झुंज भाग-३

Submitted by आशिष पवार on 13 August, 2010 - 03:03

राजुच्या विचारांनी त्यांना एवढे झोंबले होते कि, त्यांना आता आपला जीव हि नको- नकोसा वाटत होता.
पण त्यांनी आपल्या आयुष्याकडुन एकच गोष्ट शिकली होती."जिंकु किंवा मरु पण परिस्थितीशी लढु".
त्यांना आता एक आशेची किरण त्यांच्या मित्राच्या रुपान मिळुन गेली होती.ते त्याच किरणांणच्या माध्यमान आपल्या अंधारमय जीवनात प्रकाश भरावयास सुरवात करु लागले.ते राजुला बाहेर फिरायला घेउन जाउ लागले,मित्र व आप्तेष्टांच्या विविध समारंभाना राजुला आवर्जुन आपल्या सोबत नेउ लागले,प्रेक्षणीय स्थळ, गर्दीच्या ठिकाणी भेट देउ लागले.हे सारे केल्यानंतर त्यांना राजुच्या स्वभावात, वागणुकीत हळुहळु झालेला बद्दल दिसु लागला. ते मनोमन आनंदी होउ लागले आणि खुल्या अंतःकरणाने आपल्या मित्राचे आभार मानु लागले.त्यांच्या या आनंदात त्यांची पत्नी,मुलगी हि सहभागी झाले,पण या सार्‍या गोष्टींपासुन एक जीव दुखी होता तो म्हणजे प्रतिक,राजुचा धाकटा भाउ.

कोण जाणे तो या घराच्या आनंदापासुन का दुखी होता.एकदा या बद्दल वडीलांने त्याला विचारले तु आनंदी नाही आहेस का? राजुत जो झपाट्याने एक चांगला बद्दल होतोय याचा तुला आनंद होत नाहीय का?प्रतिक खाली मान घालुन हळुच वर तोंड करुन म्हणाला......पप्पा मी आनंदी आहे त्याच्यात जो बदल होतोय,ते सार मला मान्य आहे.पण पप्पा आपण नाण्याची एक बाजु पाहत आहात.

पप्पा-मग तुच आता सांग, नाण्याची दुसरी बाजु कोणतीय?
प्रतिक-तुम्ही राजुला बाहेर फिरायला मोकळ सोडताय,त्याला गर्दीच्या ठिकाणी नेताय हे सारं मला मान्य
पण आज तुम्ही त्याच्या बरोबर फिरताय, उद्या तुम्ही २४ तास त्याच्या सोबत राहु शकत नाही कारण तुम्हाला पण तुमच काम आहे पप्पा.
पप्पा-अरे! तु जे बोलतय ते काही चुकीच नाही, पण आज नाही तर उद्या ह्या परिस्थितीचा सामना तुला किंवा मला नाही तर राजुलाच करायचा आहे.त्याच्यामुळे त्याला हि बाहेरच्या जगाची,इथल्या लोकांची ओळख व्हायला हवी.
प्रतिक- तुम्हाला कस सांगु आता म्हणजे मला काय बोलायच आहे हे तुम्हाला पटकन समजेल.
पप्पा- तुला काय बोलायचे आहे ते निर्भिड पणे बोल,मी एकण्यास समर्थ आहे.
प्रतिक-पप्पा,राजु एक साधारण मुलगा नसुन तो एक मानसिक विक्रुत आहे; हे कटु सत्य विसरुन चालणार नाही.
ज्यावेळी तो एकटा घराबाहेर या खुल्या जगाचा आस्वाद घ्यायला जाईल तेव्हा त्याला तुम्हीआणि मी हे बरं,हे वाईट अस सांगणार कोणी हि मिळणार नाही,उलट लोक त्याच्या भोळ्या पणाचा फायदा घेउन त्याला फसवतील वाईट मार्गाला लावतील.
पप्पा-रागाने म्हणाले.............. तो वाईट मार्गाने बरा हो अथवा चांगल्या मार्गाने.मी आता एकच स्वप्न पाहीलय...कि त्यानी हि आपल्या सारख साधारण जीवन जगावं.पाहता -पाहता अलगद त्यांच्या डोळ्यांची पापणी ओलावली, जणु त्यांच्या आनंदावर क्षणातच कोणी विर्जन टाकले असावे.
प्रतिक-त्यांची हि अवस्था पाहुन प्रतिक भावुक होउन म्हणाला........पप्पा मला क्षमा करा! माझ्या कडुन जर चुकुन काही वेड-वाकड बोलल्या गेल असेल तर माफी असावी.जस तुम्ही एक स्वप्न पाहिल आहे कि माझा राजु एक दिवस एक मोठा व्यक्ती बनावा, तस स्वप्न मी पण पाहिलय कि माझा भाउ या समाजात एक प्रतिष्ठीत व्यक्ती म्हणुन ओळखला जावा. पप्पा तुमचा आणि माझा द्रुष्टीकोन एकच होता.आपला गैरसमज कशासाठी करुन घेताय.
पप्पा-आता तु मला शिकवशील काय बरं आहे आणि काय वाईट.
प्रतिक-तस नाही हो! तुम्हीच तर शिकवलय ............"जे खरं ते खरं आणि जे चुकीच ते चुकीच.तुमचाच आदर्श डोळ्यासमोर ठेउन आतापर्यंत जगत आलोय आणि इथुन पुढे हि जगणार आहे.
पप्पा-खुप मोठया गोष्टी करायला लागला रे तु............आता तस बघायला गेल तर खर्‍या अर्थाने तु मोठा झाला आहेस ना.काय बरं ,काय वाईट हे तुला चांगल समजत ना, मग कस तु सहजा-सहजी या बापाच ऐकणार.

