दिवाळी अंक २००८ - घोषणा

Submitted by संपादक on 16 September, 2008 - 17:55

'मायबोली मराठी - गेलं तप, येणारं तप'
हितगुज दिवाळी अंक २००८

सप्रेम नमस्कार सुजनहो,

यंदा आपल्या हितगुज दिवाळी अंकाचं नववं वर्षं. आपली 'मायबोली' यंदा बारा वर्षांची झाली.

ज्ञानोबांनी जिला वळण दिले... श्रेष्ठ संतपरंपरा, जाणते असे राजे, दूरदृष्टीचे समाजसुधारक, निर्भीड तत्त्वज्ञ, अभिजात साहित्यिक, क्रांतीकारक आणि उत्क्रांतीकारक अशा सर्वांनी जिला वळण लावले... ती तुम्ही आम्ही ७०० वर्षे जोपासलेली मायबोली जालावर अवतरली, त्यालाही एक तप झाले. एक तप पूर्ण होणे याला महत्त्व का आहे ? तप म्हणजे केवळ काळाचा एक तुकडा एवढेच नव्हे, तप ही साधना आहे... तपाची गरज भासणे आणि त्यानुसार तयारी करणे ही क्रांती असते आणि त्यानंतर येणारा १२ वर्षांचा काल म्हणजे उत्क्रांती होय. त्यामुळेच जेव्हा एक तप पूर्ण होते तेव्हा होते ते स्थित्यंतर.... आमूलाग्र !

हे स्थित्यंतर होते मनाचे, देहाचे...व्यक्तीचे, समूहाचे.... ७०० वर्षांच्या मायमराठीचे आणि १२ वर्षांच्या मायबोलीचेसुद्धा.

या वर्षी आपण साजरा करत आहोत तो हा स्थितीबदल... जो घडला तो आणि जो येऊ घातला आहे तोही. या दीपावलीच्या शुभप्रसंगी आपण घेऊया एक आढावा - गेल्या एका तपात आपल्या 'मायबोली'मध्ये आणि एकूणच 'जे जे काही मराठी' त्या त्या सर्वांमध्ये झालेल्या बदलांचा... आणि त्याचवेळी डोकावून बघूया आगामी बदलांकडे, आगामी उत्क्रांतीकडे.

मायबोली हे संकेतस्थळ, आपली सगळ्यांची भाषा, देशविदेशात विखुरलेला मराठी समाज यांत झालेल्या व होऊ घातलेल्या बदलांबद्दल तुमचे ललित लेख, कथा, कविता आम्हांला पाठवा.

याशिवाय नेहमीप्रमाणेच कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, परिक्षणं, मुलाखती वगैरेबरोबरच बाल साहित्याचंही स्वागत असणार आहे. आणि बालसाहित्य मायबोलीकरांच्या मुलांच्या लेखणीतून उतरलेले असेल तर उत्तमच!

तुमच्या छायाचित्रांचे, कलाकुसरीचे, रेखाटनांचे, इतर कुठल्याही गुणप्रदर्शनाचे देखील स्वागत आहे! दर्जेदार लिखित साहित्याच्या बरोबरीच्या दॄक अन श्राव्य कलाकृती हे आपल्या अंकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. यंदाच्या अंकात मायबोलीकरांच्या कलागुणांचा आविष्कार दॄक अन श्राव्य माध्यमातून सर्व वाचकांच्या पुढ्यात मांडता येईल.

साहित्य पाठवण्याचा शेवटचा दिवस ऑक्टोबर १५, २००८ राहील. दिवाळी अंकासाठी तुमचे साहित्य या दुव्यावर पाठवा. त्याचबरोबर नियम व सूचनाही प्रकाशित करत आहोत. तरी तुमच्या शंका वा प्रश्न sampadak AT maayboli DOT com या पत्त्यावर जरूर पाठवा!

मग करताय ना सुरुवात? आपल्या दिवाळी अंकात प्रत्येक मायबोलीकराचा सहभाग हवाच!

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्यासंबंधी काही सूचना आणि नियम -

गणेशोत्सवाची सांगता होता-होता आपल्या दिवाळी अंकाची तयारी सुरू झालेलीच आहे. तुम्हीही अंकासाठी साहित्य पाठवायच्या तयारीला नक्कीच लागला असाल. तेव्हा ते कसे, कधी, कोठे पाठवायचे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. त्यासाठी या काही सूचना आणि नियम.

