:प्रितीसंगम : कराड तालुका अखंड ऑनलाइन साहित्य संमेलन.

Submitted by ह.बा. on 1 July, 2010 - 01:21

प्रितीसंगमाने दिलेला प्रितीचा संदेश आणि यशवंतराव चव्हानांनी केलेला नितीचा उपदेश आपल्या क्रुष्णाकाठाइतक्याच रसरशीत साहित्यातुन मांडणार्‍या कराड तालुक्यातील साहित्यीक आणि रसिकांना एकमेकाचा परिचय व्हावा. आपल्या पांढरीची आपल्या माणसांनी लिहीलेली गाणी वाचायला मिळावीत यासाठी हे व्यासपिठ.
कथा, काव्य, कादंबरी, गझल, विडंबन, लेख, सुविचार, चारोळ्या, कराड विषयी माहिती, बातम्या इ. इथे मांडले जावे ही अपेक्षा.

हणमंत बाबुराव शिंदे
मु. पो. मालखेड
ता. कराड जि. सातारा
९९२३६९५१८६

गुलमोहर: 

सुरूवात म्हणून माझीच एक गझल देतो आहे.

तुकारामा उगा तू काढली पाण्यातुनी गाथा

तुकारामा उगा तू काढली पाण्यातुनी गाथा
सुखी जातीत होते ते, सुखी जातीत ते आता

तुझ्या जोडीस घे तिजला अता घनघाव घालूदे
जिच्या नाजूक हाताने जगाचा चालला भाता

बलात्कारी, खुनी की दंगली घडवून बनलेला
पुजेला कोणता नेता हवा रे पंढरीनाथा?

कधी ना वाटले मुकलो भुईला जन्म देणार्‍या
जिथे मी टेकला माथा तिथे ती भेटली माता

परीक्षा घेउनी तर भेटीला येतोस की देवा
करावी सावकारी तू म्हणावे मी तुला दाता?

- ह. बा. शिंदे

माझी ही एक वात्रटिका

शूर शिवाजी नाटक होते
वीर रसाने भरले होते
नाटक अन ते खुप र॑गले
रसिक सारे धन्य जाहले .........

उत्साही वीर पुढे धावला
पडदा सारुन आतही गेला
प्रस॑ग आतील बाका होता
अफजलखाना सवे शिवाजी चहा पीत होता........

छान वात्र टीका आहे.
सर्वांसाठी : क्रुपया आपले नाव व गाव नोंदवावे.

अहो या सगळ्यासाठी इथे गुलमोहर आणि कराड बीबी आहे....
हे उगा वेगळे संस्थान कशाला काढताय?

मला ते कराड बीबी सापडले नाही म्हणून हे सुरू केले. आपण त्याचाच वापर करावा. मी आपल्या भावना समजू शकतो. पण हे संस्थान नाही. संस्थानिकांना काळजी नसावी. कराडमधील कवी/साहित्यीक मित्र भेटतील या उद्देशाने एक प्रयत्न केला आहे. बाकी संस्थान वगैरे शब्द वापरून आपण त्रास करून घेउ नये ही विनंती. आपण कराडचे असलातच तर नाव गाव नोंदवा प्रतिसादात.

उद्देश चांगला आहे Wink
तुमचे चालू द्या....
पण शिवसेना-मनसे मुळे जशी मराठी मतांची विभागणी झाली तशी होउ नये एव्हढीच इच्छा !
शुभेच्छा!