रानभाजी १५) शेवग्याचा पाला

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 July, 2010 - 06:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शेवग्याचा पाला
२ मोठे कांदे
२-३ मिरच्या
३-४ पाकळ्या लसुण
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
३-४ खवलेल चमचे ओल खोबर
चविपुरते मिठ
चिमुटभर साखर
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम शेवग्याचा पाला काढुन धुवुन चिरुन घ्यावा. मग तव्यावर थोडा भाजावा. आता तेलावर लसुण टाकुन मिरची, कांदा, हिंग, हळद घालावे वरुन शेवग्याचा भाजलेला पाला घालावा परतुन थोडा वेळ शिजवावा. भाजलेला असल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नसते. मग मिठ, साखर, खोबर घालून थोड परतवुन गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

*आमच्याइथे हा पाला भाजून घेण्याची पद्धत आहे. पण न भाजताही मी भाजी केली आहे. ती भाजलेल्या पानाएवढी टेस्टी नाही लागली. कदाचित ह्या भाजीतील जडपणा जाण्यासाठी पाला भाजुन घेत असतील.

*इतर पालेभाज्यांप्रमाणे ह्या भाजीतही डाळी घालता येतात.

*शेवग्याच्या फुलांचीही भाजी करतात.

*ही भाजी उष्ण असल्याने पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच खातात.

*बाळाच्या पाचविला ही भाजी सटवाईला नेवेद्य म्हणून पानावर दाखवुन ते नेवेद्य बाळाच्या आईने खाण्याची पद्धत आहे.

*बाळंतीणीसाठीही ही भाजी पोषक असते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं मी ते बाजारात ओले हरभरे लागलेल्या जुड्या मिळतात ना, त्या आणलेल्या. हरभरे सोलून खाल्ले आणि पाल्याची भाजी केली. भाजीसाठी वेगळा कोवळा पाला मिळतो का?

हरबरा भाजी छान आंबट चिंबट होते. माझी आई करायची, कोवळ्या पाल्याचीच करावी. तसा हरब-याचा वाळलेला पालाही चालतो. माझी आई करायची ते डाळीचे पीठ लावुन, सुकी बोरं टाकुन!

नैना, सुकी बोरं? आधीच ह्.भा. आंबट चिंबट, त्यात अजून आंबट चिंबट घालायचं?

रैना, नैना --- जुडवा बहिणींची नावं वाटतात ना?

हरभर्‍याच्या पानाची काहितरी भाटी की काहीतरी काढतात ना

आता या प्रकाराला भाटी म्हणतात की काय ते माहित नाही, पण थंडीच्या दिवसात (हरभरा तेव्हाच लावतात) रात्री हरभराच्या रोपांवर स्वच्छ कापड पसरुन ठेवतात, सकाळी दवांने ते कापड ओले होते आणि त्यात हरभ-याचे सत्वही उतरते. कापड पिळुन ते घेतात. काहीतरी औषधी उपयोग आहे याचा (जो अर्थातच मला माहित नाही Happy )

अश्वे, भाजीसाठीचा हरभरा कोवळा असावा लावतो, म्हणजे पाला, हरभर लागायच्या आधीची स्टेप. तेव्हाच फक्त भाजीसाठी वापरतात. त्याला हरभरे लागले म्हणजे पाला जुन झाला. तेव्हा मात्र भयाणच लागणार. हरभरा लावतात तेव्हाच आठवडा/दोन आठवडे त्याची भाजी उपलब्ध असते. ज्यांचे शेत आहे त्यांनाच हा लाभ, कारण बाजारात ही भाजी मिळत नाही. मी गेल्या थंडीत खाल्लीय. आता ह्या थंडीत नाशिकवरुन भाजी आली की तुला फोनते. Happy

हाच कोवळा पाला वाळवतात, त्याचीही भाजी करतात. माझ्या बाईच्या वडीलांनी खास माझ्यासाठी पाठवलेली आणि बाईने ती मला करुनही घातलेली.. Happy

चालेल साधना Happy

हरभर्‍याच्या भाटीला 'खाटी आम' म्हणतात का गं? आम्ही गिरगावात रहायचो तेव्हा दारावर 'खाटी आम' आणि 'ओव्याच्या अर्का'च्या बाटल्या विकायला यायच्या. 'खाटी आम' तांब्या परेडवर जालीम औषध आहे. वाटीत अर्धा चमचा घ्यायची व चमचाभर पाणी मिसळून दातांना शक्यतो न लावता गिळून टाकायची. एक बाटली आपला अर्धा जन्म पुरेल एवढी जालीम असायची. हल्ली ही औषधं विकायला येतच नाहीत.

बाकीच्या आयुर्वेदाच्या औषधांना सोन्याचा भाव असतो.