१. दिवाळी अंकासाठी पाठवायचे साहित्य १५ ऑक्टोबर २००८ पर्यंत संपादक मंडळाकडे पोहोचले पाहिजे.

२. साहित्य सॉफ्ट कॉपीमध्ये आणि देवनागरी लिपीमध्येच पाठवावे. जर काही कारणाने ते देवनागरी लिपीमध्ये पाठवणे शक्य झाले नाही तर ते रोमन लिपीमध्ये असले तरी त्याभोवती dev tag टाकून त्याचे देवनागरीमध्ये सहजगत्या लिप्यंतर होऊ शकेल असे पहावे. नुसते Minglish मध्ये पाठवलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही. तसेच मायबोलीकर नसलेल्या कोणाकडून विशेष साहित्य आणले असल्यास ते दिवाळी अंकासाठी पाठवणार्‍या मायबोलीकराने त्याचे देवनागरीकरण करून सॉफ्ट कॉपीमध्ये पाठवावे.

३. साहित्य पाठवताना शक्यतो व्याकरणाचें आणि शुद्धलेखनाचें नियमांत बसेल असे पहावे.

४. साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादक मंडळ राखून ठेवत आहे. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादक मंडळ बांधील नाही. याबाबत संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.

५. आपल्या दिवाळी अंकात याही वर्षी काही साहित्यकृतींसोबत रेखाटने असतीलच. रेखाटन समिती आणि संपादक मंडळ रेखाटनासाठी साहित्य निवडण्याबाबतचा निर्णय घेतील आणि तो अंतिम असेल.

६. अंकासाठी कोणत्या प्रकारचे आणि किती साहित्य पाठवायचे यावर अर्थातच बंधन नाही. परंतु पाठवलेले सर्व साहित्य स्वीकारले जाईलच असे नाही. कृपया पूर्ण लेख / कथा / कादंबरी / कविता एकाच पोस्टमध्ये पाठवावे.

७. आपण जे साहित्य पाठवू इच्छिता त्याचा आकार जर मोठा असेल आणि ते मायबोलीवरुन पाठवणे शक्य होत नसेल तर कृपया संपादक मंडळाशी संपर्क साधा.

८. दिवाळी अंकात आपली मायबोलीवरची ओळख प्रसिद्ध व्हावी की आपले नाव हे तुम्हीच ठरवायचे आहे. साहित्य पाठवताना ते कृपया नमूद करावे. तसेच आपले नाव प्रसिद्ध करायचे असेल तर ते आपल्याला जसे प्रसिद्ध व्हावे असे वाटत असेल तसे कळवावे. उदाहरणार्थ पूर्ण नाव की फक्त नाव की नाव आणि आडनाव.

९. साहित्य मिळाल्याची पोच शक्य होईल तशी पाठवली जाईलच.

मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा:

हितगुज दिवाळी अंकाच्या वाढत्या लोकप्रियतेला लक्षात घेता आम्हाला दिवाळी अंकासाठी आपण पाठवत असलेल्या कुठल्याही प्रवेशिकेच्या मालकीहक्काविषयी ( Copyright information ) स्पष्टीकरण आपल्या संरक्षणासाठी देणे महत्त्वाचे वाटते. यासाठीचे नियम खालीलप्रमाणे असतीलः

येणार्‍या प्रत्येक प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क ती प्रवेशिका पाठवणार्‍या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. परंतु पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी, तुम्ही मायबोली प्रशासनाला त्या प्रवेशिकेला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.

याचा अर्थः

* प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क तुमचे असतील व तुम्ही त्या प्रवेशिका इतरत्र प्रसिद्ध करु अथवा तुमच्या वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकता.
* परंतु मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)
* भविष्यात ती प्रवेशिका मायबोलीवरुन अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावी असे तुम्हाला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधिल राहणार नाही. (कायमस्वरुपी परवाना)
* तुम्ही तुमची प्रवेशिका इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ती प्रवेशिका मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)

यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया संपादक मंडळाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद.

Copyright remains with respective author and artists. But by submitting your work, you are giving unlimited, perpetual and irrevocable license to maayboli to publish on maayboli.com or where ever maayboli.inc wants to use it in any media.

