शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं तुम्ही हा अर्थ आधीसुद्धा विचारला होता.
यातल्या "बळियाचा अंगसंग" याचा अर्थ "सर्वशक्तिमान अशा ईश्वराचा संग झाल्याने" असा घ्यावा.

"इंद्रजिमी जंभ पर...." या कविराज भूषण यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या कवितेत एक वाक्य असे आहे: " भूषण वितुण्ड पर जैसे मृगराज है ... "

या वाक्याचा नक्की अर्थ सांगा ना कोणीतरी....

संतिनो, खाली पुर्ण अर्थ देत आहे
जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चित्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

अरे चिन्या,

तू मध्ये शिवाजी राजांबद्दल मोठया लोकांनी केलेल्या वक्तव्यांचा एक लेख लिहिला होता....तिथे मी तू वर दिलेला अर्थ already वाचला आहे..... पण त्यात " भूषण वितुण्ड पर जैसे मृगराज है " ह्या वाक्याचा अर्थ नाहिये असं वाटतं...

ते कडवं असं काहीतरी आहे ....

दावाद्रुम दंड पर
चीता मृगझुंड पर
भूषण वितुण्ड पर
जैसे मृगराज है

तू दिलेल्या अर्थामध्ये "वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चित्ता" हा पहिल्या दोन वाक्यांचा अर्थ कळला.... पण पुढचं सिंहाला (मृगराज, I think) उद्देशुन काय लिहिलंय ते नाही कळलं.... म्हणून विचारलं...

माझ्या माहितीनुसार तुण्ड म्हणजे मुख / कंठ,
सिंह आपल्या शिकारीच्या कंठाचा घोट घेतो त्यामुळे त्या शिकारीला (शिकार झालेल्या प्राण्याला) वितुण्ड म्हटले असल्याची शक्यता आहे. अर्थात रचनेवरून तरी तसेच वाटतेय.

मायबोलीवर कुठेतरी बीप्रश्न अस काहीतरी वाचल.. बीप्रश्नचा अर्थ काय आहे ?

वरील कवितेबद्दल एक शंका... कवी बहुधा आपले नाव कवितेत गुंफतो. तसे तर हे नसेल ना? भूषण वितुण्ड पर म्हणजे कवी भूषण कुठल्यातरी वितुण्ड नावाच्या कवी ला जसे भारी पडतो असा अर्थ असू शकेल का!! कारण बाकी सर्व उपमा १ वाक्यात संपतात अन त्याचा पुढच्या ओळीत संबन्ध दिसला नाही. जसे चिता हरिणावर, राम रावणावर, भूषण वितुंडावर तसे शिवराय म्लेंच्छांवर - असे तर नाही?

मैत्रेयी,

"भूषण वितुण्ड पर " याच्यापुढे "जैसे मृगराज है" असं सुद्धा आहे.... तू म्हणतेस तसा अर्थ लावला तर मृगराजचा संबंध लागत नाही.... त्यामुळे क्ष ने सांगितलेला अर्थ बरोबर/जवळचा वाटतो...

जैसे म्रुगराज है... च्या पुढची कविता टाक पाहू मग Happy

पूर्ण कविताच टाकतो....

इंद्र जिमि जंभ पर
बाडव सअंभ पर
रावण सदंभ पर
रघुकुलराज है |

पवन बारिबाह पर
संभु रतिनाह पर
जो सहसबाह पर
राम द्विजराज है |

दावा द्रुमदंड पर
चीता मृगझुंड पर
भूषण वितुण्ड पर
जैसे मृगराज है |

तेज तमअंस पर
कान्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ वंस पर
शेर शिवराज है |

मला वाटत त्याचा अर्थ असा आहे.
पावसाळ्यात ज्या प्रमाने मोर आंनदाने नाचतो ज्याला सीमा नसते. त्याच प्रमाने भूषण आनंदी होऊन हे गुणगाण करीत आहे. ईथे कवीने स्वत:ची तुलना मोरासोबत केली आहे असे वाटते.

प्रत्येक कडव्यामधल्या शेवटच्या दोन ओळी संबंधित आहेत तेंव्हा कक्षने सांगितलेला अर्थ बरोबर वाटतो.

