रानभाजी १६) - टेरी (आळू)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 June, 2010 - 02:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टेरीचे फतफते

१ जुडी टेरी, म्हणजेच पावसाळ्यातील आळू
पाव वाटी शेंगदाणे (भिजवुन)
पाव वाटी चणाडाळ (भिजवुन)
सुक्या खोबर्‍याचे १०-१२ पातळ तुकडे (चिवड्यात घालतो तसे)
२ कांदे चिरुन
आल लसुण पेस्ट
फोडणी - राई, जिर, कढीपत्ता, हिंग
पाव चमचा हळद,
१ ते २ चमचे मसाला
अर्धा ते १ चमचा गरम मसाला
चिंचेचा कोळ
गुळ
चवीपुरते मिठ
थोडस ओल खोबर खरवडून

क्रमवार पाककृती: 

प्रथम टेरी म्हणजे आळूची पाने चिरुन चिरुन घ्यावी व थोडी शिजवुन मिक्सरमध्ये पेस्ट करावी. पानांच्या देठांची साल काढुन त्याचे अर्धा इंचिचे तुकडे करावेत. भांड्यात तेल टाकुन वरील फोडणी द्यावी. आता ह्यात कांदा घालावा. कांदा शिजवायची गरज नसते. जरा परतुन आल लसुण पेस्ट, टेरीच्या पानांची पेस्ट, भिजवलेले शेंगदाणे, चणाडाळ, खोबर्‍याचे तुकडे, टेरिंची देठे घालावीत. आता हे सगळ शिजू द्याव. शेंगदाणे शिजले का ते पाहायचे मग त्यात गुळ, चिंचेचा कोळ, मिठ, गरम मसाला घालायचा. थोड खोबर घालायच मग थोडा वेळ उकळवुन गॅस बंद करायचा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही रेसिपी आणि टेरी बर्‍याच जणांना माहीत असेल. टेरिंची पाने हिरवीगार व देठ पांढरी असतात. काही काही टेरी विकायला येतात त्यांची पाने काळपट (वडीच्या पानांच्या आळूची पाने एकदम काळी असतात त्यापेक्षा कमी काळी असतात) ह्या काळपट देठांच्या आळूला खाज येते. साफ करतानाही. ह्यात चिंच जास्त घालावी लागते. पाढर्‍या देठाच्या टेरीला खाज कमी असते. साफ करताना काही वाटत नाही.

फतफत्यामध्ये सुक्या खोबर्‍याचे काप तसच ओल्या खोबर्‍याचा किस नाही घालता तरी चालतो.
शेंगदाणे आणि चणाडाळ च्या ऐवजी वालाच बिरड, पाढरे वाटाणेही छान लागतात.
चिंच गुळाचे प्रमाण व्यवस्थित झाले म्हणजे छान लागते हे फतफते.
अजुनही मी नुसते खाते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो कोचिंदा म्हणजेच कुलु. पण मला वाटते चायनीज चाइव्ज वेगळ्या असतात.
हा मला अगस्ती उर्फ हादग्यांच्या फूलाचा फोटो मिळाला. हे फूल बोटभर लांबीचे असते. यातला मधला भाग काढून, उकडून पिळून भाजी करतात. फूल बरेच वजनदार असते. पण पूर्ण फूलत नाही, फक्त एकाच बाजूने फूलते. (याचे झाड पण छान दिसते. पाने विरळ असतात. हा फोटो मी धारावीतल्या निसर्ग उद्यानात काढला होता.)

hadaga.jpg

दिनेशदा धन्स. हे हादग्याचे फुल किंवा ह्याच्यासारख काहीतरी पाहील्यासारख वाटतय. तेही अगदी जवळून पाहील्याच फिल होतय. पण आठवत नाही. झाड चिंचेसारखच आहे.

ह्या हादग्यांच्या फूलाचि भजि सुद्धा करतात. फुलाच्या पाकळ्या भज्यांच्या पिठात् डिप करुन तळायच्या. मस्त कुरकुरित होतात आणि लागतात सुद्धा छान. आई तर याचा झुणका सुद्धा करते. पुण्याला आमच्या बागेत आहे हे झाड. हादग्याला अगस्ती म्हणतात हे माहिति नव्हते.

हादग्याच्या फुलांची भजी मस्त कुरकुरीत होतात आणि त्याची कांदा घालुन भाजीपण मस्त होते . पुण्यात नेहरुचौकात मिळतात ही फुलं.

जागु आता इ९तक्या भाज्यांच्या कृत्या[कृती च अनेकवचन] लिहिल्यास. भन्नाटच आहेस ग. आता आणखी काय उरलय?
टाकळा नाही लिहिलास अजुन. आणि भारंग ,तसंच कुड्याच्या शेंगांची भाजीपण लिही ग,.

अळूला टेरी म्हणतात हे माहित नव्हतं. taro root वरून हा शब्द आलाय की काय? अळकुड्यांची भाजी पण काय मस्त लागते. माझ्याकडे भाजीचं अळू लावलंय वर्षातून एखादवेळा त्याच्याच वड्या लावते मी. एरव्ही नुसती भाजीच. कच्चे शेंगणारे, मु़ळा वगैरे घालूनही चिंचगूळ घातलेलं फतफतं भारी आवडतं.

जादू, हेकायनीतेकाय कुड्याच्या शेंगांची भाजू सोडून इतर भाज्या टाकल्या आहेत. आत्ताच्या फोडशी/कुलूच्या रानभाजीत सगळ्या लिंक दिल्या आहेत. धन्यवाद.

मामी Happy

Pages