What it means:
* The copyright and ownership remains with author / artist and they can use it however they want such as sell, publish their work etc.
* But they have given the right to maayboli to publish on maayboli or any other media such as PDF, CD etc in future. (unlimited)
* Maayboli is not obligated to remove the work from maayboli or other media if author wants in future. (perpetual)
* If author sells his/her copyright to a new owner, the new owner can not ask maayboli to remove the work from maayboli. (irrevocable)

If you have any further questions related to this, please email the Sampadak Mandal. Thank you.

आपले साहित्याभिलाषी
संपादक मंडळ

संपादक, मेल पाठवली आहे ती पाहता का प्लीज?

संपादक, काल रात्री पाठवलेलं साहित्य तुम्हांला मिळालं का?

ITgirl
आपल्या इमेल ला उत्तर दिलेलं आहे.

सायोनारा
साहित्य मिळालेलं आहे. तशी इमेल तुम्हाला येईलच थोड्या वेळात.

चिन्या१९८५

आपल्या लेखासंबंधित एक इमेल संपादकांनी पाठवली होती. त्याला उत्तर द्याल का ?

आज शेवटचा दिवस आहे ना ? नक्की किती वाजेपर्यंत देऊ शकतो ?

संपादक, त्या दुव्यावर साहित्य टाकलंय. अपूर्ण सिलेक्ट करून. नाहीतर म्हटलं आधीच पब्लिश व्हायचं. का ते प्रकाशित करण्या योग्य असं करू? मेल मधे पण पाठवते. पण मग ते मिंग्लिश मधे येईल.

संघमित्रा
ते साहित्य कृपया 'सुपूर्त करण्यायोग्य' करा. तसे केल्याने ते फक्त संपादक मंडळाला दिसेल. अपूर्ण साहित्य फक्त तुम्हालाच दिसते.

सिंडरेला
साहित्य आज रात्री बारा वाजेपर्यंत पाठवले तरी चालेल.

वा वा ठान्कु ठान्कु Happy

मायबोलीचा दिवाळी अंक प्रिंट माध्यमात असतो का???जर नाही तर तो प्रिंट का करत नाही??? >> अंकाची PDF available केली जाते, ती वापरून तुम्ही print करू शकता. अंकाचा over all layout, design हि net ला अनुरुप केली जाते जी printed media पेक्षा पूर्णपणे वेगळी असते.

PDF availability date varies based upon work load on editors.

संपादक्,मेलला उत्तर दिले आहे. ते करण्यासाठी किती दिवसाचा कालावधी आपण देउ शकता????
असामी,ते करण इतक अवघड नसाव्.बाकी मी फक्त एक आयडीया दिली ज्याप्रकारे मायबोली जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

दृकश्राव्य कार्यक्रम कधी आणि कसे द्यायचे आहेत ?

सिंड्रेला, चिन्या१९८५
तुम्हाला इमेल केली आहे

हुश्श बाराला २० मिनिट असताना केलं सबमिट लिखाण (एक 'ला ला ला...' गुणगुणणारी रिलॅक्स बाहुली)

एखाद-दुसर दिवस वाढवून मिळेल का? प्लीज!

झुलेलाल
तुम्हाला इमेल केली आहे.

सिंड्रेला
अजून एक इमेल केली आहे तुम्हाला. त्वरित उत्तर द्यावे.

उत्तर दिले आहे. मी काल पाठविलेल्या साहित्यात एक छोटासा बदल करता येइल का ?

संपादक, मी आता ते सुपूर्त केलंय. मिळालं का तेवढं सांगता का प्लिज?

संपादक राहिलेलि परवानगि पण मिळाली आहे.सर्व फोटो वापरु शकता.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

खुशखबर! खुशखबर!!
सर्व मायबोलीकर कलाकारांसाठी खुशखबर!

अंकासाठी साहित्य पाठवायची मुदत रविवार दिनांक १९ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

दिवाळी अंकाच्या संकल्पने बद्दल लिहा, पाककॄतींचे, मेंदी लावण्याचे, कुंभारकामाचे चित्रण करा, गोष्टी सांगा, कविता वाचा, तुम्ही राहता तिथल्या संस्कृतीचे, खाद्यजीवनाचे वर्णन लिहा....

सर्व प्रकारच्या कलाकृतींचे स्वागत आहे.