प्रतिक- पप्पा! "मुलगा कितीही मोठा झाला तरी बापाचच नाव पुढे लावाव लागत" त्याला हे कस बरं विसरुन चालेल.एवढं बोलुन प्रतिक तेथुन निघुन गेला.......................आणि आपल्या वडीलांच्या मनात सोडुन गेला........
एक विचार...............................
क्रमशः

गुलमोहर: 

पप्पा
प्रतिक
पप्पा
प्रतिक
पप्पा
प्रतिक
पप्पा
प्रतिक
पप्पा
प्रतिक
पप्पा
प्रतिक
पप्पा
प्रतिक- पप्पा!
पप्पांना नाव कधी देणार?

आयला आधी "मुलाचं" नाव ठेवलं. मग पप्पाचं बारसं कधी???

आता "राजूच्या" जागी "प्रतिक" आला का??

."जिंकु किंवा मरु पण परिस्थितीशी लढु".
हे लेखकाने म्हटलेलं अगदी खरयं. कथा वाचून आता मीही तेच करतोय.:)
परिस्थितीशी लढतोय. "झुंज" देतोय....("झुंज भाग-३" बघितलतं किती "कडवी" झुंज दिलीय लेखकाने ती..??)

"जिंकु किंवा मरु पण परिस्थितीशी लढु".
>>हे लेखकाने म्हटलेलं अगदी खरयं. कथा वाचून आता मीही तेच करतोय.स्मित

Light 1 Rofl

काय दम नाही राव कथेत.
कसली मानसिक विकृती? Uhoh

आता पर्यंतच्या तीनही कथांमध्ये चित्र-विचित्र लिहिल्याने फारच विनोदी झालीत काही वाक्य.

राजुच्या विचारांनी त्यांना एवढे झोंबले होते कि, त्यांना आता आपला जीव हि नको- नकोसा वाटत होता.
>>> म्हणजे काय?? कय च्या कय उगीच!!

ते त्याच किरणांणच्या माध्यमान आपल्या अंधारमय जीवनात प्रकाश भरावयास सुरवात करु लागले >>> घास भरवतात. प्रकाश कसा भरवायचा असतो कुणी सांगेल का प्लीज? Uhoh