अश्वमेध

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 July, 2009 - 05:54

कॉलेज सुटलं तसं चित्रकलाही सुटली. परवा नाशिकक्षेत्री श्री. अज्ञातजींचे चित्रकार मित्र श्री. धनंजय गोवर्धने यांची ओळख झाली. त्यांच्या आशिर्वादाने आणि प्रोत्साहनाने पुन्हा एकदा स्केचिंगला सुरुवात केली आहे. हा अश्वमेध कितपत पेलवतो ते पाहायचं.....
आंतरजालावरच मिळालेल्या एका चित्राची मी केलेली भ्रष्ट नक्कल ....

From vishal

माध्यम : 2B & 6B पेन्सील्स

गुलमोहर: 

वरती सर्वाच्या प्रतिसादाच ठीक आहे.
तस मलाही स्केच आवडल
पण जरा चित्र स्वत:पासून लांब भिंतिला उभा कर आणि निरखून बघ
घोड्याची छाती आणि पाय यांच्या मधला जो भाग आहे तीथ काही तरी गफलत
झाली आहे, sorry पण जरा बघ मला जे वाटल ते मी सांगितल,तस जाणवलच तर जरूर कळव
शेवटी प्रत्येकाची नजर वेगळी असते.
एकंदरीत स्केच छान आहे.असाच चित्र काढत रहा.......शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!

विशल्या, तुझ्यतल्या या कलेची माहीती नव्हती मला.
छान आहे हो घोडा तुझा. चौखूर उधळलाय असं वाटतंय. घोडदौड अशीच चालू राहूदे.

मामी, मला शक्य असतं तर मे या घोड्यालासुद्धा कपडे घातले असते Wink

काळे साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, हि चर्चा यापुर्वी इथे तसेच मिपावरही झाली आहे. धन्यवाद सगळ्यांचे !

Pages