हा कुठला बरे आजार/विकार?

Submitted by अभय आर्वीकर on 19 August, 2010 - 13:45

हा कुठला बरे आजार/विकार?

वाचनाच्या बाबतीत ग्यानबा फ़ार अभागी मनुष्य आहे. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फ़ारसे लाभले नाही. कधी आर्थीक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलीक स्थितीमुळे पुस्तके अनुपलब्ध असल्यामुळे असे घडले असावे.
पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही.
खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं. कथा,कादंबरी,कविता,गज़ल,लावणी पासून ते हिंदी उपन्यास वगैरे वगैरे.... कशाचे काहीही बंधन नाही.
पण....
कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते हे वास्तव नाहीच. या देशातल्या ७० टक्के जनतेचे हे चित्रण नसून या लेखाचा जनसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबध नाहीये. मग यात वेळ खर्ची घालून अनावश्यक काडीकचरा डोक्यात कोंबण्यात काय हशिल आहे? तो असा विचार करतो आणि पुस्तक फ़ेकून देतो.

कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते ज्या लेखकाने हे लिहिलेय तो लेखक, त्या लेखकाचे व्यक्तिमत्व आणि आचरण त्या लेखात मांडलेल्या विचांराशी, भुमिकेशी प्रामाणिक किंवा सुसंगत नाही. मग जो विचार,भूमिका स्वत: लेखकाला जगता येत नाही त्या विचाराला, "विचार" तरी कसे म्हणावे? थोडा वेळ उत्तर शोधतो आणि उबग आल्यागत पुस्तक फ़ेकून देतो.

तसे त्याला बालकवींची श्रावणमासी ही कविता आवडते कारण त्यात जे श्रावण महिण्याचे वर्णन आले ना, ती केवळ कवीकल्पना नसून त्या कवितेतला अद्भुत आनंद त्याला श्रावण महिना सूरू झाला की प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो.
"सरसर येते क्षणांत शिरवे, क्षणांत फ़िरूनी ऊन पडे" हे दृष्य केवळ त्याच महिण्यात पहायला मिळते. इतर महिण्यात नाहीच.
कवी, कविता आणि श्रावणमास एवढे एकरूप झालेत की त्यांना वेगवेगळे नाहीच करता येणार.
अजूनही श्रावणमहिना त्याच कवितेचे अनुसरण करतो, तसाच वागतो जसे कवितेत लिहिले आहे.

पण ना.धो.महानोरांची "या नभाने भुईला दान द्यावे" ही कविता तर सर्वांची आवडती कविता. उत्‍तुंग लोकप्रियता लाभलेली पण ग्यानबाला नाहीच आवडत.
तो समर्थनार्थ जे पुरावे सादर करतो तेही जगावेगळे.
त्याच्या मते नभाने भुईला नेहमीच दान दिलेले आहे. मग अतिरिक्त दानाची मागणी करणे याचा अर्थ मातीतून अधिक भरघोस उत्पन्न निघावे अशी अपेक्षा असणार. समजा नभाने आराधना स्विकारली आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे,सुर्य आणि चंद्र जरी लागलेत तरी कोणतेही सरकार चांदणे,सुर्य आणि चंद्राकडे "शेतमाल" याच दृष्टीकोनातून बघणार आणि या सुर्य,चंद्र तार्‍यांना "भजी किंवा आलुबोंडा" यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची पुरेपुर व्यवस्था करणार.
कदाचित शासन रेशनकार्डावर अनुदानीत किंमतीत सुर्य,चंद्र तारे उपल्ब्ध करून देईल. त्यामुळे गल्लोगल्लीत, नालीच्या काठावर, कचरापेटीत सुर्य,चंद्र,तार्‍यांचे ढिगारे साचलेले दिसतील.
पण......
ज्या शेतकर्‍यांसाठी दान मागीतले त्याच्या पदरात काय पडणार? शेतात सुर्य,चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असेल तर.... त्याची दरिद्री आहे तशीच राहणार. त्या ऐवजी कविने "या नभाने सरकारला अक्कलदान द्यावे, जेणेकरून शेतकर्‍यांच्या दारापर्यंत विकाससुर्य पोहचेल" अशी मागणी करणे जास्त संयुक्तिक नाही का? कवी बिगर शेतकरी असता तर ग्यानबाची अजिबात हरकत नव्हती. पण कवी दस्तुरखुद्द शेतकरी असल्याने ही बाब जास्तच गंभिर आहे, असे त्याला वाटते. आणि असे त्याला वाटले की तो डाव्याहातचे पुस्तक तो उजव्या हाताने फ़ेकून देतो.
"काळ्या(काया) मातीत मातीत" ही किती सुंदर कविता. महाराष्ट्रभर गाजलेली. सिनेमावाल्यांना देखिल भुरळ पाडून त्यांना त्यांच्या सिनेमात समावेश करण्यास भाग पाडणारी.
पण ग्यानबाला भुरळ पडेल तर तो ग्यानबा कसला? त्याच्या मते विठ्ठल वाघासारखे शेतकर्‍याचे घरात जन्मलेले शेतकरीपुत्र कवी, शेतकर्‍यांच्या वेदना विकून मोठ्ठे कवी/साहित्यिक वगैरे झालेत, धन मिळवले, मान मिळवला पण.... शेतकर्‍याच्या पायातून सांडणारे लाल रगत (रक्त) थोडेफ़ार थांबावे आणि त्याला (कविला देखिल) पडलेले हिरवे सपान (स्वप्न) प्रत्यक्षात खरे व्हावे यासाठी पुढे मग काहीच प्रयत्न केले नाहीत. ज्या सरकारच्या "शेतकरी विरोधी धोरणांमुळे" ही परिस्थीती उदभवते, त्या सरकारशी दोन हात करून शेतकर्‍यांचे प्रश्न खंबिरपणे मांडण्याऐवजी सरकारकडून जेवढा काही लाभ उपटता येईल तेवढा उपटण्यातच धन्यता मानली. त्याला हा चक्क बेगडीपणा वाटतो. आणि असे त्याला वाटले की तो हातातले पुस्तक कपाळावर मारून घेतो आणि दुर भिरकावून देतो.
"बारोमास"कार सदानंद देशमुख असो की आणखी कोणी. त्याचं सदैव एकच तुणतुणं.
नको तसा विचार करणे आणि त्याचा राग पुस्तकावर काढणे.
कुठला आजार/विकार म्हणावे याला?

