दिवाळी अंक २००८ - घोषणा

Submitted by संपादक on 16 September, 2008 - 17:55

'मायबोली मराठी - गेलं तप, येणारं तप'
हितगुज दिवाळी अंक २००८

सप्रेम नमस्कार सुजनहो,

यंदा आपल्या हितगुज दिवाळी अंकाचं नववं वर्षं. आपली 'मायबोली' यंदा बारा वर्षांची झाली.

ज्ञानोबांनी जिला वळण दिले... श्रेष्ठ संतपरंपरा, जाणते असे राजे, दूरदृष्टीचे समाजसुधारक, निर्भीड तत्त्वज्ञ, अभिजात साहित्यिक, क्रांतीकारक आणि उत्क्रांतीकारक अशा सर्वांनी जिला वळण लावले... ती तुम्ही आम्ही ७०० वर्षे जोपासलेली मायबोली जालावर अवतरली, त्यालाही एक तप झाले. एक तप पूर्ण होणे याला महत्त्व का आहे ? तप म्हणजे केवळ काळाचा एक तुकडा एवढेच नव्हे, तप ही साधना आहे... तपाची गरज भासणे आणि त्यानुसार तयारी करणे ही क्रांती असते आणि त्यानंतर येणारा १२ वर्षांचा काल म्हणजे उत्क्रांती होय. त्यामुळेच जेव्हा एक तप पूर्ण होते तेव्हा होते ते स्थित्यंतर.... आमूलाग्र !

हे स्थित्यंतर होते मनाचे, देहाचे...व्यक्तीचे, समूहाचे.... ७०० वर्षांच्या मायमराठीचे आणि १२ वर्षांच्या मायबोलीचेसुद्धा.

या वर्षी आपण साजरा करत आहोत तो हा स्थितीबदल... जो घडला तो आणि जो येऊ घातला आहे तोही. या दीपावलीच्या शुभप्रसंगी आपण घेऊया एक आढावा - गेल्या एका तपात आपल्या 'मायबोली'मध्ये आणि एकूणच 'जे जे काही मराठी' त्या त्या सर्वांमध्ये झालेल्या बदलांचा... आणि त्याचवेळी डोकावून बघूया आगामी बदलांकडे, आगामी उत्क्रांतीकडे.

मायबोली हे संकेतस्थळ, आपली सगळ्यांची भाषा, देशविदेशात विखुरलेला मराठी समाज यांत झालेल्या व होऊ घातलेल्या बदलांबद्दल तुमचे ललित लेख, कथा, कविता आम्हांला पाठवा.

याशिवाय नेहमीप्रमाणेच कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, परिक्षणं, मुलाखती वगैरेबरोबरच बाल साहित्याचंही स्वागत असणार आहे. आणि बालसाहित्य मायबोलीकरांच्या मुलांच्या लेखणीतून उतरलेले असेल तर उत्तमच!

तुमच्या छायाचित्रांचे, कलाकुसरीचे, रेखाटनांचे, इतर कुठल्याही गुणप्रदर्शनाचे देखील स्वागत आहे! दर्जेदार लिखित साहित्याच्या बरोबरीच्या दॄक अन श्राव्य कलाकृती हे आपल्या अंकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. यंदाच्या अंकात मायबोलीकरांच्या कलागुणांचा आविष्कार दॄक अन श्राव्य माध्यमातून सर्व वाचकांच्या पुढ्यात मांडता येईल.

साहित्य पाठवण्याचा शेवटचा दिवस ऑक्टोबर १५, २००८ राहील. दिवाळी अंकासाठी तुमचे साहित्य या दुव्यावर पाठवा. त्याचबरोबर नियम व सूचनाही प्रकाशित करत आहोत. तरी तुमच्या शंका वा प्रश्न sampadak AT maayboli DOT com या पत्त्यावर जरूर पाठवा!

मग करताय ना सुरुवात? आपल्या दिवाळी अंकात प्रत्येक मायबोलीकराचा सहभाग हवाच!