आपले कलाभिलाषी
संपादक मंडळ

अंकासाठी साहित्य पाठवायची मुदत रविवार दिनांक १९ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. >>>
एक आनंदाने वेडी झालेली बाहुली Happy

अजुन एक आनंद झालेली बाहुली (मी नै वेडी) Wink

संपादक, मी पाठवलेले ईमेल (एक attachment सहित आणि दुसरा सीडी बद्दल) मिळाले असतील तर कृपया इथे किंवा ईमेलने कळवा. माझ्या ईमेल खात्यात काहीतरी गडबड आहे. sent विभागात काहीच दिसत नाहिये, म्हणून विनंती.

परागकण

परागकण

आपण पाठवलेले साहित्य व सीडीबद्दलची इमेल दोन्ही मिळाले आहेत.

संपादक, मी पाठविलेल्या साहित्यात एक छोटासा बदल करता येइल का ?

मला किनई शाळेत असताना विज्ञान प्रयोग एकदाचा पूर्ण करुन सुपुर्त केल्यावर जसं वाटायचं तसं वाट्टय. गॅदरिंग आल्याशिवाय कळणारच नाही का माझा प्रयोग शाळेने घेतला की नाही ?

दिवाळी आली! घरं साफ झाली, फराळाची तयारीही झाली.. आता आतूरतेने वाट पाहतोय त्या दीपोत्सवाची... दिवाळी म्हणजे खमंग फराळ, नातेवाईकांबरोबर उडणारी हास्यकारंजी आणि अर्थातच दिवाळी अंक!

मायबोलीचा दिवाळी अंक तयार होत आलाय मंडळी. काय काय आहे त्यात? थोडंसं डोकावूया त्याच्या अंतरंगात..
**************
"आजही मी रोज नेमाने लेखन करतो. 'दिसामाजिं काहीतरी ते लिहावें' वर आमच्या पिढीतल्या लेखकांचा तसा खूप विश्वास. कुठलीशी इंग्रजी लेखिका... अगाथा ख्रिस्ती बहुधा... किंवा अजून कुणी असेल. तुम्हाला म्हणून सांगतो माझा इंग्रजी साहित्याचा तेवढा व्यासंग नाही. तर ती म्हणे, काही लिहिण्यासारखं नसेल तरी टाईपरायटरावर काहीतरी टायपत बसायची. मला मात्र रोज काहीनाकाही सुचतंच. ही देवाची कृपाच म्हणायची.... माझं तर स्पष्ट मत आहे की लेखकाने रोज लिहित राहिलं पाहिजे. आळस करता कामा नये. कधी लिहिलेलं चांगलं उतरतं; कधी नाही. पण लिहावं.

पण एक काळ... बरं का असाही येऊन गेला माझ्या लेखन कारकीर्दीत की, मी सहा महिने काही लिहिलंच नाही. इतकी वाईट अवस्था की हातात पेन धरवेना. नुस्ती घुसमट... तगमग... लिहायला बसलो की ती एक घटना पुन्हापुन्हा आठवायची. मग लिहायची इच्छाच नाहीशी व्हायची. आज मी तुम्हाला सांगतोय ही त्याबद्दलचीच गोष्ट आहे."

काय आहे ही गोष्ट? उत्कंठेच्या वळणावळणानी जाणारी 'दिसामाजिं काहीतरी..' ही कथा आहे श्रद्धाके यांची...
**************

"बाबा, तुम्ही खरंच इतरांपेक्षा फार वेगळे आहात... तुमचं वेगळेपण दिसतं ते तुम्ही या प्रश्नांची जी उत्तरं दिली आहेत त्यातून. माझा नैसर्गिक मापदंडच वेगळा आहे असं अनुमान तुम्ही काढलं आहे... एखाद्या सर्वसामान्य माणसाने, नव्हे, एखाद्या सर्वसामान्य शास्त्रज्ञानेदेखिल 'हा ट्यूमरच' असं अनुमान काढलं असतं... पण असं अनुमान काढताना आपली काही गृहितकं असतात... त्यांची एक उतरंड असते... या उतरंडीत तुम्ही अगदी खाली गेलात... या उतरंडीतलं सर्वात खालचं, सर्वात पहिलं असं जे गृहितक तेच तुम्ही हलवलंत."