गंगाधर मुटे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनील अंबानी कर भरतो.
आनंद कर्वे संशोधनातून बदल घडवितात
रतन टाटाजी भारताच्या प्रगतीतूनच एक असामान्य उद्योग घडवितात
बिर्ला लोक उद्योगाबरोबरच समाजसेवेलाही महत्त्व देतात.
यातील एक हजारांश कार्य करायचे झाले तरी कीबोर्ड सोडून कामाला भिडावे लागेल. स्वत:चे गैरसमज
गोंजारत बसता येणार नाही. मूविट बडी.

शेतकर्‍यांच्या दुर्दशेसाठी केवळ आणि केवळ प्रचलित व्यवस्थाच कारणीभूत आहे.
आणि तिच्यावर घाव घालणे माझा धर्म आहे.

राजकारणी तर शंभर टक्के जबाबदार आहेतच पण
साहित्यीकांना ग्यानबाच्या समस्यांची जाण नसने, हे चित्रही फारसे शोभादायक नाही.

मुटेजी,
तुमच्या वरील वाक्यांना आमचा पुर्ण पाठींबा आहे .....
तुमची तळमळ सगळ्यांना कळो !
Happy

चिनुक्स,मुटेजी
विद्या मुरकुंबी ही त्या बलाढ्य अशा "रेणुका शुगर लिमीटेड" ची मालकीणच ना ?

गंगाधरजी, रविवारी शेगावहुन सात किलोमिटर लांब गोमाजीबाबांच्या समाधी दर्शानाला जाण्याचा योग आला. सर्वदुर लांबच लांब काळ्या आईच्या कुशीत कुठे ज्वारी, कुठे कापुस दिसत होता.

इतकी चांगली जमिन, लांबच लांब शेती असताना विदर्भातला शेतकरी असा दिनवाणा का ? पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यात किंवा कोकणात सुध्दा येव्हडी चांगली जमिन नाही.

<<अनील अंबानी कर भरतो.
आनंद कर्वे संशोधनातून बदल घडवितात
रतन टाटाजी भारताच्या प्रगतीतूनच एक असामान्य उद्योग घडवितात
बिर्ला लोक उद्योगाबरोबरच समाजसेवेलाही महत्त्व देतात.
यातील एक हजारांश कार्य करायचे झाले तरी कीबोर्ड सोडून कामाला भिडावे लागेल. स्वत:चे गैरसमज
गोंजारत बसता येणार नाही. मूविट बडी.>
>

अश्विनीमामी, तुम्ही मला उद्देशून लीहिले ना?
मग आत्मस्तुती दोष स्विकारून मला खालील वाक्ये लिहिणे आवश्यक झाले आहे.

मी सुद्धा कर भरतो.
मी सुद्धा संशोधनातून बदल घडविला आहे.
मी सुद्धा भारताच्या/भारतिय शेतकर्‍यांच्या प्रगतीतूनच एक असामान्य उद्योग उभा केला आहे.
गेल्या २० वर्षात मी माझ्या कुटूंबाचे ५०० पटीने उत्पन्न वाढविले आहे.
मी सुद्धा उद्योगाबरोबरच समाजसेवेलाही महत्त्व दिले आहे, देत आहे.
मी सर्व कामे हातावेगळी करूनच कीबोर्ड बडवत असतो.
मी माझ्या विपुत माझा पुर्ण पत्ता दिला आहे. त्यामुळे मी जे लिहिले त्याला "खोटे" ठरविण्याइतपत कोणी मुर्खपणाचे प्रदर्शन करणार नाही, अशी अपेक्षा बाळगतो.
माझे स्वत:चे काहीही गैरसमज नाहीत. समजून घेण्याची ज्यांच्याजवळ इच्छाशक्ती नाही, त्यांना ते गैरसमज वाटतात.
...................
नितिनजी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नंतर. Happy

समजून घेण्याची ज्यांच्याजवळ इच्छाशक्ती नाही, त्यांना ते गैरसमज वाटतात.<<
दुसर्‍याला नावं ठेवणं फार सोपं असतं. आजवर तुमच्या म्हणण्याला होहो आणि वा वा नाही केलं म्हणून लोकांकडे समजण्याची इच्छाशक्ती नाही, तुम्हाला इथून पळवून लावण्यासाठी तमाशे चालू आहेत हा कंठशोष??