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्यासंबंधी काही सूचना आणि नियम -

गणेशोत्सवाची सांगता होता-होता आपल्या दिवाळी अंकाची तयारी सुरू झालेलीच आहे. तुम्हीही अंकासाठी साहित्य पाठवायच्या तयारीला नक्कीच लागला असाल. तेव्हा ते कसे, कधी, कोठे पाठवायचे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. त्यासाठी या काही सूचना आणि नियम.

१. दिवाळी अंकासाठी पाठवायचे साहित्य १५ ऑक्टोबर २००८ पर्यंत संपादक मंडळाकडे पोहोचले पाहिजे.

२. साहित्य सॉफ्ट कॉपीमध्ये आणि देवनागरी लिपीमध्येच पाठवावे. जर काही कारणाने ते देवनागरी लिपीमध्ये पाठवणे शक्य झाले नाही तर ते रोमन लिपीमध्ये असले तरी त्याभोवती dev tag टाकून त्याचे देवनागरीमध्ये सहजगत्या लिप्यंतर होऊ शकेल असे पहावे. नुसते Minglish मध्ये पाठवलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही. तसेच मायबोलीकर नसलेल्या कोणाकडून विशेष साहित्य आणले असल्यास ते दिवाळी अंकासाठी पाठवणार्‍या मायबोलीकराने त्याचे देवनागरीकरण करून सॉफ्ट कॉपीमध्ये पाठवावे.

३. साहित्य पाठवताना शक्यतो व्याकरणाचें आणि शुद्धलेखनाचें नियमांत बसेल असे पहावे.

४. साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादक मंडळ राखून ठेवत आहे. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादक मंडळ बांधील नाही. याबाबत संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.

५. आपल्या दिवाळी अंकात याही वर्षी काही साहित्यकृतींसोबत रेखाटने असतीलच. रेखाटन समिती आणि संपादक मंडळ रेखाटनासाठी साहित्य निवडण्याबाबतचा निर्णय घेतील आणि तो अंतिम असेल.

६. अंकासाठी कोणत्या प्रकारचे आणि किती साहित्य पाठवायचे यावर अर्थातच बंधन नाही. परंतु पाठवलेले सर्व साहित्य स्वीकारले जाईलच असे नाही. कृपया पूर्ण लेख / कथा / कादंबरी / कविता एकाच पोस्टमध्ये पाठवावे.

७. आपण जे साहित्य पाठवू इच्छिता त्याचा आकार जर मोठा असेल आणि ते मायबोलीवरुन पाठवणे शक्य होत नसेल तर कृपया संपादक मंडळाशी संपर्क साधा.

८. दिवाळी अंकात आपली मायबोलीवरची ओळख प्रसिद्ध व्हावी की आपले नाव हे तुम्हीच ठरवायचे आहे. साहित्य पाठवताना ते कृपया नमूद करावे. तसेच आपले नाव प्रसिद्ध करायचे असेल तर ते आपल्याला जसे प्रसिद्ध व्हावे असे वाटत असेल तसे कळवावे. उदाहरणार्थ पूर्ण नाव की फक्त नाव की नाव आणि आडनाव.

९. साहित्य मिळाल्याची पोच शक्य होईल तशी पाठवली जाईलच.

मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा:

हितगुज दिवाळी अंकाच्या वाढत्या लोकप्रियतेला लक्षात घेता आम्हाला दिवाळी अंकासाठी आपण पाठवत असलेल्या कुठल्याही प्रवेशिकेच्या मालकीहक्काविषयी ( Copyright information ) स्पष्टीकरण आपल्या संरक्षणासाठी देणे महत्त्वाचे वाटते. यासाठीचे नियम खालीलप्रमाणे असतीलः

येणार्‍या प्रत्येक प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क ती प्रवेशिका पाठवणार्‍या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. परंतु पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी, तुम्ही मायबोली प्रशासनाला त्या प्रवेशिकेला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.

