''आजी''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 14 August, 2010 - 03:17

एक होती आजी
चिरत होती भाजी

भाजीतून निघाली आळी
आजी होती आंधळी

आळीने घेतला चावा
आजी म्हणाली धावा

मुले आली धावून
आळी काढली पाहून

आळी फेकली लांब
आजीचे झाले काम

मुले म्हणाली ''जाऊ''?
आजीने दिला खाउ

डॉ. कैलास गायकवाड

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

डॉ.कैलास, ही कविता तुम्ही स्वतः रचली आहे का ?... शक्यता कमी वाटते कारण माझ्या आईने लहानपणी आम्हा भावंडांना ही कविता शिकवल्याचे आठवते.

मला लहानपणी,
एक होत्या आजीबाई
स्वैंपाकाची त्यांना घाई.... अशी कविता शिकवल्याचे आठवते.... मात्र ही कविता माझी स्वरचित आहे...

मुटेजींच्या ''मोरा मोरा नाच रे '' ने प्रेरित होउन मी ही एक बडबड गीत पोस्ट करावे असे वाटले.... अन लिहिले....लहानपणी एक होत्या आजीबाई... हे मनात पक्कं होतं...... त्याच्याशीच साधर्म्य साधणारं हे बालगीत आहे.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

डॉ.कैलास

कैलासजी माफ करा..
पण ही कविता निश्चितच तुमची नाही..
कारण, हीच कविता माबो वर खुप लोकांनी लहानपणी थोड्या फार फरकाने ऐकलेली आहे..
या लिंकला भेट द्या तुम्हाला हीच कविता वाचता येईल..
http://www.maayboli.com/node/6812
ज्यो ने ही कविता गेल्यावर्षी पोष्ट केली आहे..
त्या पानावर याच कवितेच्या शेवटच्या दोन ओळी बदललेली आणखी एक कविता आहे..

ठकुजी,
माझी ही कविता ठाण्याहून प्रकाशित झालेल्या '' बडबडगीते'' या मासिकात १९८८ साली प्रकाशित झाली आहें. राजा मंगळ वेढर्,अरुण शास्त्री यांजबरोबर ही कवितासुद्धा प्रकाशित झाली होती. माझ्याकडे त्याची प्रत उपलब्ध आहे.

आपण दिलेली लिंक पाहिली... त्यात हीच कविता आहे... शिवाय साधर्म्य दर्शविणारी दुसरी सुद्धा कविता तेथे आहे. असो.

डॉ.कैलास

>>>ठकुजी,
माझी ही कविता ठाण्याहून प्रकाशित झालेल्या '' बडबडगीते'' या मासिकात १९८८ साली प्रकाशित झाली आहें. राजा मंगळ वेढर्,अरुण शास्त्री यांजबरोबर ही कवितासुद्धा प्रकाशित झाली होती. माझ्याकडे त्याची प्रत उपलब्ध आहे.

आपण दिलेली लिंक पाहिली... त्यात हीच कविता आहे... शिवाय साधर्म्य दर्शविणारी दुसरी सुद्धा कविता तेथे आहे. असो.

डॉ.कैलास>>>>

कैलासजी,
>>मुटेजींच्या ''मोरा मोरा नाच रे '' ने प्रेरित होउन मी ही एक बडबड गीत पोस्ट करावे असे वाटले.... अन लिहिले...>>
या वाक्याने गैरसमज झाला.
आपण ही कविता १९८८ मधे प्रकाशित केली आहे, हे आधी नमुद केले नाही..
असो.. मी माझे शब्द परत घेते..
मला नक्कीच माफ कराल ही अपेक्षा... Happy

ठकुजी,
मी जरी ही कविता १९८८ साली प्रसिद्धिस दिली होती,तरी त्या काळी कवितेतील किती समजायचं .... किंवा कविता करायची समज होती असे मला वाटत नाही..... शाळेत किंवा आईच्या तोंडून ऐकलेल्या पारंपारिक गाणी/कविता त्यापैकिच हीसुद्धा एक असावी....... ज्या अर्थी माबो वरील इतक्या जणांच्या मुखात ती आहे... व बर्‍याच जणांनी लहानपणी ऐकली आहे त्या अर्थी ही कविता '' परंपरेने आई/आजी च्या मुखात असलेली कविता असावी असे वाटते....... जरी माझ्या नावे प्रसिद्ध झाली आहे तरी आजच्या क्षणी मीच ती रचलीय याबाबत मी साशंक आहे.

त्यामुळे आपण माफ करा वगैरे म्हणू नका ठकुजी..... आपण योग्यच आहात असे वाटतेय.

डॉ.कैलास

ही कविता नि:संशय पारंपारिक आहे. कारण मी स्वतःच एक आजी आहे. माझ्या आई आणि आजीने मला ही कविता लहानपणी शिकवली!!! Happy

कैलासजी,
कधीकधी काय होत की आपण जे कधीकाळी वाचलेले असते ते आपण विसरलेले असतो. त्याच्या आठवणी पुर्णता संपलेल्या असतात.
आणि लिहायला बसलो की आपल्याला त्या सहज सुचत जातात.
निसंशय ती रचना आपलीच असते आणि तरीही मिळती जुळती रचना आधिच अस्तीत्वात असते.
त्यामुळे असा प्रसंग उद्भवू शकतो. नाईलाज आहे.

उदा.
दान धर्म न्याय वगैरे, कशासाठी परत गुन्हा
बळीराजास पाताळी, पुन्हा ते पुरणार शेवटी

धीर धरून संयमाने, लढत रहा खिंड अडवून
मैदान सोडून शत्रू, एकदा पळणार शेवटी

असे दोन शेर आणि मतला (आता आठवत नाही) मी रचला.
असे गृहित धरून की "शेवटी" हा रदिफ मी प्रथम वापरतोय.

