अतुल्य! भारत भाग - ७ : आग्रा

Submitted by मार्को पोलो on 1 July, 2010 - 04:37

चिरंतन प्रेमाचे प्रतिक ताज महल,
सौंदर्याचे प्रतिक ताज महल,
मानवनिर्मित सर्वश्रेष्ठ कलाकृती ताज महल,
जगातील सात आश्चर्यापैकी एक ताज महल,
प्रेमात पडल्यावर असे काहीबाही विचार मनात येतात. काही वर्षांपुर्वी जेव्हा मी हिच्या प्रेमात पडलो होतो (डोक्यावर, असे लोक सांगतात. मला नीटसे आठवत नाही) तेव्हा मलाही असे काहिसे वाटायचे. त्यामुळे राजस्थानच्या ट्रिप वरुन परत येता येता ताज महल पहायचे ठरविले.
ताज महल यमुनेच्या तिरावर स्थित आहे. ताज महाल मोगल सम्राट शहाजहांन ने त्याच्या आवडत्या राणी मुमताझ महल ची आठवण म्हणून बांधला. (मी का ही बडबड करतो आहे. सर्वांना माहित आहे हे) ह्याचे बांधकाम १६३२ ला सुरू झाले आणी १६५३ ला पुर्ण झाले. हा पुर्णपणे संगमरवरात बनला असुन ह्यासाठी लागणारा दगड राजस्थानातुन आणण्यात आला होता.
टिप १ : शुक्रवारी ताज महल बंद असतो. दिल्लीतील कार वाले ही माहीती तुम्हाला सांगत नाहीत कारण त्यांचे भाडे बुडते.
टिप २ : ताज महल बघुन बाहेर आल्यावर खुप जणांना ताज महल ची प्रतिकृती घेण्याचा मोह अनावर होतो. ईथे जर का तुम्ही दुकानात शिरुन भाव करायला सुरुवात केलीत आणी जर का तुम्ही मागत असलेला भाव दुकानदाराला पटला नाही तर त्याच दुकानदाराचा एखादा लहान मुलगा तुम्हाला मागुन येऊन धक्का मारतो आणी ती प्रतिकृती तुमच्या हातुन खाली पडुन फुटते आणी झक मारत त्याची दुकानदार मागेल ती किंमत तुम्हाला द्यावी लागते. त्यामुळे"खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा बारा आना" अशी तुमची गत होते. तेव्हा सावधान.

प्रवेशद्वार

-
-
-
ताज महल

-
-
-
एक प्रयत्न

-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-

संगमरवराची जाळी

-
-
-


-
-
-

ताज महल ची मागील बाजू

-
-
-


-
-
-
मिनाराचा क्लोज अप

-
-
-


-
-
-

-
-
-


-
-
-

ताज महलचे प्रवेशद्वार, आतल्या बाजूने...

-
-
-

यमुना


-
-
-

आग्र्याचा किल्ला:
हा किल्ला "लाल किल्ला" म्हणून पण ओळखला जातो. हा भुईकोट किल्ला आहे. हा ताज महल पासुन २.५ किमी लांब आहे. हा किल्ला ९४ एकरांवर बनलेला असुन तटबंदिची ऊंची ७० फूट आहे. हा किल्ला लाल दगडापासुन (Red Sandstone) बनलेला आहे. ही एके काळी हिंदुस्तानाची राजधानी होती. हुमायुन, अकबर, जहांगीर, शाह जहांन आणी औरंगजेबाने येथे राहुन हिंदुस्तानावर राज्य केले.

प्रवेशद्वार

-
-
-


-
-
-


-
-
-

प्रवेशद्वाराचा पॅनोरमा

-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-
किल्ल्यावरून दिसणारा यमुनेच्या तिरावरील ताज महल

-
-
-
सिकंदरा:
सिकंदरा येथे अकबराचे थडगे आहे. सिकंदरा आग्र्यापासुन ६ किमी वर आहे. ह्याचे बांधकाम अकबराने ईसवीसन १६०० मध्ये सुरु केले आणी अकबराचा मुलगा जहांगीर ह्याने ते १६१३ मध्ये पुर्ण केले.


