विविध उपक्रमांसाठी स्वयंसेवक

Submitted by admin on 19 June, 2009 - 01:52

गेली अनेक वर्षे मायबोलीवर बरेच उपक्रम चालू आहेत. जसे की गणेशोत्सव, दिवाळी अंक, वर्षा विहार व मायबोली टिशर्टस, गझल कार्यशाळा तसेच संवाद व आताचे अक्षरवार्ता. हे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत ते तुमच्यामधल्याच स्वयंसेवकांच्या मदतीमुळेच. ह्या सर्व उपक्रमांची माहिती वरील मेनूपैकी "मायबोली विशेष"मध्ये मिळेल.

सर्वसाधारणपणे काही उपक्रमांसाठी दर दिवशी काही मिनिटे तर इतर उपक्रमांसाठी काही तास द्यावे लागतील. खालीलपैकी कुठल्या उपक्रमासाठी तुम्ही आपला वेळ देऊ शकता ते कळवा. जेव्हा ते उपक्रम सुरू करायचे असतील तेव्हा त्या उपक्रमाचे संयोजक आपल्याशी संपर्क करतील. काही उपक्रमांत मर्यादीत सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही.

१. गणेशोत्सव संयोजन
२. दिवाळी अंक संपादन
३. दिवाळी अंक रेखाटन
४. दिवाळी अंक सजावट
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
७. कानोकानीसाठी मदत.
८. वर्षा विहार
९. मायबोली टी-शर्टस

अजून उपक्रम वाढतील तसे इथे ते लिहिले जातील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनीशा, ज्ञाती, पराग, सिंडरेला, अमृता, rar यांनी हे शब्दांकन करायचे काम घेतले आहे. अजुन जर आवश्यकता लागली तर तसे कळवतो.

सध्या उन्हाळ्याच्या जोरदार झळा जाणवत आहेत, त्यामुळे पुण्या-मुंबईतल्या मायबोलीकरांना वर्षाविहार कधी येतोय याची उत्सुकता लागून राहिली असेल.

गेलि ४/५ वर्षे सुनियोजीतपणे वर्षाविहाराची आखणी आणि आयोजन करणारी काही संयोजक मंडळी आता थोडा काळ विश्रांती घेऊ इच्छीत आहेत. त्यामुळे २०१० च्या वर्षाविहार आणि मायबोली टिशर्ट संयोजानासाठी पुण्या-मुंबईतले स्वयंसेवक हवे आहेत. ज्या मायबोलीकरांना हे काम करण्याची इच्छा आहे त्यांनी इथे तसे कळवावे किंवा मायबोलीवरून मला संपर्क करावा. उत्सूक असलेल्या सर्वांनाच या वर्षी संधी मिळेल असं नाही पण तुमची नावं नोंदवून पुढील वर्षांत नक्कीच संधी मिळेल.

या कामात नवीन सदस्यांना जुने सदस्य नक्कीच मार्गदर्शन करतील.

मलाही काही मदत करायची इच्छा आहे. वर्षा-विहार किंवा टीशर्ट संयोजनही आवडलं असतं, पण देशात नाही म्हणजे जमणार नाही.

असो, मला १,२,४,५,६ मध्ये काम करायला आवडेल तसंच जिथे गरज असेल तिथे काम करायची तयारी आहे.

टिशर्ट संयोजनात आणि ववि संयोजनात मला सामील करा अ‍ॅडमिनजी........

बादवे टिशर्ट संयोजनात नक्की काय काय करावे लागते? Uhoh

८. वर्षा विहार
९. मायबोली टी-शर्टस

मी या वर्षी या समित्यांमध्ये काम केलेय. Happy मला त्यातच रहायला आवडेल.

मला खालील उपक्रमांसाठी मदत करायला आवडेल.

२. दिवाळी अंक संपादन
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
७. कानोकानीसाठी मदत.

Pages