याचा अर्थः

* प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क तुमचे असतील व तुम्ही त्या प्रवेशिका इतरत्र प्रसिद्ध करु अथवा तुमच्या वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकता.
* परंतु मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)
* भविष्यात ती प्रवेशिका मायबोलीवरुन अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावी असे तुम्हाला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधिल राहणार नाही. (कायमस्वरुपी परवाना)
* तुम्ही तुमची प्रवेशिका इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ती प्रवेशिका मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)

यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया संपादक मंडळाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद.

Copyright remains with respective author and artists. But by submitting your work, you are giving unlimited, perpetual and irrevocable license to maayboli to publish on maayboli.com or where ever maayboli.inc wants to use it in any media.

What it means:
* The copyright and ownership remains with author / artist and they can use it however they want such as sell, publish their work etc.
* But they have given the right to maayboli to publish on maayboli or any other media such as PDF, CD etc in future. (unlimited)
* Maayboli is not obligated to remove the work from maayboli or other media if author wants in future. (perpetual)
* If author sells his/her copyright to a new owner, the new owner can not ask maayboli to remove the work from maayboli. (irrevocable)

If you have any further questions related to this, please email the Sampadak Mandal. Thank you.

आपले साहित्याभिलाषी
संपादक मंडळ

>> साहित्य पाठवताना शक्यतो व्याकरणाचें आणि शुद्धलेखनाचें नियमांत बसेल असे पहावे
मला मराठी लिहून पुष्कळ वर्ष झाली. सध्याचे शुद्धलेखनाचें नियम काय आहेत हे मदतपुस्तिका किंवा इतर कुठेतरी कुणी जाणकाराने लिहीले तर खूप मदत होईल.

'शक्यतो' शुध्दलेखन व व्याकरणात (आपणांस माहीत असलेल्या नियमांप्रमाणे) बसेल असे लेखन आपण पाठवावे.
संपादक मंडळातील तसेच त्यांना मदत करू इच्छिणार्‍या काहींनी हे 'शुध्दीकरण' करण्याची तयारी दाखविली आहे.

चिमण्या, मराठी साहित्य महामंडळाने प्रचलित मराठी शुद्धलेखनाची नियमावली जाहीर केली आहे. ती तुम्हाला येथे वाचायला मिळेल:
शुद्धलेखनाचे नियम.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

दिवाळी अंकासाठी साहित्य या दुव्यावर जाउन पाठवा. तुमचा लेख जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या लेखनाची दिवाळी_साहित्य_लेखन्_स्थिती "अपूर्ण" ठेवा. जेव्हा संपादकाना पाठवायचे असेल तेव्हा स्थिती बदलून "साहित्य पाठवले" करा.

..

हे मस्त केलं बघा संपादक मंडळानी.. इथेच लिहुन इथेच सबमिट करायचं.. उगाच वर्ड मध्ये फॉन्टशी खेळ वगैरे करत बसायचा त्रास नाही (नाहीतर जुन्या मायबोलीत जाउन देव टॅग टाकून लिहायला लागलं असतं)

मायबोली दिवाळी अंकासाठी पाठवलेले किंवा मायबोलीवरच्या इतर विभागांमध्ये लिहिलेले साहित्य maayboli.com वरून दुसर्‍या कोणी ढापण्याची किंवा त्या साहित्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता असते का? तसे होऊ नये म्हणून काय करता येईल?

PDF format मध्ये याच विषयावरचा एक लेख माझ्याकडे आहे. तो एका दिवाळी अंकासाठी दिला आहे. पण मायबोलीवर द्यायला हरकत नाही. तो पाठवला तर चालेल?

आहो संपादक, त्या `सावधान मायबोलीकर' चा भाग दुसरा जर दिवाळी अंकासाठी पाठवली तर चालु शकेल का ?
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

संपादक,
मायबोली दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य maayboli.comवरून इतर कोणीतरी कॉपी करून त्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता आहे का? की त्यासंदर्भात काही नियम आहेत?

अहो संपादक, एक मत मांडायचे आहे. जरूर विचार करा..

