जिवन- भाग - १

Submitted by Deepali_Mali on 9 August, 2010 - 03:44

'समर अरे थांब ना..........' रुपेशनी कोकाट्त बाईक पार्क केली .
समर शांत पने रुपेशआधी कट्ट्यावर बसुन समुद्र न्याहालत होता. त्याची आवडती जागा.

'मला एक सांग, तुला नेहमी दुपारची वेळ का आवडते इथे येण्यासाथि. मस्त संध्याकाळी येयाचं तर............ तुझं नेहमी ......... तुला माहीती आहे इथे संध्याकाळी किति सुंदर मुली येतात. तु पन यार... काय तर इथे दुपारच्या शांत वेळेत खुप शांत वाट्ते........' इती रुपेश

'तु जरा गप्प राहनार आहेस का?, मला काही ...........'

'ok ...........' काय पन साला.ह्याच्या मागे पोरी लागतात तर हा लांब भागतो. आणि आपन पोरींमागे तर पोरी आपल्या पासुन लांब. च्या......... रुपेशने स्वःतालाच शिवी हासड्ली.

'रुपेश तुला कंटाळा वाटत असेल तर तु जा. मी तुला आधिच सांगितले कि येउ नकोस. पण तु .................... हे बघ ..........' तितक्यात एक नवी कोरी कार तिथुन जरा लांब जाऊन थांबली. एका आनामिक धुंदित समर बोलनं टाकुन नजर त्या गाडीच्या दिशेने वळवली. त्याला एक कारण पुरेशं होतं कि दुपारच्या वेळेला सी - फेस वर कोन? ................... कारण तो तिथे बहुतेक रोजच येत होता. पन त्याने गेल्या तिन वर्शात इथे कोणाला पाहिले नव्हते.

दुसर्‍या क्षणी दरवाजा उघडुन एक बायकी पाय बाहेर आला. समर क्षणभर तिचे निरिक्षण करत होता. निळ्या कलरचा पंजाबी सुट, पायात मोजडी, पेंजन, हातात एक कडा, केसांची वेणी मानेवरुन पुधे घेतलेली. नॅचरली बाहेर असनार्‍या बटी वार्‍यावर उड्त होत्या. समर काही हरवल्या सारखा तिच्या कडे पाहत होता. दुसर्‍या क्षणी रुपेशनी समरचा खांदा हलवला.

'अरे काय झालं ?'
'ती खरंच आहे का?'
'कोण........?'
'अरे ती.................' समरने बोट दाखवत रुपेशची नजर तिकडे केली.
'ती ? हो आहे ना ? का? तु पन क्लिन बोल्ट झालास की काय?'

'अरे पन............'
समर चे वाक्य अपुर्णच राहिले. तेवध्यात तिथे अजुन एक कार तिच्या कार जवळ उभि राहिली. कारचा दरवाजा उघडला एक मध्यमवयी ग्रुहस्त बाहेर आले. तिच्या समोर उभे राहिले. काहि क्षणात दोन्ही कार तिच्या सोबत निघुन गेल्या. समर एकटक त्या दिशेने पाहत उभा राहिला.
रुपेश नी जवळ जवळ त्याला हलवुन भानावर आणले. भानावर येताच त्याने सरळ आपला मोर्चा बाइक जवळ नेला आणि सरळ निघाला. पाथुन रुपेश काहिसा वेतागुन त्याच्या पथोपाथ निघाला.

*************
(क्रमश Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कथेच शिर्षक जीवन - जगणे या अर्थी असेल तर 'जीवन' असे लिहा. बाकी वेग उत्तम. शुध्दलेखनाच्या चुका टाळता आल्या तर बघा Happy एक प्रेमळ सल्ला.