कुसुमाग्रजांच्या 'कणा' चे इंग्रजी रुपांतर

Submitted by मंदार शिंदे on 26 August, 2010 - 17:25

कुसुमाग्रजांची 'कणा' ही अत्यंत साधी-सोपी परंतु आशयपूर्ण कविता आहे. या कवितेतील संदेश अ-मराठी वाचकांपर्यंतही पोहोचावा, या हेतुने तिचं इंग्रजी रुपांतर केलं आहे. इथं मूळ मराठी कविता व त्याखाली तिचं इंग्रजी रुपांतर दिलं आहे -

कणा - मूळ कविता

'ओळखलंत का सर मला' - पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून;

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली -

भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले -

कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे' -

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
'पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला -

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.'

Go Fight - English Version

“Sir, this is me,” called in the stranger
Rains had ruined his clothes and hair.

Sat for a moment, then said with a smile,
“River Goddess visited us, stayed for a while.

Looking joyful, she danced in and out
But for my wife, everything was wiped out.

Walls sank and the kitchen is in ruins
Tears in my eyes, is her gift that now shines.

With wife on my side, I'm planning to fight back, Sir
Building back the walls, removing mud and mire.”

Looking at my hand in pocket, rose to his feet
“Don't need money, Sir, was feeling lonely a bit -

Hearth is broken, but backbone's still upright
You just pat my back and say, GO FIGHT!”

गुलमोहर: 

Happy

छानच जमले आहे भाषांतर. Happy
मूळ अर्थाचे शब्दशः भाषांतर करताना भावार्थ थोडा फार इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. पण तसे इथे काहीही झाले नाहीये. Happy

मूळ मराठी कविता माहीत नव्हती, पण ती नीट कळाल्यावर मग इंग्रजी वाचली. आणि एकदम चांगली जमली आहे! फक्त काही पॉईंट्सः
१. मूळ कवितेत कारभारीण शब्द जेवढा चपखल वाटतो तेवढा वाईफ वाटत नाही. तसेच looking joyful सुद्धा.
२. पाठीच्या कण्याचा संदर्भ मराठीत जसा आहे तसा इंग्रजीत आहे का नाही माहीत नाही. त्यामुळे अमराठी भाषिकांना तो संदर्भ पटक्न लागेल का नाही ते कळत नाही.
३. stranger called in चा अर्थ फोन केला असाही घेतला जाण्याची शक्यता आहे.

वा! स्तुत्य! अवघड असून उत्तम! शेवटची द्विपदी मूळ कवितेइतकीच हेलावून टाकणारी!

आधीच भाषांतर अवघड आणि त्यात मराठीतून इंग्रजी हे अधिकच अवघड! अत्यंत छान पेललेत!

एक विचार मनात आला - नदीला पूर आला होता हे ' रिव्हर गॉडेस व्हिझिटेड अस ' या भाषांतरात (भाषांतर अचूक असूनही) नेमके व्यक्त होत आहे का? माहेरवाशीण ही संकल्पना त्या संस्कृतीत 'जवळपास नसणे' / अजिबात नसणे यापैकी जे आहे ते गृहीत धरल्यास 'पूर आला होता व पाणी घरात शिरले' असेच लिहावे लागेल का? (अर्थात, पुढील ओळींमधे ते व्यक्त झालेले आहे, पण भाषांतरापुरते म्हणत आहे.)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

चांगला अनुवाद आहे. थोडे बदल सुचवावेसे वाटतात, त्याबद्दल क्षमस्व.

“Remember me, Sir?,” in came the stranger
Rain had tainted his clothes and hair.

Sat for a moment, then said with a smile,
Homecoming queen, River, frolicked around, a while.

Walls gave away and what they contained
Tears in my eyes, is her gift that is not stained.

My hand moved towards my wallet, he rose to his feet
“Don't need the money, Sir, was feeling lonely a bit -

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !

>>मूळ अर्थाचे शब्दशः भाषांतर करताना भावार्थ थोडा फार इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. पण तसे इथे काहीही झाले नाहीये.
निंबुडा, भावार्थ इकडे तिकडे होऊ नये म्हणूनच शब्द थोडे इकडे तिकडे केले आहेत.

>>अमराठी, परदेशी कविताप्रेमी वाचतील अशा ठिकाणी प्रसिद्ध करायला हवी.
तेजस, इंग्रजी रुपांतरामागचा हेतू अगदी हाच आहे. अशा अजून कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध व्हावी असे वाटत असल्यास जरुर सुचविणे.

>>'wife BY my side' हे जास्त योग्य रूप आहे.
स्वाती, कबूल! धन्यवाद!

फारएण्ड, बेफिकीर,

मराठीतून इंग्रजीमध्ये रुपांतर करताना अनेक शब्द व संकल्पनांना पर्यायच सापडत नाहीत. जशास तसे भाषांतर केले तरी, वाचणार्‍या अ-मराठी वाचकांवर ते विशिष्ट शब्दसंस्कार झाले नसल्याने हवा तो अर्थ पोचविता येत नाही.
हाच मुद्दा इंग्रजीचे मराठी करताना देखील जाणवतो. त्यामुळे 'गंगामाई' ला 'Mother Ganga' वगैरे न म्हणता, 'River Goddess' म्हणून भावार्थ पोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

बाकी, बेफिकीर म्हणतात तसे, भाषांतरामध्ये 'माहेरवाशीण' वगैरे प्रकार टाळणेच सोईस्कर.

खुप मस्त जमलंय भाषांतर, मंदार... कवितेचं भाषांतर म्हणजे कसोटीच... एकतर भावार्थ जपायचा आणि वर लयीतपण बसवायची...सगळंच छान जमलंय तुम्हाला. Happy निंबुडाला अनुमोदन!!!!

नंद्यांनी सुचवलेले बदल पण छान...

फक्त,
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली - चे भाषांतर( अनुवाद खरं म्हणजे) But for my wife, everything was wiped out. असा का केलात? म्हणजे अर्थच बदलतोय ना इथे...

धन्यवाद, सानी !

'Everything but for wife...' चा अर्थ 'बायकोवाचून इतर सर्व...' असा आहे.

ओह! अच्छा! हे इंग्रजी expression मला माहितच नव्हते, मंदार....धन्यवाद Happy
तरीच मला वाटत होते, मी वाचून (आपलं सोडून Proud ) यावर कोणीच कसं लिहित नाहीये....