आदित्य अन रवि

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सकाळी सकाळी सूर्याची नावं कशाला ती? ही काय स्कॉलरशिपच्या परिक्षेची उजळणी करायची जागा आहे का?
नाही, नाही, तसं काही नाही. Stocks to watch सारखं ही दोन नावं पण Artists to watch या लिस्ट मधे घालून ठेवा. चार वर्षांचा चिमुरडा आदित्य फाटक, अन तेरा वर्षांचा रवी दातार.

रवी ने परवा सूर पश्चिमेचे या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने सादर केलेल्या कार्यक्रमात दोन गाणी म्हटली ' सांगा मुकुंद कुणी हा पाहिला' अन 'घेई छंद मकरंद' . पहिल्या गाण्यालाच वंस मोअर घेतला त्याने. त्यानंतर संयोजकांनी विनंती केली की कार्यक्रमाला जबरदस्त उशीर झाला असल्याने अजून वंस मोअर घेणार नाही. प्रेक्षकांनी त्या विनंतीचा आदर केला, फक्त रविच्या दुसर्‍या गाण्यापर्यंतच. :). घेई छंद मकरंद असं काही मस्त म्हटलं त्याने काही विचारू नका! वंस मोअर चा आवाज वाढायला लागला तशी किरण जोगळेकरांनी ' आमचं कोण ऐकतंय आता?' अशा आविर्भावात त्याला परत गाणं म्हणायला सांगितलं.

छोट्या आदित्यने अडिच वर्षाचा असताना ' माझे माहेर पंढरी' या गाण्याला तबल्याची साथ केल्याचा व्हिडिओ दाखवला. (मी यूट्युब वर शोधलं चिकार पण काही सापडलं नाही) तो इतका सहजगत्या समेवर आलाय की ज्याचं नाव ते. मॅड सारखं डोळ्यातून पाणी आलं माझ्या ऐकताना. रवी टोरांटोचा अन आदित्य न्यू जर्सीचा. शेजारचं राज्य अन शेजारचा देश या बादरायण संबंधाने देखील माझी कॉलर ताठ झाली कालः-)

बाकीच्या कार्यक्रमात नेहेमीचे यशस्वी कलाकार होते. कार्यक्रमाला चिकारच उशीर झालेला असल्याने म. फा. ची भाषणं अगदी थोडक्यात आटपली. खरं तर त्यांच्या उपक्रमांबद्दल ऐकायला आवडलं असतं, पण वेळे अभावी सुनिता धुमाळे यांनी अगदी हाय लेव्हल ओव्हरव्यू वर भागवलं. किशोर रानड्यांचं चंद्र उदयनी वेळा, अन गीत एक बहरले, क्षण चित्रपटातल्या गाण्याची फीत, प्रियंका टोपे चं गाणं, देवस्थळी दापंत्याच्या नऊ- दहा मुलींनी सादर केलेली हॉलीवूड ची लावणी उल्लेखनीय.

टोरांटोच्याच बागेश्री वझे चा एक व्हिडीओ दाखवला त्याची संकल्पना अन actual production दोन्ही प्रशंसनीय.
निवेदिका, गायिका पैठण्या नेसून आल्या होत्या हेही विशेष. सरते शेवटी ' पैठणी, कुड्या, तोडे, पाटल्या, नाट्य संगीत , अभंग, लावणी ' या paradigm मधल्या कार्यक्रमात नवीन पिढीचे , नव्या दमाचे कार्यक्रम सादर केल्या बद्दल आयोजकांचे आभार.

विषय: 
प्रकार: 

शोनु,
इथे पहा आदित्य..
http://www.adityaphatak.com/
ह्या पोराने अगदी सम पकडुनच एन्ट्री मारलीय ह्या जगात.
- अनिलभाई

छोट्या आदित्यच्या Video Clips मस्तच आहेत.. पण जुन्या आहेत. एकादी नवी करामत बघायला आवडली असती....

रवी दातारचं गाणं आणि उच्चार ऐकुन मंत्रमुग्ध व्हायला होतं....

त्याच्या Once More ला पर्यायच नव्हता....

विनय

आह .. रवि दातार ... नरेंद्र दातारांचा मुलगा ना? अशक्य गातो. मी ही ऐकलंय त्यांचं 'घेई छंद'. केवळ अप्रतीम.

परागकण