारे..!!
असेच दिवस जात होते..!! त्याला आता कोणी तरी आवडू लागलं होतं.. त्या विचारात तो तासनतास रमायचा..!! तो एका जुनिअरच्या प्रेमात पडला होता..(अस त्याला वाटायचं..)!! ह्म्म clg life अन प्रेम नाही...? by default ते आलचं..!! मग काय तो ची विमानं कवितेच्या आसमंतात अशी काही झेपाऊ लागली की बस्सं..!! त्या जुनिअरची अन तो ची ओळख clg gathering मधे झाली ती, तो अन त्याच्या hopeless group ने केलेल्या धमाली मुळे..!!दोघंही एकमेंकाना आता चांगले ओळखत होते..!!त्याला जुनिअर बद्दल खूप काही वाटायचं..!! पण जुनिअर या सगळ्यांपासून अगदी दुर..!!तो ला मनोमन वाटायचं, she will get the same feeling about me..!! तो वाट पाहत होत एका मोक्यची .. !! अन तो मोका आला..!! ७ एप्रिल २००६ त्याचा birth-day..!! त्याने तिला birth-day treat साठी बोलवलं..!! जुनिअर ही लगेच तयार झाली...!! बाकीचे सगळे मित्र असतील बरोबर म्हणून..!!पण तो ने फक्त जुनिअर ला एकटीला बोलावलं होतं..!!तरी जुनिअर आली..!! त्याने सगळी फिल्डींग व्यवस्थीत लावली होती..!!सगळ्या HOPELESS कार्ट्यांनी तो ला पुरेपुर मदत केली होती..!! पण as usual.. response काय असणार होता...? तेच झालं..!! जुनिअर ने त्याला नाही म्हणत त्याचा पुरता अपेक्षाभंग केला. तो प्रेमभंग त्याला सहन झाला नाही..!! तो सर्वस्वी तुटला होता..!!
"जुनिअर ने नाही म्हटलं..!!"
तसं तो बद्दल तसं काही जुनिअर ला वाटावं असं काही नव्हतं..!! त्याला मात्र सगळं संपल्यासारखं वाटत होतं...!! मित्रांनी समजावूनही तो त्यातून सावरत नव्हता..!! फार हळवा...मनस्वी होता तो..!! त्याला आता कुणाच्या तरी आधाराची गरज होती..!! खरंतर he was in need of some counseling..!!ते त्याच्या clg TRAINING N PLACEMENT OFFICER ने व्यवस्थीत केलं...!! तो आता हळुहळु त्या सगळ्या प्रकारातुन सावरत होता..!! त्याने असा काही ध्यास घेतला होता की असं काही तरी करुन दखवेन की जुनिअर ला ही वाटावं,मी किती चुकीचं वागले...!! तो आता T.E. त आला..!! शेवटच्या सेम मधे campus placement च्ने वारे clg मधे वाहू लागले..!! तो वाट पाहात होता no criteria company साठी..!! अन clg ला पहिली company आली ती no criteria company ..!!
बस्सं त्याने ठरवलं...!! काहीही करुन college campus मधेच नोकरी मिळवायची..!! त्याने खुप hard-work केलं..!! दिवस रात्र तो फक्त त्या एकाच ध्यासाने पछाडला होता..!!
तो त्या company त select झाला..!! 1.92 p.a. च (घसघशीत) package ही मिळालं त्याला..!! (तेही ऐन recession च्या तोंडावर..!!) तो खुश होता..!! जुनिअर ला कुणामार्फत तरी त्याने ही गोष्ट कळवली..!! अन काही व्यक्त व्हायचं म्हणून तो "JAB WE MET" मधलं "तुम से ही.. तुम से ही.." हे गाणं दिवसातून १००वेळा ऐकत, जुनिअरचे आभार मानायचा..!! तो आता गमावत्न्यातला आनंद लूट्त होता..!! इवल्याश्या नाजुक ह्रदयात कुठ्ल्या तरी कोपर्‍यात ते दुख साठ्वून..!! कुणी तरी नाही म्हट्ल्याच...!!
"आयुष्यात काही गोष्टी पुन्हा पुन्हा घडत असतात ..!! जो पर्यत त्या तुम्हाला हव्या तश्या घडत नाहीत तो पर्यंत..!!" असाच काहीसा विचार तो च्या मनात डोकवून गेला..!!
अन पुन्हा तो चा शिखराकडे जाण्याचा प्रवास सुरु झला..!!

ह्म्म काय विचार करताय..?
"तो" अन "ती" मध्ये फक्त तो च दिसतोय..!!
पण अजून गोष्ट सुरुच झाली नाही.. त्या अगोदर "ती" ला नको का introduce करायला..!!

क्रमशः

    गुलमोहर: 

    ह्म्म..!! घ्या आता कथा पाच भागात येतेय..!!
    उगीच अधला मधला भाग वाचु नका..!! sequence ने जा..!! त्यातच मजा आहे..!!
    पुढचा भाग पाच मिनिटात टाकतोय..!!
    नंद्या ....!! धन्यवाद..!! शेवटी एकदाचं जमलं बुवा.!!

    महेश घुले..!!

    तसच समजा हव तर..!!
    पुर्णविराम दिल्याने जो effect येतो त्यापेक्षा थोडा अधिक यावा म्हणुन केलेला एक वेगळा प्रयत्न..!!
    आपली एक वेगळी style..!!

    अर्धनटनारिश्वर नाही...अर्धनारीनटेश्वर आहे ते. व्याख्या बरोबर आहे पण शब्द चुकलाय. टायपो झालाय का?