झुंज भाग-४

Submitted by आशिष पवार on 21 August, 2010 - 07:04

राजुच्या सुखापुढे आता त्त्याच्या वडीलांना कुठले हि सुख मोठे दिसत नव्हते ,पुढे त्यांना जे योग्य वाटले त्यांनी तेच केले.कारन राजुत होणार्‍या बदलाला ते नाकारत शकु नव्हते.पुढे राजुला हि या मोकळया आसमंताचा आस्वाद हवा-हवासा वाटायला लागतो.तो हळु हळु घरा बाहेर पडायला लागतो.
राजुसाठी तसे हे जग नवीनच होते, पण इथली माणसे,आजु-बाजुची परिस्थिती हि त्याचासाठी एक नवी पर्वणी स्वरुपच होते.यात भर अशी पडली कि,राजु नुकताच माध्यमिक वर्गातुन उर्त्तीण होउन उच्च माध्यमिक वर्गात जाणार होता.या गोष्टीची संधी साधुन आणि राजुत दिवसेंदिवस होणारा बदल पाहुन त्याच्या घरच्यांनी त्याला आपल्या घरापासुन दुर असलेल्या शिक्षण संस्थेत उच्च माध्यमिक वर्गाचे शिक्षण घेण्यास पाठविण्याचा अखेर निर्णय घेतला.

राजुच्या घरच्या माणसांने विचार केल्या प्रमाणे राजुला नाशिकच्या एका नामांकित "मराठा शिक्षण संस्थेत" प्रवेश हि मिळाला.राजु नियमित पणे आपल्या नव्या शिक्षण संस्थेत हजेरी लावु लागला,त्याला नव-नवीन मित्र भेटले,त्यांचाशी त्याच्या ओळखी झाल्या.त्या मित्रांमध्ये विकास, योगेश,खंडया,बाल्या यांच्याशी त्याची अधिकच गट्टी जमली.उत्तरोत्तर त्यांची हि मैत्री अधिकच रंगत गेली,त्यांनी आपल्या या मैत्रीच्या एकसंघाला "छावा" हे नाव दिल.त्यांचा हा संघ मराठा शिक्षण संस्थेत अधिकच नावाजला,कारन या संघातील प्रत्येक तरुण आपल्या नावाने नव्हे तर कौशल्याने ओळखला जाउ लागला.या संघाची भरभरुन स्तुती हि मराठा शिक्षण संस्थेत कडुन होउ लागली.कारन या संघातील प्रत्येक तरुणात काही ना काही तरी प्रतिभा हि दडलेली होती.

विकास एक उत्तम हॅण्ड बाअ‍ॅल पट्टु होता तर योगेशला कबड्डीत माहरथच मिळाले होते,या पाठोपाठ खंडया आणि बाल्या हे दोघे बुदधीबळ पटु होते.अशी "छावा" या संघाची एकदरीत बांधणी होती.या सर्वांमध्ये जो कौशल्याने कमी होता तो फक्त "राजु" आणि राजुच होता.पण तरीहि त्याच्या या मित्रांनी त्याला कधी हि कमी लेखल नाही.कारन ते सारे नेहमीच म्हणायचे............"या जगात कमी कोणीच नाही;आज मी जेता आहे तर उद्या तु".

आपल्या मित्रांच्या या प्रेरणादायी गोष्टी नेहमीच राजुच्या मनात घर करुन जात असे.राजु नेहमीच त्यांच्या या प्रतिभेची चमक प्रतिष्ठेच्या स्वरुपात त्यांना मिळतांना पाहत असे,त्यांचा नावलौकिक पाहता आता राजुला हि वाटायला लागले होते कि,आपल्या संघातील प्रत्येक मित्रात काही ना काही तरी प्रतिभा दडली आहे.त्यांच्या समोर जर आज आपण उभे राहिलोत तर आपण अगदी छोटे आहोत.आपण हि यांच्या सारखी काही तरी प्रतिभा आपल्यात जोपासावी,आणि तिचा चौफेर प्रकाश या आसमंतात पसरवावा.राजु ने केलेला एवढाच विचार, राजुत झपाट्याने होणार्‍या बदलाची छाप सोडुन जाणारा होता.

या नव्या जगाने राजुच अंधारमय आयुष्य प्रकाशासारख लखलख करुन सोडल होत.या सर्व गोष्टींनी राजुच्या स्वभावात , वागणुकीत, जणु एक क्रांतीच घडवुन आणली होती.राजुत होणार्‍या या क्रांतीचा जो खरा-खुरा आनंद झाला होता, तो फक्त राजुच्या कुटुंबीयांना.त्यांना होणारा हा आनंद गगनात मावेनासा झाला होता.राजुचे कुटुंब आज खर्‍या अर्थाने मनसोक्त खुष झाले होते आणि ते, हा आनंद साजरा करत असतांना भरभरुन परमेश्वर रुपाने आपल्या घरी आलेल्या मित्राचे आभार मानत होते.ज्याने राजुत एक उत्तम जेता होण्याचे गुण कौशल्य पाहिले होते.

राजु आता पुर्वीसारखा तो लाजाळु मुलगा राहिला नव्हता, त्याने आता समाजात आपली एक नवी ओळख निर्माण केली होती.आपल्या शैक्षणिक क्षेत्राबाहेर हि राजुची काही ठराविक व्यक्तींशी मैत्री होती,त्यांचे नाव अजय आणि रवि होते.अजय हा पेश्याने वाहन चालक होता तर रवि हा चांभार होता.या दोघांचा सहवास हा त्याला सतत पुढे लाभत गेला कारन अजय हा राजुच्या घराजवळ राहत होता तर रवि घरापासुनच ठराविक अंतरावर राहत होता.

एकंदरीत रवि आणि अजय यांच्यात साम्य फक्त एवढेच होते कि,रवि हा आपला चांभारी व्यवसाय करत असला तरी तो त्या पाठोपाठ आपले शिक्षण हि घेत होता,पण अजयला मुळातच शाळेच्या नावापासुनच चिड होती,त्याचा शिक्षणावर कदापि विश्वास राहिला नव्हता.अशा आपल्या या दोन नव्या मित्रांच्या संगतीत राजुचा आयुष्याचा पुढील प्रवास सुरु झाला.

क्रमशः

शुद्धलेखनात चुका असल्यास त्या नजरेस आणुन द्याव्यात.

गुलमोहर: