पीनट्बटर-ओटमील कुकीज

Submitted by मृण्मयी on 7 July, 2010 - 20:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३/४ कप मैदा ( सेल्फरायजिंग )
१/२ टीस्पून बेकिंग सोडा (सेल्फरायजिंग मैदा वापरल्यास आवश्यकता नाही.)
१/४ टीस्पून बेकिंग पावडर (सेल्फरायजिंग मैदा वापरल्यास आवश्यकता नाही.)
१/२ टीस्पून मीठ (मूठभर खारवलेले बदामतुकडे घातल्यास मीठ नको.)
१/२ कप बटर किंवा मार्गारीन (खोलीच्या तापमानाला आणून, मऊ करून)
१/२ कप पीनट बटर. (क्रंची नको)
१/२ कप साखर
१/२ कप ब्राउन शुगर
१ अंडं
१ टीस्पून व्हॅनिला अर्क
१ कप क्विक कुकिंग ओट्स

क्रमवार पाककृती: 

* एका मोठ्या भांड्यात साखर सोडून सगळे कोरडे घटक एकत्र करावे.
*वेगळ्या भांड्यात बटर, पीनट्बटर, अर्क, अंडं आणि साखर व्यवस्थीत एकत्र करावं. फार फेसत बसावं लागंत नाही.
* कोरडे घटक या मिश्रणात घालून नीट ढवळून एकत्र करावे.
* तेलाच्या हाताने झकास लाडू वळून हलका दाब देऊन कुक्या कराव्या.
*३५० डिग्री फॅ. ला ओव्हनमधे १० मिनिटं बेक कराव्या.

peanutbutter-cookies-maayboli.JPG

वाढणी/प्रमाण: 
साधारण २० कुक्या होतात.
अधिक टिपा: 

*चॉकलेट चिप्स घालता येतात.
* चमचाभर ओटमील कमी करून त्याऐवजी बदामाचा ओबडधोबड चुरा घालून चांगली चव येते.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो बघून तोंडाला पाणी सुटतयं.
माझ्याकडे 'ब्राउन शुगर' नाही. Sad
(दुकानात विचारलं तर त्यांनी दाऊद कडे चौकशी करण्याचा सल्ला दिला. :अरेरे:)
नाहीतर मी पण पीनट्बटर-ओटमील कुकीज बनविला असता. Happy

मृण्मयी, वा! काय दिसताहेत! सध्या आम्ही रोज ओटमील कूकीज् च खातो, पण विकतच्या. एक सांग, पीनट बटर ला काही पर्याय? का साधं बटरच वाढवावे, चव बहुतेक थोडी वेगळी लागेल ना!

मृ, मी काल केल्या ह्या कुकीज. मस्त झाल्या Happy
मी पिठात कोको पावडरपण घातली. सगळं मिश्रण ढवळून झाल्यावर चॉकलेटचिप्स पण घातले.

IMG_0872(1).JPG

दोन्ही कूकीज छान दिसताहेत. मी नुसता कोको घालून केल्या होत्या. आता अश्या पण करीन
गंगाधर, demerara sugar विचारा, मुम्बईत मला D-Mart मधे मिळाली Blue Bird brand

राखी, कुकीज भारी दिस्ताहेत!

सुजाताच्या मल्टीग्रेन कणकेच्या, स्मार्ट बॅलन्स बटर सबस्टिट्यूट वापरून केलेल्या कुक्या झकास होतात. त्यामुळे आता सेल्फरायझिंग मैदा, बटर सगळं बंद झालं.