स्मोकी माऊंटन्स.. टेनेन्सी (अमेरिका) भाग २/२

Submitted by आवळा on 30 June, 2010 - 21:00

भाग १

राफ्टिंग संपवुन पुढचे डेस्टिनेशन होते गॅटलिनबर्ग.. एव्हाना पोटात कावळे कोकळायला लागले होते.. म्हणून
पिझा हट (जे व्हेज लोकांसाठी एकमेव ऑप्शन आहे सबवे पण आहे तसे पण पोट भरल्यासारखे नाही वाटत)
मस्त ब्रेड्स्टिक्स आणी व्हेज पिझा वर ताव दिला..

मस्त झोप येत होती .. पण फिरायचे आहे ह्या विचारांती पुढचा प्रवास सुरु केला.. अतिशय मनमोहक असा ड्राईव्ह आहे (व्हाईट वॉटर राफ्टींग ते गॅटलिनबर्ग)
हा एक फोटो त्या वाटेवरचा

गॅटलिनबर्ग ह्या शहरात एन्ट्री

शहरात प्रवेश झाल्यावर.. एका तथाकथित गोष्टिचा ऊलगडा झाला... की का फक्त मॅरीड किंवा ***** लोकांनी जावे..
well... बाहेर एकदम मस्त गुलाबी थंडी पडलेली .. आणी ह्या रोमँटीक वातावरणात कपल्स मस्त पैकी हातात हात घालुन फिरत होते..

अर्थात ते बघुन सर्व ब्रम्हचारी मंडळीचा--- नाही म्हणटले तरी बराच जळफळाट झालाच Happy
आणी एकेमेकांचे तोंडे बघुन समजुन गेलो की आता ह्याचा विचार करुन काही फायदा नाही Rofl

आमची जाळण्यात मदत केलेला हाच तो रोपवे Happy

तिकडे पोहचल्या बरोबर प्रथम ह्य रोपवे चे दर्शन होते.. पण एन्ट्री कुठुण आहे हे सापडत नव्हते
तेच शोधत शोधत अगदी ५ - १० मिनीटातच त्या रोपवे च्या प्रवेश मार्गावर पोहचलो.. आणी अनलिमीटेड अप आणी डाऊन करता येईल हे टीकीट काढ्ले

त्या रोपवे वर बसुन काढलेले हे फोटोस..

जसजसे आपण डोंगरावरती जात जाऊ तसतसे शहर आणी त्याच्या आजुबाजुला वेढलेली डोंगरे आणी त्यावर निसर्गाने पसरलेले रंगीत नाट्य दिसु लागते

ह्या डोंगरावरती जे ढग दिसतात ते एका चिमनीतुन निघालेल्या धुरासारखे भासत असतात म्हनूनच ह्या जागेला स्मोकी मांऊन्टन्स असे नाव दिले आहे .. .

ह्या रोपवे वरुन खाली ऊतरलो आणी पुढे मार्केट मधे चालु लागलो.. तिकडे "haunted mansion" नावाचा एक शो आहे.. त्या शो साठी प्रचंड मोठी रांग होती.. असे शो फ्लोरीडा/ कॅलिफोर्निया ईकडे पण आहेत.. पण स्मोकी ला
येऊन लोक तो शो बघायला का जात होते हेच कळाले नाही .. Sad

अगदी थोड्या वेळाने ह्याचे रहस्य ऊलगडले की टेनेसी स्टेट मधले लोक भुत ह्या गोष्टीवर फार विश्वास ठेवतात म्हणून ही अफाट गर्दी तो शो बघायला Uhoh

तसेच पुढे चालत गेलो.. आणी ओबेर स्काय रिसोर्ट हे अतिश्य सुंदर असे ठिकाण आहे..
तिकडुन आख्या स्मोकी माऊंन्टसची सैर झाली .. ती पण ह्या aerial ट्राम मधुन ..

खाली काही फोटो घेतले आहेत.. त्या ट्रिप मधुन

अतिशय मनमोहक असे निसर्ग सौंदर्य आहे ह्या ट्राम वे वरती.. शेवटी ट्राम ने स्काय रिसॉर्ट ला एन्ट्री केली..

त्या स्काय रेसॉर्ट येथे बर्फा वर स्केटींग करता येते.. ते द्रुष्य पाहत असतानाच .. हा एकदम झ्याक फोटो काढला..
हे महाराज नवीनच स्केटींग करत होते बहुतेक.. आणी स्टाईल मारताना मस्त साष्टांग नमस्कात घातला

तिकडे अल्पाईन स्लाईड आणी सिनिक रोपवे नावाच्या २ अप्रतिम राईड्स आहेत .. पण हवामान खराब असल्यामुळे त्या बंद होत्या .. शेवटी फोटो काढुनच समाधान मानले..

परत त्याच ट्राम ने डोंगर ऊतरुन गावामधे यावे लागते .. तो ट्राम वे साधारण ५ माईल्स ईतका आहे.. आणी ती ट्राम २० MPH ने त्या रोपवे वरती धावते.. अर्थात हे सगळे ते स्पीकर मधुन बोलत असतात म्हणून ऐकण्यात आले..

ट्राम नी गॅटलीनबर्ग ला परत आणून सोडले..

ईकडे रात्री मस्त झगमगाट होता आणी तीच गुलाबी थंडी :)..
आम्ही भयंकर थकलेले आणी भुकेले होतो.. तसेच .. सबवे मधे गेलो आणी प्रत्येकी १ असे ४ व्हेजी फुटलाँग खाल्ले..
आणी हॉटेल गाठून सगळे कधी आणी कसे झोपले हे कळालेच नाही...