-
-
-


-
-
-


-
-
-

ईस्माइल प्लिज... Happy

-
-
-
-------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः

आगामी आकर्षण - राजस्थान (उदयपुर, चित्तोडगढ़)
टिप : राजस्थान हा भाग बराच मोठा असल्यामुळे २-३ भागांत विभागुन प्रदर्शित करणार आहे.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

चंदन माझ्याकडे शब्द नाहीत तुमचं कौतुक करायला.
बादशहा ने जर तुम्ही काढलेले हे फोटो पाहिले तर तो नक्कीच म्हणला असता
की मूळ ताजमहाल हा या फोटोंमध्ये जास्त सुरेख दिसतोय... अप्रतिम.....:)

फोटोची विशेषतः ही वाटली की ताजमहल आणि परिसर किती भव्य आहे हे कळते.

एक कथा आहे की शहाजहानने सर्व कारागिरांचे ताजमहर पुर्ण होताचे कापले होते म्हणे .. खरे आहे का हे? आणि दुसरे असे की यमुनेच्या दुसर्‍या तीरावर काळ्या दगडांचा ताजमहाल उभारल्या जाणार होता पण त्याचा फक्त पायाच तयार होऊ शकला...

चंदन छान!

व्वॉव! ताजमहालचे फोटो मस्तच! लाल किल्याच्या एका महालात असलेल्या आरशांच्या नक्षीमधे 'ताजमहाल'चे प्रतिबिंब दिसते. तिथे म्हणे औरंगजेबाने 'शहाजहान'ला नजरकैदेत ठेवले होते.

अरेच्चा! पण आग्र्याचा 'पेठा' कुठेय? लाल किल्ल्याच्या बाहेरच असलेल्या मार्केटमधे पेठांची दुकाने सजलेली असतात.

आग्र्याला गेलं की 'दयाल बाग' ला आवर्जुन भेट द्यावी. संगमरवरावरची कलाकुसर अप्रतिम आहे.
ही बघा त्याची लिंकः
http://www.ianandwendy.com/OtherTrips/India/Agra/Dayal%20Bagh/slideshow.htm

चंदनराव, ताजमहाल एकदम खुलवलाय Happy तेवढं 'आग्राका पेठा' चे पण फोटो टाका की, केवढे विविध चवीचे पेठे असतात.

हा घ्या पेठा Happy

Petha%20Agra.jpg

या ताजमहलाचे आणखीण एक वैशिष्ट्य म्हणजे महलाच्या मुख्य दरवाजावर (अथवा लागून असलेली) जी काही उर्दूतील कलाकुसर (उर्दूतील काही लिखाण) आहे ती खालपासून वर पर्यंत एकाच साइजची दिसते. कारण नक्षीकाम करताना कलाकारांनी (त्यांना कामगार का म्हणायचे?) या कलाकुसरीच्या अक्षरांचा आकार खाली सगळ्यात कमी व मग वरपर्यंत वाढवत सर्वात वर सर्वात मोठा आकार ठेवलाय. पण पाहताना मात्र हे या अक्षरांच्या आकारातील फरक अजिबात कळत नाही.

आणखीन एक मुख्य घुमटाच्या बाजूचे चार खांब (मिनार) हे अंशतः बाहेर झुकले आहेत, यामुळे या घुमटाला आधार मिळतो व भूकंपात पण वास्तू टिकून राहू शकते.

great! awesome!!! marvelous photography...नेहमीसारखंच!!

बादशहा ने जर तुम्ही काढलेले हे फोटो पाहिले तर तो नक्कीच म्हणला असता
की मूळ ताजमहाल हा या फोटोंमध्ये जास्त सुरेख दिसतोय... अप्रतिम.....>>>>>>>१०१% अनुमोदन......
जिप्सी --- प्रसंगानुरुप गाण्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद ! फार भावपुर्ण गायलेले हे गाणं आहे.

Pages