हो तेच असणार बहुतेक. कारण हे औषध जालिम आंबट असते, दिसायला पिवळॅजर्द. दातांना स्पर्श झाला तर दोन दिवस काहीच खाता येणार नाही.

साधना मला ही सगळी प्रोसिजर माझ्या वडीलांनी सांगितली होती. पण आम्ही केल नव्हत.
अश्विनी बहुतेक तिला खाटीच म्हणतात. ती मादक पदार्थ म्हणून पण वापरतात ना ?

साधना मला ही प्रोसिजर माझ्या वडीलांनी सांगितली होती त्यामुळे माझ्या लक्षात आहे. पण आम्ही तेंव्हा केली नव्हती.
अश्विनी तिला खाटीच म्हणत असतील. ही मादक असते का ?

ती मादक पदार्थ म्हणून पण वापरतात ना ?

दोन दिवस फ्रिजबाहेर ठेवल्यावर जहाल मादक पदार्थ तयार होईल तिचा.. मग वापरायची मादक पेय म्हणुन.. Wink

अग अश्विनी आम्ही जेंव्हा हरभरा लावला होता ना तेंव्हा मी त्या पानांची चव घेतली होती. खुप आंबट लागली. आणि हे जे दवात भिजवून पिळून काढतात त्यामुळे कदाचीत त्यामध्ये मादकता उतरत असेल. तरी मला ह्या बद्दल नक्की माहीत नाही. जाणकारच सांगु शकतील.

अगं पण प्रत्येक आंबट गोष्ट मादक असलीच पाहिजे असं कुठाय?

आम्ही लहान असताना आमच्याकडे फ्रीजच नव्हता. वाडीत पण सगळ्यांकडे वर्षानुवर्षं ती बाटली असायची पण कधीच खराब व्हायची नाही ती. मोठा शिसा असायचा.

शेवग्याच्या बीबी वर हरभरा कुठून आला ? त्याला खाटी म्हणतात. ती वर्षानूवर्षे खराब होत नाही.
खेड्यात ती मडक्यात साठवून ठेवलेली असते. पोटांच्या विकारावर (उलटी, अजीर्ण) यावर
उपयोगी आहे ती.
साधनाने लिहिलेली प्रोसेस बरोबर आहे.
साधना, मुंबईत हि भाजी मिळते (कुर्ल्याला तरी मिळते.) रोपे लहान असतानाच पाला खुडतात,
तसे केल्याने जास्त फ़ूटवा येतो, व हरभरे जास्त लागतात.

भाटी म्हणजे मांजर !!!

शेवग्याच्या बीबी वर हरभरा कुठून आला ? >>>> दिनेशदा.... मोरुची मावशी... टांग टिंग टिंगा...

"अंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा" तसं "शेवग्याच्या बाफाला हरभर्‍याच्या शेंगा".

अश्वे Lol

जागू, नवीन मजकुर आत्ता वाचलेत.

तमिळ लोक शेवगाचा पाला कढईत तेलात अरतपरत करतात. त्यात ओले खोबरे, नंतर गुळ घालतात. हा पाला निवडणे फार वेळखाऊ काम आहे. फडक्यात जर बांधून ठेवला तर दुसर्‍या दिवशी तो हवा तेवढा ताजा राहत नाही. कोवळा ताजा पाला काहीतरी वेगळाच असतो चवीवा.

कोळवी पाने जर खळखळ उकळी आलेल्या वरणात घातली तरी ती पाने लगेच शिजतात. कच्ची राहत नाही. वरणाला वासही छान येतो.

मागे सईने शेवग्याच्या शेंगांच्या गराचे पिठले कसे करायचे ते लिहिले होते. आधी शेंगा उकळून घ्यायच्यात मग त्या होत आलेल्या पातळसर पिठल्यात घालायच्या. गर काढूनही घालतात येतात.

तमिळ लोकांमधे कढीतही शेवग्याच्या शेंगा घालतात. त्यांच्या कढीत चण्याची डाळ भिजवून ती वाटून मग ती ताकात घालतात आपण मात्र बेसन घालतो.

शेवग्याच्या पाल्यात लोक असते हे मला माहिती नव्हते. बरे झाले सांगितले. आता आठवड्यातून एकदातरी करत जाईल. इथे हवा तेवढा हा पाला, अंबाडी मिळते. तेही बारोमास!!!!!

