मालवणी शिकायचंय? भाग-२

Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31

मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं नाव अश्विनी. मी हैद्राबादेत राहते, अत्तरे विकिते. मला एक मुलगी आहे. हे कसे बोलणार मालवणीत ते सांगा सरजी. म्याड्मजी.

सगळे मास्तर, मास्तरीनी कुठे आहेत.. आम्हला तर कोणीच शिकवत नाही.. झेड्पी च्या शाळेतल्या मास्तरांसारखे आहेत सगळे.... एकमेकांशीच गप्प मारण्यात दंग Sad

माझां नांव अश्विनी. मी हैद्राबादेक रवतय, अत्तर विकतय. माका एक चेडु आसा. ह्या मालवणित कसा बोलुचा ह्या सांगा गुर्जी, बाई. Happy

डॅफो. हो बगलय तुझ्या चेड्वाक. मस्ती करता काय खूप Happy
मामी
माझा नाव आश्विनी. मी हैद्राबादेत रवतय. अत्तर विकतय माका एक चेडू आसा. गुर्जीनू / बाईनू, ह्या मालवणीत कसा बोलूचा ता सांगा? Happy

अरेच्चा गुर्जी आदीच ईलेत

माझे नाव अश्विनी. मिया हैद्राबादेत रवतय, अत्तर विकतय. माका एक चेडु असा.
खय रवलात आज सगळे? काकांनु, मास्तरांनु, हेमांनु येवा हयसर.. Happy

माझे नाव सारीका.. मी जेजुरीची आहे.. लग्नानंतर यवतमाळमधे आले.. सध्या नवरा चायनाला गेला आहे.. म्हणून स्वातंत्र्य उपभोगत आहे.. Happy याचे भाषांतर करावे..

धन्यवाद कसे म्हण्ता?

आपले नाव काय? :
आपण कोण गावचे? :
काय उद्योग करता ? नोकरी कुठे आहे? :
पोरंबाळं किती?
नॉन्वेज खाता काय? की शुद्ध शाकाहारी? :
आपसे मिलकर बडी खुषी हुई.:

वरील लेसन मी बोलून पाहिले: लै मजा आली.

ठकू, तुम्ही मामींका भ्रमान वर उत्तर दिल्यान आसा, त्या धर्तीवर आधी स्वतः मालवणी लिवचो प्रयत्न करा बघया. चुकल्यार सांगूक आसतच जाणकार.

बरोबर शैलजा . ठकु तसाच करूचा आधी. " चुकात तो शिकात ". बिन्दास्त लिव. हयसर कोण एक हसणत नाय कोणाक , उलट सुधारून शिकवतत.

आता माजो ह्यो प्रयत्न. माझे नाव अरुंधती. मिया पुण्यात रवतंय. माका गजाली करूक मजा येत आसा.
बरोबर लिहिले की चूक? दुरुस्त करणार का? Happy

ठकु...
ठिकाय तर.. गुरुकाका शैलूताय.. कसे असा तुमी सारेजन..?>>> बरां तर... गुरुकाका, शैलुताय... कशे आसात तुम्ही सगळे?...
मी यवतमाळाक असता.. माका कोंकणाची खुप आठवण येते..>>> मी यवतमाळाक आसतंय... माका कोकणचई खूप आठव/ आठवण येता...

अरुंधती...
आता माजो ह्यो प्रयत्न... एकदम बरोबर
माझे नाव अरुंधती... माझां नाव अरुंधती/ मी अरुंधती...
मिया पुण्यात रवतंय... एकदम बरोबर
माका गजाली करूक मजा येत आसा... माका गजाली मारुक येतत/ आवाडतत
बरोबर लिहिले की चूक? दुरुस्त करणार का?... बरोबर लिवलय की चूक?... दुरुस्त करतालात मां?...

धन्यवाद विवेकानु! Happy

बुदोन्त ह्यो शब्द मालवणी आसा की अजून वेगळा? माजे बहिणीचो सासर कोकणी आसा, त्येंच्याकडं कोकणीतून बोलतात.

अरे वा क्लास लय जोरात चल्लेला दिसता. विद्यार्थी लय अभ्यासू दिसतंत. पाsर यवतमाळसून इलेत. असे विद्यार्थी व्हये. चलांदेत.
ओ यवतमाळकरीण बाय, तुमका परभणी आयकान म्हायत आसा काय? तुमच्या यवतमाळसून ३/३.५ तास हो. मिया थंयलोच. Happy

अरे वा मास्तर ईलेत. ईद्यार्थांनो हे गजालीचे अधिकृत मास्तर आसत Happy तेवा काय पण अडला तर ह्यांका पकडूचा. Proud
ठकू करता ठांकू ठांकू Happy

कोनी हायसा? समदे जेवूक गेल्यात?
मास्तरानु, वर अश्विनीमामीने सांगितल्याली वाक्ये मालवणीत कशी म्हणूची? दुरुस्त करतालात मां? Happy

कोनी हायसा? >> अरुंधती, हे असं म्हण - कोणी आसात/ आसत (आहात/ आहेत) काय?
समदे जेवूक गेल्यात? - सगळे जेवण करुक गेल्यात काय?

आता तू कर बघया बाकीची वाक्या भाषांतरीत. मगे जर चुकलाच तर सांगूक गावताच. Happy

कोनी हायसा? समदे जेवूक गेल्यात?
मास्तरानु, वर अश्विनीमामीने सांगितल्याली वाक्ये मालवणीत कशी म्हणूची? दुरुस्त करतालात मां?>>
कोणी आसा काय? की गेली सगळी जेवाक? मास्तरानुं, वर अश्विनीमामीने सांगलेली वाक्या मालवणीत कशी म्हणूची?दुरुस्त करतालात मां?

आपले नाव काय? :>> आपलां नाव काय?
आपण कोण गावचे? :>> आपण खंयचे/आपण खंयच्या गावचे?
काय उद्योग करता ? नोकरी कुठे आहे? :>> आपण खंयचो उद्योग करता? नोकरी खंय आसा?
पोरंबाळं किती?>> पोरंबाळं किती?
नॉन्वेज खाता काय? की शुद्ध शाकाहारी? :>> नॉनव्हेज खातास काय? की शुध्द शाकाहारी?
आपसे मिलकर बडी खुषी हुई.: >> आपणाक भेटान लय बरां वाटला

वरील लेसन मी बोलून पाहिले: लै मजा आली.>> वरचे लेसन मिया बोलान बगलंय: लै मजा इली

Pages