दुसर्या दिवशीची सकाळ सुरु झाली ८ वा. .. ठरले होते सगळे ६ ला ऊठणार म्हणून पण थकव्यामुळे मस्त ८ पर्यंत सगळे पसरुन होते... कसे बसे हॉटेल मधुन निघायला ९:१५ झाले ..
आणी आता डेस्टीनेशन होते.. गॅटलीनबर्ग ते चेरोकी हा सिनीक वे आणी ऑन द वे असलेले काही अ‍ॅट्रॅक्शन्स..

रस्त्याला लागुनच ही नदी वाहत होती.. अगदी काही क्षणांसाठी आपण भारतातच आलो आहोत असे वाटले..
गाडी पार्क करुन ह्या नदी मधे मस्त फोटो सेशन केले..

तसेच फोटो सेशन संपले की पुढे निघालो.. तिकडे हे असे छायाचित्र दिसले आणी वाटले की हीने भारतातील काळी पिवळी जीप मधल्या लोकांकडुन प्रेरणा घेतलेली दिसते

ऑन द वे २ चेरोकी..

हा एक छोटासा धबधबा

लँड ऑफ ब्लु स्मोक .. ह्या ठिकाणाला आता world heritage site म्हणून घोषीत केले आहे. Sad

त्याच ठिकाणी हे काहीसे अपेक्षीत नसलेले द्रुष्य बघायला मिळाले..

अश्या प्रकारे बरेच सिनिक स्पॉट बघुन झाले ...
आता परतीच्या वाटेवर होतो आणी शेवटचा प्लॅन होता हॅलीकॉप्टर राईड..
सगळ्यांचा हॅलीकॉप्टर मधे बसण्याचा पहिलाच अनुभव होता... सगळे अगदी ऊत्साहात पिजन फोर्ज ला पोहचलो.. पण तिकडे गेल्या वर पोपट झाला .. आमच्या रिफर्बिश्ड जी.पी.एस. ने धोका दिला Sad

पार चुकीच्या रस्त्यावर नेऊन जिकडे हॅलीकॉप्टर सोडाच साध्या ४ व्हिलर पण नाहीत अशा ठीकाणी सोडले आणी स्पीकर मधुन आवाज काढला "आपण पोहचलो बरका" Uhoh
आता संध्याकाळचे ४ वाजलेले परतीचा ड्राईव्ह होता ११ तासांचा म्हणुन हॅलीकॉप्टर राईड मनातुन काढुन टाकली आणी परतीच्या रस्त्यावर निघालो..

आणी काय ते आश्चर्य.. अगदी ३ माईल्स गेलो असेल .. त्या हॅलीकॉप्टर कंपनीचे टीकीट बुकींग चे ऑफीस दिसले Happy

लगेच गाडी ने यु टर्न मारला ऑफिस मधे जाऊन राईड बुक केली.. धमाल अशी ही आयुष्यातिल सर्व प्रथम हॅलिकॉप्टर राईड घेतली ...

ऊडलो बुवा एकदाचे Happy

अशा प्रकारे .. स्मोकी ची वारी संपवली.. अर्थात परत यावेसे वाटतच नव्हते .. तिथल्या निसर्गाने एक अनामीक ओढ अशी लावुन ठेवली ...

पुढचा ११ तासांचा प्रवास मात्र कॉफी पीत पीत आणी ड्रायवर शी गप्पा मारत मारत केला(तो झोपु नये म्हणून .. नाहीतर सगळेच झोपले असते Happy )

अवांतर टीप :
शक्यतो लग्न झालेले असेल तरच स्मोकी ला जा .. नाहीतर ऊगीच मनाला त्रास होईल Wink
++++++++++++++++++ ++++++++++++++++++ ++++++++++++++++++

गुलमोहर: 

आई शप्पथ झाडांचे कलर्स काय आहेत. हे फोटोज् Autumn मधले आहेत काय?
photography साठी ideal season. माझे स्वप्न आहे, Autumn मध्ये युरोप किंवा North America मध्ये photography करायला जाणे.
माझे स्वप्न जगतोय गड्या तु... लगे रहो..

मस्त फोटोस .. मी जातोय या लाँग वीकेंडला Happy

मला राफ्टींग करायचय .. त्यामुळे अवांतर टीप कडे दुर्लक्ष करतोय Wink

>>मला ते रोड पाहून आपल्या देशाची किव येतेय...

अगदी आपल्या देशासारखेच रोड इकडे पण आहेत .. बघायचे असल्यास फोटो दाखवतो Happy

लै भारी भावा, अस ऐकलय कि तिकड शिमला-कुल्लु मनली पेक्षा जास्त थंडी असते Wink

@चंदन >>हे फोटोज् Autumn मधले आहेत काय? >> म्हणु शकता, उत्तर गोलार्धात Autumn मार्च मधे असतो तर दक्षिणेला सप्टेंबर -नोव्हेंबर .

सोम्कीला फॉल सीझन नोव्हेंबर २ किंवा ३र्‍या आठवड्यापसुन चालु होतो (बेकार थंडीच्या जस्ट आधी, तेंव्हाचे फोटो आहेत).

मला ते रोड पाहून आपल्या देशाची किव येतेय... >> अस म्हणु नका राव, भारतात पण चांगले रोड, निसर्ग आहे..फक्त आपण लोक मेंटेनन्स नीट ठेवत नाही...

आकाशातून देवाने फुलांचा वर्षाव केल्याप्रमाणे ती झाड़े दिसताहेत.... अप्रतिम कैमेराबद्धा केलि आहे अमेरिका...