नंतर आठवण झाली की "शेवटी" हा रदीफ यापुर्वीच कोणीतरी वापरला आहे.
आणि काही क्षणानंतर हेही आठवले की ती तुमचीच गझल आहे.

आणि "मतला" तुमच्या मतल्याशी मिळता जुळताच होता. मग फाडून टाकली "शेवटी".
पण आठवण झाली नसती तर Happy

डॉ. कैलास, असं काही झालं की खजिल व्हायला होतं हे खरंय...पण तसाच अनुभव असलेल्यांनी त्यांचे अनुभव सांगितले की ती लाजिरवाणी भावना नक्कीच कमी होते.
मुटेजींनी सुरुवातीला लिहिलंय, ते अगदी खरं आहे.
कधीकधी काय होत की आपण जे कधीकाळी वाचलेले असते ते आपण विसरलेले असतो. त्याच्या आठवणी पुर्णता संपलेल्या असतात.
आणि लिहायला बसलो की आपल्याला त्या सहज सुचत जातात.
निसंशय ती रचना आपलीच असते आणि तरीही मिळती जुळती रचना आधिच अस्तीत्वात असते.
त्यामुळे असा प्रसंग उद्भवू शकतो. नाईलाज आहे.
>>>>

मी ही यातून गेलेय. माझा अनुभव वाचून तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. Happy

मी ३-४ वर्षांची असतांना एक गाणं गुणगुणत होते, तेही प्राजक्ताच्या झाडाखाली उभी राहून....
टप टप पडती, अंगावरती, प्राजक्ताची फुले;
कित्ती गोड गाणी गाती ही छोटी मुले
हे ऐकून माझ्या आई बाबांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी असा निष्कर्ष काढला, की त्यांच्या लेकीला प्राजक्ताच्या झाडाखाली उभे राहिल्यामुळे ह्या सुंदर कवितेच्या ओळी सुचल्या आहेत...
त्यांनी ही गोष्ट बर्‍याच लोकांना सांगितली सुद्धा!!!!

पण.......एक दिवस चक्क रेडिओवर गाणे लागले;
टप टप पडती, अंगावरती, प्राजक्ताची फुले..... (पुढच्या ओळी काहीतरी वेगळ्या आहेत. पण वर लिहिलेल्या ओळी मात्र मी जुळवल्या असाव्या, किंवा गाणे तसेच कोणाकडून तरी ऐकले असावे.) आणि माझ्या आई बाबांना समजले, की ह्या ओळी त्यांच्या लेकीने जुळवलेल्या नाहीत. बरं, लेकीला तरी कुठे काही आठवले त्यावेळी... ती सुद्धा बहुदा स्वतःवर खुश असावी...आत्ता ती ज्या काही थोड्याफार 'रचना' करते, त्यासाठी लागणार्‍या आत्मविश्वासाची मूळे त्याच काळात रुजली असावी. Lol

असो, अजूनही लेकीची आई तिला ही गोष्ट फार वेळा ऐकवते. कारण त्यावेळी तीच फार खजिल झाली असावी Lol

अनिताताई....... आपण म्हणता ते योग्यच आहे...... आपण आजी आहात म्हणजे नि:संशय आपण ही कविता माझ्या आधी ऐकलीय....... मी ८८ सालच्या या रचनेचा ''माझीच रचना आहे '' असा निर्वाळा देउ शकत नाही.... जाने २०१० पासून मी विजिगिषू आणि अभ्यासू वृत्तीने सुचतील तश्या गझला लिहीत आहे....त्या '' माझ्याच'' आहे असे मी ठामपणे म्हणू शकतो...... तसे ह्या कवितेबाबत नाही.

मुटेजी.... आपण बरेच पदर उलगडले....धन्यवाद....
पण रदीफ आणि कवाफी काही कुणाची खाजगी मालमत्ता नसते.... आपण किंवा कुणीही '' शेवटी'' ही रदीफ कधीही वापरु शकता...... आपण आपली गझल फाडून माझ्यासारख्या तुमच्या चहत्यास एका गझलेस मुकविले हे काही बरे नाही. Sad

सानीजी,

वाड्मयचौर्य ह्या प्रकारा बद्दल मला प्रचंड तिटकारा आहे........ माझ्या स्वता:च्या मतल्यावर गझल लिहून दैनिकात प्रकाशित केलेल्या माझ्या तथाकथित मित्रास मी माझ्या मैत्रीस सदाकरीता वर्ज्य ठेवले आहे... असो.
त्यामुळे मला खजिल वगैरे अजिबात वाटण्याचा विषयच नाही..... ही कविता खचितच पारंपारिक आहे....
मात्र आपणांस जो अनुभव आला तश्या ओळी सुचणे वगैरे बर्‍याचदा होते हे अगदी खरे आहे.

प्रतिसादाबद्दल आपणां सर्वांचे मनःपूर्वक आभार.

डॉ.कैलास

मी रचलेला "मतला" तुमच्या गझलेच्या मतल्याशी चक्क मिळता जुळताच होता.
मग फाडणार नाही तर काय करणार?

वरील दोन शेर मात्र माझ्या माहीतीप्रमाणे अस्सल आहे. म्हणुन राखलेत ते.

पण बिच्चारे "पोरके" झाले. आता नविन मतला लिहिल्यानंतर त्यांना "आई" मिळेल. Happy

मुटेजी....... मतला सेम होता म्हणजे आपले खयाल टकराना झाले असते......... एकच विचार दोघांना सुचु शकतो..... फक्त शब्द अगदी सेम कधी कधीच होतात......

डॉ.कैलास