मला एक वाटतं जर निवडक गझल दिवाळी अंकात घेतल्या जात असतील तर मग त्याला काय अर्थ उरतो कारण गझल इथे प्रत्येकानी वाचलेलीच असेल. अशा नविन आणि आधीच वाचलेल्या गझल दिवाळी अंकात समाविष्ट करून काय साध्य होणार आहे? अशानी दिवाळी अंक चांगला होईल असे मला तरी नाही वाटतं. त्यापेक्षा सर्व गझल दिवाळी अंकात घेऊन तेंव्हाच त्या वाचायला द्याव्यात तर दिवाळी अंकाचे आणि या कार्यशाळेचे दोन्हीचे उद्दीष्ट साध्य होईल. नाही का?

दुसरे असे की दरवर्षी आपण कविता सदरात ज्या काही कविता घेतो त्या काही सर्वच वाचनिय असतात असे नाही. मग दर्जेदार गझल वाचकांनी दिलेल्या गुणांवरून निवडणे काही पटत नाही. इथे गुण देणारे सर्वच विचार विनिमय करून देतील याची काय हमी? मला तरी हे गुण देणे अजून इथे जमले नाही. त्यापेक्षा प्रतिसादावरून हे ठरवता येत बर्‍यापैकी की कुणाची गझल उत्तम.

बी, निवडक गझल दिवाळी अंकात घेण्याबद्दल तुम्ही कुठे वाचलंत?

७) ह्या कार्यशाळेतील काही निवडक गज़लांचा मायबोली प्रातिनिधिक गज़ल संग्रहात समावेश करण्यात येईल . हा संग्रह पीडीएफ स्वरुपात मायबोलीवर दिवाळी अंकासोबत उपलब्ध करून देण्यात येईल

अशी घोषणा http://www.maayboli.com/node/3608 या दुव्यावर करण्यात आली होती.

वाचकांच्या मतावर विश्वास नसेल तर तुम्हाला तुमची गझल कार्यशाळेत न पाठवता दिवाळी अंकासाठीच पाठवायचा पर्याय उपलब्ध आहेच. Happy

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

झुलेलाल
आपला लेख जर त्या दुसर्‍या नियतकालिकाने छापला नसेल तर तो मायबोली दिवाळी अंकासाठी अवश्य विचारात घेतला जाईल. जर तो लेख दुसर्‍या एखाद्या ठिकाणी प्रकाशित होणार असेल तर तो मायबोली दिवाळी अंकात प्रकाशित करण्याने त्याच्या कॉपीराईट मधे ढवळाढवळ होईल.

चाफ्फा
सावधान मायबोलीकर या लेखाचा फक्त दुसरा भाग जर दिवाळी अंकात समाविष्ट केला तर जी मंडळी फक्त दिवाळी अंक वाचतील त्यांना त्यातली अर्धीच गम्मत कळेल. आपल्या सवडीनुसार दुसरा भाग गुलमोहर वर टाकावा, व दिवाळी अंकासाठी एखादी खास कथा लिहावी.

मंदार कमळापूरकर,

मायबोलीवर प्रकाशित झालेले साहित्य दुसर्‍या कोणी ढापण्याची किंवा त्या साहित्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता नेहेमीच असते. दुर्दैवाने सध्या तरी तसे होऊ नये म्हणून काही तांत्रिक उपाय आपल्या पाशी नाहीत.

दिवाळी अंक संपादक,

आपल्या मायबोलीच्या मुखपॄष्ठावर लवकर एखादं चित्र टाकता का? (दिवाळीसाठी तुमची तशी योजना असेलच म्हणा !)
पण आज काहीच नाहीये मुखपॄष्ठावर, जरा चुकल्याचुकल्या सारखं वाटलं.
गझल कार्यशाळा आणि गणेशोत्सोव दोन्ही कार्यक्रम संपले ना?, त्यांची चित्र नाही दिसत आहेत आज.
की ऍडमिनना सांगायला पहिजे हे?