असामान्य उद्योग....
तो घडवण्यार्‍याला इतका रिकामा वेळ असतो यावर माझातरी विश्वास बसणे अशक्य आहे.

<<तो घडवण्यार्‍याला इतका रिकामा वेळ असतो यावर माझातरी विश्वास बसणे अशक्य आहे.>>

त्याला माझा नाईलाज आहे.

इतकी चांगली जमिन, लांबच लांब शेती असताना विदर्भातला शेतकरी असा दिनवाणा का ? पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यात किंवा कोकणात सुध्दा येव्हडी चांगली जमिन नाही.
---नितीनजी त्या जमिनीत पाणी हवे ना? पाण्याच्या बाबतीत तुलनेने विदर्भ कुठे आहे? पावसाळ्यात पडलेले पाणी, त्यांची साठवणुक, धरणे, महत्वाचे म्हणजे जमिनी खाली पाणी याबाबत तुलनेने विदर्भ कोरडा आहे. माझ्या तुटपुंज्या ज्ञाना प्रमाणे विदर्भात बहुतेक कोरडवाहू शेती आहे. सर्व आशा ह्या वरुण राजाच्या मेहेरबानी वर असतांत. त्याने सुट्टी घेतली तर सगळेच गणित चुकते. मुटे साहेब दुरुस्त करतील.
२०,००० कोटीचे पॅकेज (वर वरची मलमपट्टी) दिले गेले... त्यातील किती पैसे दुरगामी योजनेसाठी वापरात आले? काही दुरगामी योजना आहेत तरी कां?

जसा तुमचा नाईलाज आहे ना तसाच आमचाही नाईलाज आहे कारण आम्ही इतर गोष्टी पण वाचतो, समजून घेतो, केलेलं काम वाचतो इत्यादी आणि त्यामुळे तुमचा एकट्याचाच सूर अतीव नकारात्मक आणि एकांगी जाणवतो आम्हाला.
त्यावर समजून घेण्याची इच्छाशक्ती नाही असले आरोप तुम्ही करू नयेत.
जरी तुमच्या मते अनिल अंबानी, टाटा, बिर्ला, आनंद कर्वे या सगळ्यांपेक्षा तुम्ही ग्रेट असलात तरी तसे आम्हाला वाटत नाही आहात.

निधपा, तुम्ही काय करता, काय करित नाही, हा माझा विषय नाही.

मी केवळ शेतीच्या दुर्दशेबद्दल तेवढे लिहितो आहे. तुम्ही पटवून घ्यायचे की नाही, हेही तुमच्याच अखत्यारीत आहे.
शेतीचे दुखणे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे पण आग्रह नाही.

शिवाय शेतकर्‍यांची एक दुर्लक्षित बाजू जगासमोर यावी म्हणुन मी लिहितो आहे.

.......................................
<< जरी तुमच्या मते अनिल अंबानी, टाटा, बिर्ला, आनंद कर्वे या सगळ्यांपेक्षा तुम्ही ग्रेट असलात तरी तसे आम्हाला वाटत नाही आहात.>>

अनिल अंबानींना नांगर हाकलता येत नाही, मला येतो.
टाटांना तिफण हाणता येत नाही, मला येते.
बिर्लांना ताशी १० किलो या वेगाने कापूस वेचता येत नाही, मला येतो.
आनंद कर्वेंना विहिरीत दोराच्या सहाय्याने ६० फूट खाली उतरून सुरूंग फोडता येत नाही, मला येतो.

मग या विषयामध्ये मी त्यांच्यापेक्षा ग्रेटच की. Happy

आग्रह नसल्यास चुकीचे आरोप करू नयेत. कारण समजून घेणे याचा अर्थ तुम्ही म्हणता तेच मान्य करणे असा तुम्हाला वाटत असल्यास तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आमचा नाही.

तुम्हाला येत नसलेल्या अनेक गोष्टी अनेकांना अतिशय उत्तम पद्धतीने करता येतात. फक्त ते शेतकरी नसतात त्यामुळे त्यांचा ग्रेटनेस इनव्हॅलिड आहे बहुतेक तुमच्यामते.

तुम्हाला येत नसलेल्या अनेक गोष्टी अनेकांना अतिशय उत्तम पद्धतीने करता येतात.

निसंशय त्या विषयात ते माझ्यापेक्षा ग्रेट आहेत. Happy

Pages