संतिनो,
वितुंड शब्दाचा अर्थ सोंड असाही होतो. आणि या दुव्यानुसार हिंदीत 'हत्ती' असाही अर्थ घेतला जातो. त्यानुसार 'जसा सिंह (= मृगराज) हत्तीवर/ऐरावतावर चालून जातो, तसा ...' असाही अर्थ लागू शकेल.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

फ चे म्हणने बरोबर वाटतेय्.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

मलाही फ चे म्हणणे बरोबर वाटते... आणि वर त्याने पुरावा देखील दिला आहे... Happy

मला अजून एका शब्दाचा अर्थ हवाय...

'नेमस्त' या शब्दाचा नक्की काय अर्थ आहे?

मला देखिल फ म्हणतोय ते बरोबर वाटातेय..
कवी ने जर आपले नाव टाकले तर बरेचदा शेवटच्या ओळीत किंवा कडव्यात असते ना..

नेमस्त म्हणजे नियमितपणे.. मला वाटतं मनाच्या श्लोकात वाचल्यासारखं वाटतय.. हरिनाम नेमस्त पाषाण तारी !

निर्मम या शब्दाचा अर्थ काय कुणी सांगेल का?

निर्मम म्हणजे ममत्व, म्हणजे ममता नसलेला.

"अनय" म्हणजे काय?
प्रणती

श्रीमानयोगीत मुरारबाजी धारातिर्थी पडले तेव्हा श्त्रुने 'सुलतानढवा' केला असं लिहिलय. तर 'सुलतानढवा' म्हणजे काय?

..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

नय म्हणजे नीति. अनय म्हणजे नीति नसलेला.

सुलतानढावा म्हणजे असेल तेवढे सैन्य आणि सामुग्रि घेउन केलेलि शेवटचि निकराचि लढाई.

थँक्यु म.मो. ! Happy
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

रश्मी थोडी दुरुस्ती. सुलतानढवा म्हणजे निवड्क सैन्याने प्राणाची पर्वा न करता केलेला निकराचा हल्ला. सुलतानढव्यात सर्व सैन्य यायलाच पाहीजे असे नाही. सहसा किल्ला जर काबुत करता येत नसेल तर सुलतानढवा करायचे. (म्हण्जे ते निवडक सैन्य शिड्या वैगरे लावनार वा ऐखादा बुरुज उडवून लावनार, मग उरलेले ताजे सैन्य पाठीमागुन घुसनार).

गव्हाळ हा रंग गहू पासून आला. काल एका पुस्तकात मुगाळ शब्द वाचला. मुगाळ रंगाचे वासरू. असा उल्लेख होता. मग जरा गम्मत वाटली की सगळ्याच कडधान्याचे रंग करता येतील. जसे की राजमाळ, उडीदाळ, तुराळ ::)

सर्जकता असा शब्द आहे की नाही माहिती नाही.. पण सृजनशीलता ह्या शब्दाचा सर्जनशीलता (आणि त्याचाच पुढे सर्जकता) असा अपभ्रंश बरेचदा केला जातो..
--------------
The old man was dreaming of lions

श्रेयस आणि प्रेयस असे परस्परविरोधी शब्द वापरले जातात. त्यांचा नेमका अर्थ काय?
बापू करन्दिकर

आपण श्रेयस हा शब्द साधारण "श्रेयस्कर, सद्य परिस्थितीत व व्यावहारिक दृष्ट्या अनुकूल असलेले" अशा अर्थाने वापरतो. पण श्रेयस याचा खरा अर्थ म्हणजे "पारमार्थिक दृष्ट्या योग्य असलेले, त्या दिशेने नेणारे" असा आहे.
या उलट, प्रेयस हा शब्द "भौतिक सुख देणारे" अशा अर्थाने वापरला जाऊ शकतो.
कठोपनिषदात या दोन्ही शब्दांचा उल्लेख आहे. जेव्हा नचिकेताला यमराजाने ब्रह्मज्ञानाच्या बदल्यात भौतिक सौख्य देऊ केले, तेव्हा नचिकेताने मोठ्या आदरपूर्वक त्यांना या दोन्हींचा उल्लेख करुन सूज्ञ मनुष्याने नेहमी "श्रेयस" गोष्ट स्विकारावी असे सांगितले.

Pages