कानोकानी.कॉम : मायबोलीचे नवीन संकेतस्थळ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

दिपावलीच्या शुभमुहूर्तावर मायबोलीवर नवीन सुविधा / नवीन संकेतस्थळ सुरू करीत आहोत.
कानोकानी.कॉम (http://www.kanokani.com किंवा http://kanokani.maayboli.com)

गेल्या काही वर्षात आंतरजालावर भरपूर मराठी वाचायला मिळतंय आणि दिवसेंदिवस ते वाढतच जाणार आहे. एक म्हणजे हे सगळीकडे विखुरले आहे त्यामुळे सगळं वाचायला वेळ नसतो. आणि वेळ काढला तरी त्यातलं चांगलं काय बेताचं काय हे शोधत बसावं लागतं. त्याच बरोबर लिहिणार्‍यांना आपण लिहिलेलं लोकांपर्यंत कसं पोहोचावं असाही प्रश्न असतो. सारखं सारखं माझा ब्लॉग वाचून पाहिला का असं किती वेळा सांगणार. आपण वाचलेलं इतराना सांगाव, त्यावर चर्चा व्हावी याची पण गरज असते.

कानोकानीच्या माध्यमातून तुम्ही वाचलेल्या लेखनाचा दुवा तुम्हाला इतरांना सांगता येईल. हा दुवा फक्त मायबोलीवरचाच असला पाहिजे असा नाही. मराठी माणसाला वाचायला आवडेल असा कुठलाही दुवा चालू शकेल. शक्य तो मराठीत असावा असा आमचा आग्रह आहे. पण सक्ती नाही. या प्रकल्पाचा उद्देश फक्त दुवा आणि थोडा मजकूर सांगावा इतकाच आहे. प्रत्यक्ष मजकूर मूळ वेबसाईटवरच असेल.

दुव्यातला मजकूर आवडला तर त्यावर तुम्ही मत देऊ शकाल. त्या मतावर आधारीत तो दुवा वेगवेगळ्या विभागात सरकू शकेल. सगळ्यात जास्त बहुचर्चित दुवे पहिल्या पानावर दिसतील. इतर नवीन दुवे आणि उभरत्या गोष्टींची वाटचाल "कानोसा" विभागात दिसेल. काही काळानंतर जुने दुवे आपोआप "बखर" विभागात जातील. ज्या वाचकांकडे वेळ कमी आहे ते फक्त मोजक्याच बहुचर्चित गोष्टी वाचू शकतील.

ज्याना Digg, Reddit, Technorati यासारख्या संकेतस्थळांची माहिती आहे त्याना ही संकल्पना ओळखीची वाटेल.

इथे नवीन दुवा /मत द्यायला प्रवेशाची नोंद आवश्यक असली तरी मायबोलीवरचेच खाते(Maayboli ID)/परवलीचा शब्द चालेल. नवीन घ्यायची गरज नाही. तुम्ही मायबोलीवर प्रवेशाची नोंद केली असेल तर परत इथे करायची गरज नाही.

सध्या मायबोलीवर अशी माहिती सांगणारे विभाग उदा. मला आवडलेली वेबसाईट, मला आवडलेले व्हिडीओ यासारखे विभाग हळूहळू कानोकानीवर नेले जातील. किंबहुना अशी माहिती सांगणे सोपे व्हावे म्हणूनच कानोकानीचा जन्म झाला आहे.

काही दिवसांत मायबोलीच्या प्रत्येक पानावर ते कानोकानीत टाकायला सोपे होईल अशी सोय करण्यात येईल. मायबोलीकर त्यांच्या वैयक्तिक ब्लॉग्जवरही अशी सोय करू शकतील. इतर मराठी संकेतस्थळांना याचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांचेही स्वागत आहे.

मराठीतलं लोकप्रिय ते तुम्हाला हवं
कानोकानीनं तुमच्यापर्यंत ते पोहोचवावं

कानोकानी
.....या कानाचे त्या कानाला

विषय: 
प्रकार: 

छान उपक्रम! अभिनंदन आणि धन्यवाद!

चांगला उपक्रम आहे. यामुळे आपोआप चांगल्या वाचनीय साइट्स एकत्र वाचायला/बघायला मिळतील.

उपक्रम चांगला आहे पण नक्की कसा कसा वर्क होणार हे मला कळत नाहीये. बघत राहिन रोज मग कळू लागेल बहुतेक.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

nice Happy

so now i dont have to create offbeat threads Happy

few days back http://hellomarathi.com/ started similar concept, but it was hard to digest for people or follow up everyday and now the site is closed. Hope that doesnt happen with kaangoshti.

would have been nice if you could have just taken the open source reddit.com code (http://code.reddit.com/), as its matured product, plus clean and easy to understand for users (like old rediff or old maayboli), but never mind. something is better than nothing. Happy

I am slashdot.org converted to digg.com converted to reddit.com

धन्यवाद या नविन सोयीबद्दल. स्तुत्य उपक्रम.

चांगला उपक्रम. सुरवातीला थोडे गोंधळल्यासारखे झाले आहे. होईल सवय हळूहळू. धन्यवाद.

अरे वा!!

मस्त उपक्रम आहे हा. फारच छान!!

@maanus
चित्रे द्यायची सुविधा सध्या नाही. काम सुरू आहे. एक किडा(Bug) आहे तो काढायचा प्रयत्न चालू आहे.

कानोकानीची लिंक मायबोलीवर डावीकडे, उजवीकडे किंवा पानात वर देता येईल का? मला तरी ती लिंक दुसरीकडे कुठे सापडली नाही.

kanokani.maayboli.com हा तर जुनाच उपक्रम आहे ना? खालील धाग्यावर प्रतिसाद म्हणून त्याचा उल्लेख पण आहे...आणि तारीख २००८ सालची आहे

https://www.maayboli.com/node/4847