काय म्हणतोय आपला मुलगा बाबांबद्दल? आणि यानंतर तो बाबांना काय सांगणार आहे? वाचा स्लार्टी यांच्या 'निरीक्षक' या कथेमध्ये..
**************

"'सारख्या काय गं कुचूकुचू बोलत असता?' हे वाक्य आमच्यासाठी खास आहे. शाळेतल्या सगळ्या बाई ते जस्संच्या तस्सं म्हणतात... त्यांच्या त्यांच्या तासाला. असं म्हणल्यावर आम्ही निदान दीड मिनिट गप्प बसतो, म्हणून का काय, काय माहीत ?! पण त्यामुळं आमचं बोलणं शाळा संपली तरी संपतच नाही. मग शाळा सुटली की आम्ही सायकलवर गप्पा मारत जातो माझ्या घरापर्यंत. मग आम्ही सायकली लाऊन आत जातो. हातपाय धुवून दूध आणि पोहे खातो. तेंव्हाही आई साडेतेरा वेळा सांगती की आधी खा आणि मग बोला. मग किल्ली घरी जाती. आता ती मला सोडायला घरी आली म्हणल्यावर मला पण जायला पायजे की नाही ? मग आम्ही थोड्या वेळ तिथं पण गप्पा मारतो. मग किल्लीची आई ओरडती, "अगं बसून अभ्यास करा. नुसतं हिकडून तिकडं, तिकडून हिकडं ! आणि काय गं? साऽऽऽरखं कुचुकुचू काय बोलता गं?"

सारखी कुचुकुचू बडबड करणार्‍या या मैत्रिणी, एक दिवस बोलेनाश्या झाल्या! का बरं? त्यांचा अबोला संपला की नाही? त्यांची मैत्री टिकली की मोडली? - संघमित्रा घेऊन आल्या आहेत एक सुंदर, निरागस गोष्ट 'चिठ्ठी'..
***********

याशिवाय, स्वाती_आंबोळे, मन्जूडी, पमा, आशिष, केदार१२३, चाफ्फा यांच्याही एकाहून एक सरस कथा..
*********************

दिवाळी अंकामध्ये 'संवाद' हवाच. यावर्षी दिवाळी अंकात साधत आहोत संवाद ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, परदेशामधील मराठी चळवळीचे प्रणेते दांपत्य- शोभा आणि दिलिप चित्रे, प्रत्येक भारतीयाला जिचा अभिमान वाटतो अशी पॅराजंपर शीतल महाजन आणि ऍश्डेन पुरस्कार विजेते ज्येष्ठ शास्त्रज्ञ, ARTIचे डॉ. आनंद कर्वे यांच्याशी.
*********************

मायबोली मराठी- एका तपात कुठून कुठे आलो आपण? आणि कुठे जाणार आहोत? संकल्पेनेविषयी बोलत आहेत चंपक, ही संकल्पना एका छोट्या प्रसंगामधून मांडत आहेत सुपरमॉम आणि अभया. या संकल्पनेवर चित्राविष्काराद्वारे भाष्य करत आहेत .

यावर्षी दिवाळी अंकांना शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. कोणता आणि कसा होता आपला पहिलावहिला दिवाळी अंक? कोणी लिहिलं होतं त्यात? कसा होता त्यानंतरचा दिवाळी अंकांचा प्रवास?- कुतुहल वाटलं असेल ना... चिनूक्स घेत आहेत आढावा-दिवाळी अंकांच्या १०० वर्षांचा...
***********************

याव्यतिरिक्तही मायबोलीचा नववा अंक आपल्याला एक सुखद 'श्रवणीय' अनुभव देणार आहे..

उत्सुकता वाढतीये ना? आणखी थोडेच दिवस थांबा मंडळी, येत आहे मायबोलीचा नववा ’हितगुज दिवाळी अंक’ तुमच्या भेटीला.. लवकरच!

सम्पादक, कधी प्रकाशित होणार अंक? खुप उत्सुकता लागून राहिली आहे...

संपादक महोदय
मी काही साहित्य पाठवीलेल पण पोहोचल कि नाही ते कळल नाही.:(

........................................................................................
Be yourself ........
The people that mind dont matter and The people that matter dont mind .

सीमा
साहित्य मिळालेले आहे. संपादकांची पोचपावतीची इमेल आली नाही का अजून ?

वा वा सगळे यशस्वी आणि दिग्गज कलाकार दिसतायत की कथा विभागात.. !!!
शोनू, दाद, अज्जुका, नंदिनी ह्यांच्या कथा नाहित का?????? की बाकीच्या विभागांमधून हजेरी लावतायत?

Pages