बो विश,
मुखपृष्ठावर लवकरच चित्र टाकत आहोत. गणेशोत्सव संपला आहे, पण कार्यशाळा अजून चालु आहे. प्रत्येक पानावर डावीकडे वर जे चित्र दिसत आहे ते तुम्हाला कार्यशाळेत घेउन जाइल.

मी त्या दुव्यावर जाउन लिहिलंय. पण ते अपूर्ण आहे. अपूर्ण म्हणून सब्मिट केल्यावर तयार लेखन असं दिसू लागलं. पण ते अजून झालेलं नाहीये. काय घोळ आहे?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मला तिथे टाईपच करता येत नाहीये. साहित्य लेखनाच्या चौकटीत अगदी डाव्या हातालाच पेज अप डाउन करायचा ऍरो दिसतोय. काही गडबड आहे का?

अज्जुका, लेखन स्थिती 'अपूर्ण' असेल तर ते सबमिट केल्यानंतरही तुलाच दिसेल फक्त. बाकी कोणाला दिसत नाही. जोवर तू 'सुपूर्त करण्या योग्य' टॅब सीलेक्ट करत नाहीस, तोवर ते कोणालाही दिसणार नाही, be assured. लिहून पूर्ण झालं की 'सुपूर्त कर' मात्र Happy

सायोनारा, मी आत्ताच पाहून आले ते पान. सर्व काही ठीक दिसत आहे. पुन्हा चेक करणार का?
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

मला अजूनही तसंच दिसतंय पूनम. काहीही टाईप करायला अजिबात जागा नाहीये.

सायो, स्क्रीन रेझोल्यूशन बदलून बघ.

झाला झाला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह. कसा काय माहित नाही पण आत्ता व्यवस्थित दिसतंय.

गूड सायो.. आता लिही लवकर Happy
-----------------------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

दिवाळी अंकासाठी काही विषय आहेत का? ज्याला आपण ईंग्रजीत थिम म्हणतो.

बी.. वर संपादकांनी एव्हडं मोठं "ग्यान" दिलय (सुचनांच्या आधी) ते इंग्रजीत ज्याला थीम म्हणतात त्याबद्दलच आहे ना?? Uhoh

अदम, बरं झालं तू सांगितलसं. पण इतक्या सहजासहजी ही थीम लक्षात येत नाही. त्यापेक्षा संपादकांनी 'थीम अशी' आहे ह्यावर जोर देऊन लिहायचे असते. ते चटकन नजरेस पडले असते. कदाचित माझ्यासारखे अजून इथे काही जण असतील.

संपादक, खरचं थीम वर फार लक्ष केंद्रीत होत नाहीये.

संपादक, दिवाळी अंकाचे साहित्य कुठे द्यायचे ती लिंक ठळकपणे मायबोलिच्य पहिल्या पानावर दिली तर खालीच उतारा चटकन वाचता येतो. ठळक मुद्दे तुम्ही वेगळ्या रंगामधे का नाही करत? जसे की खालचे सर्वच मुद्दे मला ठळक मुद्दे वाटतात आणि ते छान एकत्रीत केले आहे. वरती मात्र तसे नाही..

पहिले पान
'मायबोली मराठी - गेलं तप, येणारं तप'
हितगुज दिवाळी अंक २००८

सप्रेम नमस्कार सुजनहो,
दिवाळी अंकासाठी तुमचे साहित्य पाठवण्यासाठी या दुव्यावर जा .

यंदा आपल्या हितगुज दिवाळी अंकाचं नववं वर्षं. आपली 'मायबोली' यंदा बारा वर्षांची झाली. मायबोली हे संकेतस्थळ, आपली सगळ्यांची भाषा, देशविदेशात विखुरलेला मराठी समाज यांत झालेल्या व होऊ घातलेल्या बदलांबद्दल तुमचे ललित लेख, कथा, कविता आम्हांला पाठवा.

याशिवाय नेहमीप्रमाणेच कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, परिक्षणं, मुलाखती वगैरेबरोबरच बाल साहित्याचंही स्वागत असणार आहे. आणि बालसाहित्य मायबोलीकरांच्या मुलांच्या लेखणीतून उतरलेले असेल तर उत्तमच!

