नारळी भात

Submitted by निंबुडा on 24 August, 2010 - 06:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) तांदूळ - अडीज वाट्या
२) चिरलेला किंवा किसलेला गूळ - अर्धा किलो
३) खोवलेला नारळ - अडीज वाट्या (जितका तांदूळ तितकाच नारळ)
४) केशरकाड्या
५) लवंग (८-९)
६) काजू + पिस्ता + बदाम चे तुकडे
७) बेदाणे
८) वेलची पावडर (किंवा एव्हरेस्ट ची दूध मसाला पावडर)
९) तूप (८-९ मोठे चमचे)
१०) पाणी (६ भांडी) (भांडं = फुलपात्र)
(नेहेमीचा भात शिजण्यासाठी जितके पाणी घेता त्यापेक्षा जरा जास्त पाणी घ्यायचे.)

क्रमवार पाककृती: 

१) प्रेशर पॅन किंवा जरा सपाट बुडाचे पातेले घ्यावे. मंद आचेवर ८-९ मोठे चमचे तूपावर ८-९ लवंगा परतून घ्याव्यात.
२) घुतलेला तांदूळ (आधी भिजवून ठेवायची गरज नाही) या तूपावर परतावा.
३) तांदूळ लालसर होऊ लागला की वर दिलेल्या प्रमाणातील नारळाचा चव घालून परतावा.
४) मिश्रण नीट परतले गेले की ६ भांडी पाणी (वर दिलेले प्रमाण) घालून ढवळावे. झाकण घालून भात शिजू द्यावा. अधून मधून ढवळत राहून भाताची कणी शिजली की नाही ते पाहत रहावे.
५) भात शिजत आला की गूळ घालावा (खूप गोड नको असेल तर अर्ध्या किलोतला थोडासा वगळला तरी चालेल.) व ढवळत रहावे.
६) गूळ वितळला की प्रेशर पॅन खाली तवा टाकावा. शेगडीची आच मंदच असू द्यावी.
७) आता मिश्रणात केशरकाड्या + काजू + पिस्ता + बदाम चे तुकडे + बेदाणे + वेलची पावडर (किंवा एव्हरेस्ट ची दूध मसाला पावडर) टाकावे आणि ढवळावे.
८) पुन्हा झाकण घालून भात मंद आचेवर शिजू द्यावा.
९) साधारण १० मिनिटांत भात शिजेल. अधून मधून झाकण काढून ढवळायला हरकत नाही.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांकरीता
अधिक टिपा: 

खाताना मिळतो स्वर्गीय आनंद Happy
आजच केलाय सकाळी नारळी भात. मस्त झालाय. Happy

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>अधिक टिपा:
>>>>>खाताना मिळतो स्वर्गीय आनंद
>>>>>आजच केलाय सकाळी नारळी भात. मस्त झालाय.

मस्त झालाय वगैरे सांगू नकोस. आणला आहेस का ते सांग..

वावा.... आम्ही शनिवारीच केला. आई आली होती मग एकत्रच केला. आज पुन्हा ताजा ताजा मिळाला. धन्सं निंबूडा.

रच्याकने : आम्ही नारळाचे दूध काढून त्यात शिजवतो भात. (कॅलरीज, कोलॅस्टरॉल गेले उडत!) Happy

>>खाताना मिळतो स्वर्गीय आनंद

सहमत . माझा ही फेवरीट आहे !!

आम्ही नारळाचे दूध काढून त्यात शिजवतो भात. (कॅलरीज, कोलॅस्टरॉल गेले उडत!)

>> गूड आयडीया Light 1

मला ही बनवायला शिकायचयं !!
माझा एक मित्र तर पुरण पोळीही बनवतो अगदी परफेक्ट न फुटता ....अन इथे आम्हाला म्यॅगी च्या पुढे काही जमत नाही Sad

मस्त झालाय वगैरे सांगू नकोस. आणला आहेस का ते सांग.. >>>
अरे आणला होता डब्यात. पण सकाळी सकाळी मंगळागौरीच्या पूजेचं जेवण जेवून आलेय भरपेट. मग तिथे आम्ही सगळ्या जणींनी थोडा थोडा चाखून गट्टम करून टाकला सकाळीच Happy मगच ऑफिसात पाय ठेवलाय मी आज Happy

सही!

आम्ही पण रविवारीच नारळीभात खाल्ला. आमची राखीपौर्णिमा सर्वांच्या(मी, भाउ व बहिण आणि सर्वांचे बेटर हाफ) सोयीनुसार रविवारीच साजरी केली. Wink

आम्ही आधी भात तुपावर भाजुन, लवंग, दालचिनी घालुन अर्धवट शिजवुन घेतला आणि नंतर भात, त्यावर नारळाचा चव, साखर असे एकावर एक असे २-३ थर दिले व पुर्ण शिजवला. त्या पद्धतीनेही छान होतो.
खाताना साजुक तुप घालुन घ्यायचे.. मामी म्हणतात तसं डायेट, कोलेस्टेरॉल गेलं उडत! Proud

.

.

मी २ वाट्यी बासमती तांदुळ घेतले आहेत ... आमच्या़कडे पाणी घातलेले चालत नाही ...तेव्हा दुध किती घालु प्लीज सांगाल का...