साधने, माझी बहिण हरबर्‍याच्या पानांची भाजी करते. एक नियम की हा पाला न धुता तो लसणीच्या फोडणीत परतावा लागतो. पाला धुतला की मग चव राहत नाही. अजून एक विशेष की या पानांना अंगचेचं मिठ असते. त्यामुळे फार मिठ घालायची गरज नाही. हा पाला किंचित आंबटही असतो. हा पाला हरबर्‍याला गाठे येण्यापुर्वीच तो घ्यावा लागतो. काही जण तर हरबर्‍याची बिनागाठीचे झुडुप उपटून ते घरी आणतात. माझी ताई मला वाळलेला पाला नेहमी सोबत देते पण ओल्याची सर सुक्याला मुळीचं नाही.

असो.. मला तुम्हा सर्वांचं खूप नवलं वाटलं हा बाफ वाचून..

आहारशास्त्र आणि पाककृती मधेच मला शेवट शेवटच्या (शेवटून ४-५ व्या वगैरे) पानावर हरबर्‍याच्या पानांची भाजी अशी पाकृ सापडलेली..मी लिंक इथे टाकणार होते, पण त्यानंतर (लगेच )अर्धा तास नेटच गंडलं.. Sad
आता शोधायचा कंटाळा आलाय..

परदेसाई,
अहो आमच्याकडे दरवर्षी शेकडो एकर नविन पानमळे लावले जातात,त्यासाठी शेवगा लावला जातोच ,
त्यात शेवगा हा मुख्य आधार असतो .
काही का असेना ...
पण शेवग्याच्या शेंगाची भाजी पुरुषानी जरुर ,वारंवार खावी !!
Wink

शेवग्याचे लॅटिन नाव, मोरिंगा ओलेफ़ेरा. यातला मोरिंगा हा शब्द तामिळ भाषेतून आलाय.
नूसते लोह नाही, तर क जीवनसत्व, ब जीवनसत्व, आणि पोटॅशियमसाठी पण हि भाजी
खावी. कुपोषित मूलांना हि भाजी मुद्दाम द्यावी. पण या सर्वाचा फ़ायदा होण्यासाठी, पाने
बीने लिहिल्याप्रमाणे डाळीत, कढीत वा सूपमधे घालून खाणे चांगले.
याच्या बियापासून खाद्यतेल ही काढतात. त्यानंतर जी पेंड उरते, ती खत म्हणून, आणि
पाणी शुद्ध करण्यासाठी पण वापरतात.
जागूने लिहिलेय तश्या गोड शेंगाही असतात आणि काहि झाडाच्या शेंगा कडूही लागतात.
या शेंगांचे लोणचे पण घालतात.
अनिल, कोकणात पानमळ्यांसाठी, पांगारा लावलेला बघितला. नगरला मी शेतात अगदी बुटकी
झाडे बघितली. शेंगा हाताने खुडता येतील अशी. शेंगाचे, शेंगूळ, हा आमच्या घरातला
आवडता पदार्थ. (रसभाजी असते, त्यात कांद्यावर शेंगा परतून, त्यात कोकम व गूळ
घालतात. लाल तिखट घालून, दाटपणासाठी, तांदळाचे पिठ लावतात.).

जागु, रैना, बी, दिनेशदा,

तुमच्यापैकि कुणितरि प्लिज शेवग्याच्या शेंगाच्या पिठल्याचि (आणि भगरा?) चि कृति लिहा ना योग्य जागि.

अनिल, पुरुषांनी ही भाजी का खावी याचे कारण कळेल का? जर सांगण्यासारखे असेल तरचं सांग.

साधना, कधीकधी तुला किती माहिती असतं भाज्यांमधलं तर एकदम आकाशाऐवढं अज्ञान. हीचं गत इतर मुलींची!

अरे बाबा आम्ही इतरांसारखे सर्वज्ञ नाहीत. आणि प्लिज 'हीच गत...' करत जनरलाईज करु नकोस.. इथल्या ब-याच बायाही सर्वज्ञ आहेत. शिवाय i am unique, you know Proud

शिवाय मला गजनीतल्या आमिरसारखा फक्त १५ मिनिटे मेमरी टिकण्याचा रोग आहे... १५ मिनिटांपुर्वी काय केले ते कधी आठवत नाही तर कधी कधी एकदम काय आठवेल ते सांगता येणार नाही... Happy

साधना तुझ्या गजनीचा मी अनुभव घेतलाय ग. अजुन आठवुन हसते मी कधी कधी.

दिनेशदा शेंगा घोळीच्या, कोलंबीच्या कालवणातही छान लागतात.
शेंगांची मी भजीही करते.

मी खाल्ल्यात कोलंबीच्या कालवणात. पण मला कोलंबीच्या कालवणात इतर कोणीही येऊन अडचण केलेली चालत नाही... Happy

जागु, दिनेशनी लोणच्याची आणि आमटीची कृती टाकलीय. तु भज्यांची टाक आता.

गजनी :)..

Pages