तुमच्या छायाचित्रांचे, कलाकुसरीचे, रेखाटनांचे, इतर कुठल्याही गुणप्रदर्शनाचे देखील स्वागत आहे! दर्जेदार लिखित साहित्याच्या बरोबरीच्या दॄक अन श्राव्य कलाकृती हे आपल्या अंकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. यंदाच्या अंकात मायबोलीकरांच्या कलागुणांचा आविष्कार दॄक अन श्राव्य माध्यमातून सर्व वाचकांच्या पुढ्यात मांडता येईल.

साहित्य पाठवण्याचा शेवटचा दिवस ऑक्टोबर १५, २००८ राहील.

संपादक, दिवाळी अंकाचे साहित्य कुठे द्यायचे ती लिंक ठळकपणे मायबोलिच्य पहिल्या पानावर दिली तर खालीच उतारा चटकन वाचता येतो. ठळक मुद्दे तुम्ही वेगळ्या रंगामधे का नाही करत? जसे की खालचे सर्वच मुद्दे मला ठळक मुद्दे वाटतात आणि ते छान एकत्रीत केले आहे. वरती मात्र तसे नाही..

पहिले पान
'मायबोली मराठी - गेलं तप, येणारं तप'
हितगुज दिवाळी अंक २००८

सप्रेम नमस्कार सुजनहो,
दिवाळी अंकासाठी तुमचे साहित्य पाठवण्यासाठी या दुव्यावर जा .

यंदा आपल्या हितगुज दिवाळी अंकाचं नववं वर्षं. आपली 'मायबोली' यंदा बारा वर्षांची झाली. मायबोली हे संकेतस्थळ, आपली सगळ्यांची भाषा, देशविदेशात विखुरलेला मराठी समाज यांत झालेल्या व होऊ घातलेल्या बदलांबद्दल तुमचे ललित लेख, कथा, कविता आम्हांला पाठवा.

याशिवाय नेहमीप्रमाणेच कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, परिक्षणं, मुलाखती वगैरेबरोबरच बाल साहित्याचंही स्वागत असणार आहे. आणि बालसाहित्य मायबोलीकरांच्या मुलांच्या लेखणीतून उतरलेले असेल तर उत्तमच!

तुमच्या छायाचित्रांचे, कलाकुसरीचे, रेखाटनांचे, इतर कुठल्याही गुणप्रदर्शनाचे देखील स्वागत आहे! दर्जेदार लिखित साहित्याच्या बरोबरीच्या दॄक अन श्राव्य कलाकृती हे आपल्या अंकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. यंदाच्या अंकात मायबोलीकरांच्या कलागुणांचा आविष्कार दॄक अन श्राव्य माध्यमातून सर्व वाचकांच्या पुढ्यात मांडता येईल.

साहित्य पाठवण्याचा शेवटचा दिवस ऑक्टोबर १५, २००८ राहील.

बी, मुद्दामच संकल्पना विस्ताराने मांडली आहे, विषयाचा आवाका लक्षात यावा म्हणून.
तू हे वर एकत्र केले आहेस, त्याबद्दल धन्यवाद.
नवीन मायबोलीमधे रंगीत लिहिता येत नाही.

मायबोलीच्या मुखपृष्ठावर 'दिवाळी अंक घोषणा' हे अगदी वर आहे. तसंच, मायबोलीच्या सर्व ग्रूप्समधे उजवीकडे वर 'हितगुज दिवाळी अंक घोषणा' असा ब्लॉक दिसतो, जो वाचकाला याच पानावर घेऊन येतो. 'दिवाळी अंक लेखन दुवा' असा वेगळा धागाही आहे, आणि लोक तो वापरून लिहितही आहेत.
तूही नीट वाचलंस तर तुझ्या लक्षात सगळं येईल.
तरीही, सूचनांबद्दल आभार Happy
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

Pages